Posts

Showing posts from November, 2017

*मेरे मन कि बात संवाद कट्टयाच्या निमित्तान…माझ्या दृष्टीने आजचे चर्चा सत्र...* आज दिनांक 19-11-2017 रोजी मेरे मन कि बात संवाद कट्टयाचे पहिले चर्चा सत्र होते. *लातुर मधील तरुणांनी सुरु केलेल्या या मुक्त विचारमंचाला चांगला प्रतिसाद मीळत आहे.*वैचारीक मतभेद विसरुन आगोदर आपण माणुस आहोत म्हणून आपण सर्वच जण एक आहोत… *भलेही आज आपण वेगवेगळ्या विचारधारांमुळे वेगळे झालो असलो…*हाच विचार आणि नविन उम्मेद घेऊन लातुर मधले *सुधारणावादी तरुन एकत्र येऊन त्यांनी ह्या कट्टयाची संकल्पना समोर आणली* आजच्या पहिल्या चर्चा सत्राचा विषय होता *भारतामध्ये खरच आराजकता वाढत आहे कि फक्त याचा डोलारा उभा केला जातोय.*आणि आजच्या ह्या कट्टयाच्या पहिल्या चर्चा सत्राला रणजीत आचार्य,अनिल वाठोरे,पारसी अभिजीत,प्रशांत मस्के,दिनेश बोंबडे,अहिल्या कस्पटे,वृषाली सुर्यवंशी आणि बुद्धीसार शिकरे हे उपस्थित होते. चर्चा अडीच तास चालली आणि प्रत्येकाने अगदी *मुद्देसुद आणि आणि अभ्यासु पद्धतीने मांडणी केली.* झालेल्या चर्चेचा काही सारांश चर्चेची सुरुवात ही *धार्मिक अराजकते* पासुन झाली..धर्माच्या नावाखाली कशाप्रकारे आराजक आणि असंतोष माजवण्याच काम ईथल नेते मंडळी करत आहेत..आणि *धर्मीक आराजकता माजवुन ते त्यांच्या मतांच राजकारण करत आहेत..*धर्मीक आराजकता वाढण्याच एक प्रमुख कारण म्हणजे राजकारणी लोक..धर्माच्या नावान समाजामध्ये एकमेकां मध्ये फुट पाडुन आणि जातीच गलिच्छ राजकारण करुन समाजामध्ये असंतोषाच वातावरण निर्माण करण्याच काम ईथले नेते मंडळी करताना दिसत आहेत. नंतर चर्चा धर्मीक आणि राजकिय अराजकते कडुन.. *शौक्षणिक आणि विद्यार्थ्यां मध्ये वाढत चालेल्या आराजकतेकडे वळाली..*मग काहींच अस म्हणन होत कि, सध्याच सकार हे शिक्षण क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करुन विद्यार्थ्यांमध्ये जाती च्या नावाखाल त्यांच्यामध्ये अराजकता माजवण्याच काम हे सरकार करत आहे ..उच्च शिक्षण घेणार्या दलत आणि मुस्लीम विद्यार्थ्यांना शिक्षणच घेता येऊ नये अस वातावरण निर्माण केल जात आहे.. *शिक्षण क्षेत्रामध्ये ब्राम्हणी व्यवस्था आणण्याच काम चालू आहे...*नंतर चर्चा शैक्षणिक आणि विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या आराजकते कडुन, *शेतकरी,कामगार आणि शेतमजुर यांच्यात असलेल्या अराजकते बद्दल चर्चा झाली.* शेतकर्यांची आंदोलने व आत्महत्यांची सत्र थांबायच नाव घेत नाहीत..याला जबाबदार आहे ईथली शासन व्यवस्था मग ते *कुठलही सरकार असो..*शेतकर्यामध्या वाढणार्या अराजकतला कॅाग्रेस आणि बिजेपी दोन्ही पक्षाची सरकार तितकेच जबाबदार आहे…त्यातल्यात्यात सरकार हमीभावाच्या आणि कर्जमाफीच्या नुसत्याच घोषणा बाजीत व्यस्त आहे..पण ह्याच दिलेल्या घोषणा पुर्ण करायला सरकार कडे कुठ वेळ आहे.. *सरकार कोणतेही असो देशामध्ये कमी-अधिक प्रमाणात अरजकतेच आणि असंतोषाच वातावर होतच* किंबहुन त्या-त्या वेळच्या सरकारने स्वतः च्या फायद्यासाठी तस वातावरण घडवुन आणल असाव..बिजेपी सरकारच्या काळामध्येच अचानक आराजक आणि असंतोष वाढलाय अशातला भाग नाही कॅाग्रस च्या वेळेस सुद्धा देशा मध्ये आराजक आणि असंतोषाची परिस्थिती होतीच आणि आताही आहेच..मग ह्यामधुन काय लक्षात येत तर *राजकारण करण्यासाठी आणि निवडुन येण्यासाठी* समाजामध्ये तेढ निर्माण करण आणि धार्माच आणि जातिच राजकारण करन हे ईथल्या नेते-मंडळींना गरजेच आहे असच दिसुन येत…. _देशामध्ये तथाकथीत गोरक्षेच्या नावाखाली दहशत माजवली जात आहे..बिफ खाण्याच्या संशयावरुन मुस्लीम बाधंवांना मारल जात आहे…देशामध्ये आजही उच्च जातीच्या लोकांकडुन दलीतांवर अन्या अत्याचार केला जात आहे..उच्च शिक्षण घेणार्या दलीत विद्यार्थ्यांना ते शिकु शकणार नाहीत अस वातावर निर्माण केल जात आहे..निर्भीड पणे बोलणार्या पत्रकारांवर हल्ले होत आहेत…Facebook वर अभिव्यक्त होणार तरुणांना पोलीस प्रशासन नोटीसा पाठवत आहे…दिवसाढवळ्या विचारवंताचे खुन केले जात आहेत…तर कुठे सिनेमावरुन दोन समाजामध्ये वाद चालू आहे…देशामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणावर अराजकतेची आणि असंतोषाची भयानक परिस्थिती असताना देखील...हे मुद्दे सोडवायचे रहुनच गेले तर आमच सरकार करतय काय तर सरकार मात्र त्यांच्या विरोधकांचे video बनवण्यातच आणि राममंदीर बनवण्यात व्यस्त आहे…_ जरी जग हे 21 व्या शतकात वावरत असल तरी आपण मात्र आणखीन 100 वर्षे मागे आहोत असच वाटतय... *आता तर अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधीत राहाव म्हणून आंदोलन करावी कि काय अशी परिस्थिती ह्या देशामध्ये निर्माण झाली आहे…*देशात वाढत चाललेल्या गरिबी आणि बेरोजगारी बद्दल जे कोणी बोलत आहेत त्या बद्दल सरकारला जाब विचारत आहेत तर उलट जाब विचारणार्यांनच देशद्रही ठरवल जातय… *आपल्या हक्कांबाबत आणि मेलभुत प्रश्नांबद्दल आवाज उठवण देशद्रोह कसाकाय असु शकतो…*आणि हे ठरवणारे तुम्ही कोण *एकंदर देशामध्ये अराजक परिस्थिती आहे आणि ति आणखीन वाढत चालली आहे.. म्हणून सर्वांनी एकमेकांशी माणसासम वागण महत्वाच आहे.* _माझ्या दृष्टी ने आज झालेल्या चर्चेचा सरांश.. -बुद्धीसार शिकरे