Posts

Showing posts from April, 2021

डायरी विचारांची 1):- सुट्टी ची मज्जा

शालेय जीवनात असताना दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याची सुट्टी असे दोन विलोभनीय सुट्ट्यांचे प्रकार अनुभवत असताना त्या आनंदाने सद्गदित होणार्‍या मनाचे वर्णन करणे कठीणच... खरतर आज दिड वर्ष झाले आपण बंदिस्त स्वरूपातच आहोत...पण या सगळ्यात ही एकदातरी बालपणात जाऊन आपण रमायला हव. सहामाही आणि वार्षिक परिक्षेचा शेवटचा पेपर देऊन घरी परतताना चा जो आनंद होता तो ना शब्द व्यक्त करता येतो ना आज कुठल्या कृतीत...त्या दोन तीन महिन्यांच्या सुट्टीत गावी जाण्याची मज्जाच वेगळी, आज आपण कुठे कुठे फिरतो... लांब लांब जातो... पण लहानपणी आईवडीलां सबोत गावी जाण्यासाठी बसस्टँडवर बस ची वाट बघत बसणे, आई च्या मांडीवर बसून खिडकीतून डोकावून पळणारी झाडे पाहण... हे सगळे क्षण जिवनात एक वेगळीच अनुभूती देतात... जिवनभराच्या प्रवासासाठी या गोड आठवणींची शिदोरी कायम कामाल येते... आपणा सर्वांना सुट्टी जरी हवी हवीशी वाटत असली तरी...सुट्टीला मर्यादा असणच गरजेचे आहे हे आज मगे वळुन बघताना जाणवत आहे... खरतर कुठलीही गोष्ट मर्यादेत केली तरच ती योग्य होत असते...!! -बुद्धीसार शिकरे.  (डायरी विचारांची) प्रकरण -1