Posts

Showing posts from October, 2021

मनाचे विचार

सत्य परिस्थिती स्वीकारली की मनातील विचर देखील प्रवाही होतात...या प्रवाहा बरोबर मना मध्ये साचलेली अविचारांची च घान, नको असलेले विचार, दुसर्‍या लोकां बद्दलचे निरर्थक विचार हे आपोआपच निघुन जातात... सत्य परिस्थिती स्विकारणे म्हणजे काय करायला पाहिजे, तर ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत किंवा घडत असतात त्या पैकी कोणत्या निरर्थक आहेत आणि कोणत्या महत्त्वाच्या आहेत हे तपासून पाहायला हव... वाईट विचारांच्या आणि कपटी मन असलेल्या लोकांचा सामना आपल्या प्रत्येकालाच आपल्या जिवनात करावा लागतो पण या गोष्टी ह्या निरर्थक आहेत त्याच्या आपल्या जीवनावर अथवा मनावर फरक पडणारा नसतो पण त्या विचार करून आपण स्वतःच आपल मन दुःखी करत असतो...आपल्या सोबत लोक कसे वागतील कसे बोलतील या गोष्टी आपण बदलू शकत नाही पण आपण याकडे बघण्याचा आणि याबद्दल विचार करण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो...तरच आपल मन शांत होईल आणि नको असलेले वाईट विचार आणि निरर्थक गोष्टी आपल्या मनातुन निघुन जातील त्यासाठीच मनातील विचार हे प्रवाही असण गरजेच आहे... एखाद्या छोट्या डबक्या प्रमाणे आपल मन बनल की तिथे घाण जमा होईल, दुर्गंधी पसरेल म्हण...