Posts

माणसासम वागणे...!!

लातुर मधील लोकहो, समजा जर तुमच्या घरासमोरील कचरा उचललाच गेला नाही...रोज घरातून निर्माण होणारा कचरा रोजच्यारोज तसाच साचत चाललाय, गल्लीबोळात सगळ्यांच्या घरासमोर कचऱ्याचे ढीग च्या ढिग जमा झालेत, प्रचंड दुर्गंधी पसरली आहे... माशा, मच्छर यांच प्रमाण वाढलय..रस्त्यावर चालताना देखील नाकाला हात लावून साचलेल्या कचऱ्यातून वाट काढत चालाव लागतय... नाल्या ओसंडून वाहत आहेत, नाल्यातील गाळ रस्त्यावर आला आहे...  विचार करा जर अशी स्थिती लातूर ची झाली तर...??  आता तुम्हाला वाटेल की अशी स्थिती कशाला उद्भवेल... रोज कचरा उचलणारे कर्मचारी येतात कचरा घेऊन जातात... सफाई कर्मचारी रोड स्वच्छ करताता मग कशी होईल अशी लातुर ची दयनीय अवस्था. पण लातुरकर हो, अशी वेळ आपल्यावर यायला वेळ लागणार नाही कारण लातुर मधील कचरा व्यवस्थापन करणारे आणि सफाई कर्मचारी यांची फार दैना झाली आहे हे लोक प्रचंड हलाखीत त्यांच जिवन व्यथीत करत आहेत... तर त्यांच्या जीवनाच्या अशा दयनीय अवस्थेला जबाबदार आहे इथल प्रशासन... कारण इथल प्रशासन हे या लातुर ला स्वच्छ व निरोगी ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे... त्यांची कुचेष्टा करत आहे...

बंदिस्त भारतीय संस्कृती

                  "बंदिस्त भारतीय संस्कृती " भारतीय संस्कृती ही स्त्री पुरुष समानतेला पोषक आहे अस मला वाटत नाही. भारतीय संस्कृती ही खूप संकुचित आहे मुळातच इथली संस्कृती ही पुरूषप्रधान आहे...आणि इथूनच मग स्त्री च्या इज्जतीचे आणि तिच्या स्वतंत्र अस्तित्वाचे सर्व प्रश्न निर्माण होतात. भारतीय संस्कृती मध्ये फक्त आई आणि बहीण ह्या दोनच स्त्रियांचा सन्मान करायला शिकवतात, *माझ्या दृष्टीकोनातून आपल्या संस्कृतीत स्त्री ची नव्हे तर फक्त या दोन नात्यांची इज्जत आणि सन्मान करायला शिकवतात...            ती तुझी बहीण असती तर, ती तुझी आई असती तर असच बघितला असतास का, असच बोलला असतास का वगैरे वगैरे... हे सर्व वाक्य आपण ऐकलेच असतील तर ही आहे आपली संस्कृती, ही आहे आपली शिकवण जी की फक्त घरातल्या आई आणि बहिणीचाच सन्मान करायला शिकवते... म्हणून मी ह्या अशा संस्कृती ला बंदिस्त म्हणतो संकुचित म्हणतो आणि का म्हणू नये.  आपली संस्कृती आणि शिकवण ही शिवाजी महाराज आणि गौतम बुद्ध यांची असली पाहिजे, कारण त्यांच्या दृष्टीने सर्वच स्त्री ही समान...

मी दाभोळकर व्हाव...!!

 मी ही दाभोळकर व्हाव...!! त्यांच्या रक्ताचा एक एक थेंब सार्थ व्हावा, समाजातील मनामनात विवेक जागावा, निर्भय, नीतिमान समाज घडवावा, त्यासाठी मी ही दाभोळकर व्हाव...!! घेऊनी खांद्यावर पताका विवेकाची, अंधाऱ्या पथावर, निर्भय, निडर चालाव, त्यासाठी मी ही दाभोळकर व्हाव...!! उपहासाचे मन ते भेदभावाचे आगार, एकजूट होऊ आपण करू नव समाज निर्माण, त्यासाठी मी दाभोळकर व्हाव...!! जखडले ते मन त्या अंधश्रद्धा लय कठीण, द्यावयास त्यास उत्तर, पटवून देऊ तयांना मन मनाचे आजार, त्यासाठी मी दाभोळकर व्हाव...!! भिती ही मरणाची नाही किंचीत ही आम्हा, विवेकी वारकरी आम्ही आमचा तुका सोयरा, गोळीला तुमच्या आमचे आभंग उत्तर, त्यासाठी मी दाभोळकर व्हाव...!! गांधी-आंबेडकरांचा समाज दृष्टिकोन, अंधश्रद्धा त्यामधील च एक अडचण, ती होऊन दुर मग संविधान समाज, बघा कसा घडणार, त्यासाठी मी दाभोळकर व्हाव त्यासाठी मी दाभोळकर व्हाव...!!           -Budhisar Shikare

कुछ तो करो...!!

रास्ते पर आकर विरोध करो,   ना आ सको रास्ते पर तो उनको मदत करो,  कागज कलम लेकर कुछ लिखने की कोशिश करो,  कविता करो, लेख लिखो,  विरोध हो जिस चीज से वो सब करो,  ना लिख पाओ कुछ भी तो,  दुसरो का लिखा हुआ share करो,  विरोध करने का समय नही तो अपने मोबाइल का इस्तेमाल करो,  Facebook पर हो तो facebook पर,  Instagram पर हो तो instagram पर,  Twitter पर हो तो twitter पर,  Whatsaap पर हो तो whatsaap पर,  चाहे जिस पर भी हो विरोध करो,  बस में, रिक्शा में, चलते वक्त अजनबीयों से, दोस्तों से विरोध की बात करो,  चाहे सुनने वाला हो या ना हो तुम तुम्हारी बात करो,  हो सके जो कुछ वो सबकुछ करो,  अगर कर नहीं सकते विरोध में कुछ तो बस्स अपने घर आग आने का इंतजार करो...!!              -Budhisar shikare

आग पसरत आहे...!!

सध्याची देशातील परिस्थिती पाहून खुप अस्वस्थ आणि हतबल व्हायला होमोदी शाहा या दोन हिटलर प्रवृत्ती च्या हरामखोरांनी देशाला पार वेठीस धरलय...  पण, या दोघांच्या ताकदी समोर आपली ताकद कमी पडतेय हे आपल्याला मान्य करावच लागेल, आता आपण कुठे आणि कशाबाबतीत कमी पडतोय ते आपण स्वतःलाच विचारल पाहिजे... या दोघांसमोर आज कुठलाच विचारवंत व नेता त्याच ताकदीच आंदोलन उभ करण्यात यशस्वी होत नाही? जरी ह्या हुकूमशाही लोकांच अस्तित्व असत्यावर टिकलेल असल तरही तेच असत्य आज आपल्यावर भारी पडत आहे, आपल सत्य हे ते कमी पडतय...ते दाबल जातय, ते मारल जातय.  अशी कठीण प्रसंगात आपण सापडलो आहोत, याविरोधात आपल्याला कशा प्रकारे लढायच आहे हे आता ठरवण्याची वेळ येऊन ठेपली आहे... सत्यावर असत्य भारी पडताना दिसत आहे, कदाचित ते जिंकेल ही आणि त्याची किंमत ही फार भयंकर असेल हे लक्षात घ्या.  वेळ आहे एकजुटीची, वेळ आहे विचार करण्याची, वेळ आहे सत्याची निर्भय पणे कास धरण्याची, वेळ आहे असत्य लोकांना पटवून देण्याची  आणि ही ताकद आपण स्वतः मध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत बदल निश्चित नाही मित्रांनो.  भविष्याचे पावल ओळखा, जु...

#2

जीवनात आपल म्हणता येतील अशी माणस कमवा... चळवळ, राजकारण होत राहिली पण या सगळ्यात माणस दुरावतील किंवा दुखावतील या सर्व गोष्टी आपण टाळल्या पाहिजे... किंबहुना आपणा चळवळ, राजकारण...

#1

आपण नेहमीच कोणाला तरी कुठल्या ना कुठल्या गोष्टी वरून समजावत असतो, आणि जर का आपण चळवळीत असु तर मग समजावण किंवा समजून सांगण हा आपला धंदाच बनुन जातो, असो इथ विषय तो नाहीये... मुळ...