Posts

धर्म आणि धम्म

मला लोक नेहमी विचारतात की धम्म आणि धर्म यातला फरक काय आहे...  खर तर या प्रश्नाच उत्तर हे फार विस्तृत आहे कारण धम्म आणि धर्म हा काय एका वाक्यात किंवा एका तासात समजुन सांगायची गोष्ट नाही, पण मला उत्तर देणे हे भाग असत आणि प्रत्येकाला तासनतास तेच सांगत यात खुप वेळ जातो त्यामुळे मी या प्रश्नावर चिंतन करून त्याचा सार काढला आणि मला माझ अपेक्षित उत्तर मिळाल...!! ते पुढीलप्रमाणे उत्तर  "धर्म जिथे धार्मिक स्थळ उभारतो तिथे फुल, धुप, अगरबत्ती आणि तत्सम पुजा पाठ करायचे दुकान असतात... आणि धम्म ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ बांधतो त्या ठिकाणी फक्त आणि फक्त विद्वत्ता वाढवणारे पुस्तकांचे दुकान असतात..!!" धर्म अंधश्रद्धेवर उभा असतं आणि धम्म हा तर्कशुद्ध विचाराची कास धरायला शिकवतो -Budhisar (BS)

स्वर्ग आणि नर्क

स्वर्ग आणि नर्क ह्या खुळचट आणि थोतांड कथा आहेत... पण स्वर्गाची कल्पना हि सगळी कडे सुखच सुख अशी केली आहे आणि नर्काची कल्पना ही दुःख भोगण्याचे ठिकाण अशी केली आहे...  तर, प्रत्यक्षात स्वर्ग आणि नर्क ह्या जागा आहेत तरी कुठे??  या अथांग पसरलेल्या ब्रम्हांडात त्यांच स्थान आहे तरी कुठे??  तर, आपली ही जी पृथ्वी आहे जिला पृथ्वी अस मनुष्य प्राण्याने नाव दिल आहे...ती पृथ्वीचा जर का या अथांग पसरलेल्या ब्रह्मांडातील स्वर्ग किंवा नर्क असेल तर...??  ज्या प्रकारे स्वर्गाची कल्पना केली गेली आहे त्या प्रकारे तर पृथ्वी नक्कीच स्वर्ग असु शकत नाही... ईथे दुःख आहे, निराशा आहे यातुन मनुष्य प्राणी मुक्त झालेला नाही...दुखः आपण जन्मताच सोबत घेऊन येत असतो...  तो नष्ट करण्याचा मार्ग आहे पण.....  तर मग हि पृथ्वी जर का नर्क असेल तर तिला आपण अथक परिश्रमाने करूणामय आणि चोहीकडे सुखच सुख असलेल्या स्वर्गात हिचे रूपांतर करावे लागेल...!!  -Budhisar (BS)

स्वयंप्रकाशीत व्हा...!!

एक इमारत आहे त्या इमारती मधुनच सर्वांची सर्व कामे होतात... आणि सर्व काही त्याच इमारती मधुन निश्चित होत असत..केल जात, आणि सर्व निर्णय घेण्यासाठी त्या इमारती मध्ये जाण्यासाठी लोक निवडुन दिली जातात... आता त्या इमारती मध्ये निवडून जाण्यासाठी कोणीही निवडणूक लढवु शकतो... पण आज जर आपण बघितल तर आपल्याला अस दिसेल की, इमारतीच्या आत मध्ये निर्णय घेणारा एक वर्ग आहे आणि इमारतीच्या बाहेर निर्णय व्हावे यासाठी जिवनभर आंदोलने आणि संघर्ष करणारा एक वर्ग आहे...  तर, आपण इमारतीच्या बाहेरचा जो वर्ग आहे आंदोलन करणारा त्याबद्दल बोलुयात... आजपर्यंत या वर्गाने कधीही इमारतीत जाऊन निर्णय प्रक्रियेचा भाग बनण्याच्या प्रयत्न केला नाही...मी ही विभागवारी तीन प्रकारे करतो, इमारती मधील वर्ग... इमारती बाहेरील वर्ग आणि जनता  या तीन प्रकारात मी वर्गवारी करतो.          जनता या वर्ग प्रकारात अजुन काही घटक आपण जोडू शकतो...जसे की,  कामगार, श्रमीक, मजुर, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, इत्यादी. आता या सर्व प्रतिवर्गाचा एक एक प्रतिनिधी असतो... नेता असतो तो नेहमीच या लोकांच्या साठी आंदोलने करत अस...

शिवराय आमची अस्मिता

काल राम मंदिराच भूमिपूजन नरेंद्र मोदींच्या हस्ते झाल... त्यात भाषणा दरम्यान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा उल्लेख केला... म्हणजे जे कोणी लोक या बाबारी मशीद पाडण्यापासुन ते भुमिपुजना पर्यंत जे जे लोक या आंदोलनात सहभागी होते त्या सर्वांना मोदींनी मावळा अस म्हटल आहे...आता कार्यकर्त्यांना मावळा बनवून ते स्वतःला शिवाजी महाराज तर समजत नसावेत ना...??  नाही म्हणजे यागोदर त्यांच्या काही लोकांनी महाराजांच्या फोटीशी मोदींचा फोटो जोडुन बरोबरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे...  तर, माझा राम मंदिर भुमिपुजनाला आक्षेप नाही... त्यात मोदींनी केलेल्या भाषणाला देखील आक्षेप नाही फक्त मावळ्यांचा आणि शिवरायांचा मुद्दा सोडून...  कारण, शिवरायांच स्वराज्य हे कधीच धार्मिकतेवर आधारीत नव्हत... शिवरायांच्या स्वराज्यात धार्मिक उन्मादाला थारा नव्हता... मावळे स्वराज्यासाठी लढले...प्रसंगी त्यांनी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली... स्वराज्यात कधीही हिंदू मुस्लिम भेदभाव नव्हता... अनेक मुस्लिम मावळे स्वराज्यासाठी लढले आणि मेले सुद्धा... शिवरायांनी कधीही मस्जिद तोडण्यासाठी युध्द केल नाही... कधीही...

स.. म.. ज

आपण नेहमीच कोणाला तरी कुठल्या ना कुठल्या गोष्टी वरून *समजावत* असतो, आणि जर का आपण चळवळीत असु तर मग *समजावण* किंवा *समजून सांगण* हा आपला धंदाच बनुन जातो, असो इथ विषय तो नाहीये...  मुळात मला हा मुद्दा मांडायचा आहे की, आपल्या दैनंदिन जीवनात *"तुला समजलय का...??"*  *"तुला समजत नाही का...??"* *"मग तु समजावुन सांगायच ना...??"* *"ते मीच समजावुन सांगू शकतो...* अशा वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपण दिवसभर बोलत असतो, ऐकत असतो... तर कुठली ही गोष्ट परिपूर्ण अर्थाने समजण हे खुप गरजेच असत, आणि जर का त्या गोष्टी बद्दल आपणाला काही माहिती नसेल तर ती योग्य त्या व्यक्ति कडुन समजावून घ्यायची असते...           कारण, जिवनात *"समज"* ही खुप महत्वाची असते, मग ती कुठल्या ही गोष्टीची असो... किंवा आपण अस म्हणूया की पुर्ण जीवनच *"समजे"* वर अवलंबून असत...!!          आणि आपण चळवळीच्या अंगाने विचार केला तर पुर्ण चळवळच यावर आधारलेली आहे, कारण जर तुम्ही *"समजवण्यात"*  कमी पडलात अथवा अपयशी ठरलात तर चळवळीला फारसा अर्थ उरत नाही अस मला वाटत...    ...

#3

सध्याची देशातील परिस्थिती पाहून खुप अस्वस्थ आणि हतबल व्हायला होत...मोदी शाहा या दोन हिटलर प्रवृत्ती च्या हरामखोरांनी देशाला पार वेठीस धरलय...  पण, या दोघांच्या ताकदी समोर आपली ताकद कमी पडतेय हे आपल्याला मान्य करावच लागेल, आता आपण कुठे आणि कशाबाबतीत कमी पडतोय ते आपण स्वतःलाच विचारल पाहिजे... या दोघांसमोर आज कुठलाच विचारवंत व नेता त्याच ताकदीच आंदोलन उभ करण्यात यशस्वी होत नाही? जरी ह्या हुकूमशाही लोकांच अस्तित्व असत्यावर टिकलेल असल तरही तेच असत्य आज आपल्यावर भारी पडत आहे, आपल सत्य हे ते कमी पडतय...ते दाबल जातय, ते मारल जातय.  अशी कठीण प्रसंगात आपण सापडलो आहोत, याविरोधात आपल्याला कशा प्रकारे लढायच आहे हे आता ठरवण्याची वेळ येऊन ठेपली आहे... सत्यावर असत्य भारी पडताना दिसत आहे, कदाचित ते जिंकेल ही आणि त्याची किंमत ही फार भयंकर असेल हे लक्षात घ्या.  वेळ आहे एकजुटीची, वेळ आहे विचार करण्याची, वेळ आहे सत्याची निर्भय पणे कास धरण्याची, वेळ आहे असत्य लोकांना पटवून देण्याची  आणि ही ताकद आपण स्वतः मध्ये निर्माण करत नाही तोपर्यंत बदल निश्चित नाही मित्रांनो.  भविष्याचे पावल ओळखा...

लांड्या

एकेकाळी खुप गाजलेला शब्द... तस ह्या शब्दाला धार्मिकतेची किनार आहे आणि राजकारणी इतिहास सुद्धा...कट्टर हिंदुत्ववादी मंडळींकडून मुस्लीम लोकांना हिणवण्यासाठी हा शब्द वापरला जाई (जातो)...म्हणून ह्या शब्दाला धार्मिक आवरण चढल आहे...खरतर हा मराठी शब्द आहे...याचा वापर अशा पद्धतीने केला गेला हे दुर्दैवी आहे.               तर, माझ्या दृष्टीकोनातून लांड्या हा शब्द, मुस्लिम समाजातील पोषाखावरुन घेण्यात आला असावा... मुस्लिम समाजातील लोक हे पॅन्ट जरा आखुडच घालतात...ती त्यांची धार्मिक बाबा आहे त्याबद्दल आपणाला काही हस्तक्षेप असण वा अडचण असण याला काही अर्थ नाही... पण काही अंध हिंदुत्ववादी लोकांनी याचा राजकीय वापर केला... मग या शब्दावरून चिडवण, हिणवण सर्रास सुरू झाल... खरतर या चिडवण्याला आणि हिणवण्याला काहीच बेस नाही... यामागे निव्वळ द्वेष आणि कुत्सित भाव आहे, असो...           पण, आज जर आपण पाहिल तर आपणाला अस दिसून येईल की अखुड पॅन्ट घालण ही तर आज ची fashion झाली आहे... आणि जवळजवळ सर्वच तरूण मंडळी हे ह्या प्रकारी पॅन्ट घालत आहेत... मुली...