Posts

बुद्ध दृष्टी - 2

"अंगुलीमाल" हा भयंकर क्रूरकर्मा होता...लोकांची हत्या करून त्यांची बोटे छाटून तो त्या बोटांची माळ बनवत असे... प्रचंड दहशत या अंगुलीमाल ची पसरली होती... पण जेंव्हा या बद्दल बुद्धांना जेंव्हा समजल तेंव्हा बुद्ध लगेच त्याच्या कडे जाणण्यासाठी निघाले... त्याची बुद्धांना दया आली म्हणून बुद्ध त्याच्या दिशेने गेले... बुद्धांना पाहताच तो त्यांच्या दिशेने धावत गेला आणि शस्त्र उगारले पण, बुद्धांच्या जवळ जाताच त्यांच्या चेहर्‍यावरील मैत्री आणि करूणामय भाव पाहुन तो शांत झाला... बुद्धांनी त्याला उपदेश केला आणि त्या क्रूरकर्मा अंगुलीमाला ने शस्त्र खाली टाकले आणि तथागत बुद्धांना शरण गेला...  शेकडो लोकांची हत्या करणारा हा व्यक्ती तरी देखील बुद्धांनी त्याला माफ केल आणि त्याला उपदेश केला... आणि त्याला भिख्खू संघात देखील घेतल... याच कारण अस की, मुळातच त्या अंगुलीमाच्या मनामध्ये कुठे तरी करूणे चे बिज होतेच... खरंतर आपल्या सर्वांमध्ये उपजत करूणा आणि मैत्रीभाव असतोच... पण त्याचा शोध आपण कधी घेतलेलाच नसतो...म्हणूनच तर वाईट मार्ग आपण स्विकारत असतो... तुम्ही बघा प्रत्येक व्यसनी व्यक्ती कुठल्या ना कुठल्...

बुद्ध दृष्टी

* बुद्ध दृष्टी * सुखाच्या शोधासाठी मनुष्य आजन्म कष्ट उपसतो... धनसंचय करण्याकरिता तो अमाप कष्ट करतो...या सर्व कष्टाच उद्दिष्ट एकच असत ते म्हणजे "सुख मिळवणे"... आयुष्यभर आपल्याला क्षणिक सुख वारंवार मिळत असतात... पण प्रश्न आहे तो मनाच्या आत्मिक सुखाचा? जोपर्यंत मनाचे आत्मिक सुख मिळत नाही तो पर्यंत क्षणिक सुख हे निर्थक आहे... म्हणूनच तर त्याला क्षणिक म्हटल गेलय. दुःख हे आपल्या सोबतच जन्म घेत असत, "दुःख ही परग्रहावरील वस्तू नाही ती आपल्या मनातील एक भावना आहे, एक अवस्था आहे." राजघराण्यात जन्म झाला तरी देखील मिळत असलेली राजगादी त्यागून... संसारचा त्याग करुन... धनसंपत्ती चा त्याग करून तु दुखाःच मुळ शोधण्यासाठी गेलास. पैसा जवळ असेल तर हव ते सुख मी विकत घेईन...हा आमचा भ्रम तु सुरवातीलाच तोडुन टाकलास. मुळातच पैसा ही शौक पुर्ण करण्याची वस्तू आहे आत्मिक सुख देण्याची नव्हे. समस्त मानव जात "सुख" मिळवण्यासाठी ज्या गोष्टी मिळवते, ज्या गोष्टींकडे आयुष्यभर धावत असते त्याच गोष्टींकडे पाठ करूश तु "प्रवाहाच्या विरोधातला" हा प्रवास सुरू केलास. बोधी प्राप्त झाल्यान...

मनाचे विचार

सत्य परिस्थिती स्वीकारली की मनातील विचर देखील प्रवाही होतात...या प्रवाहा बरोबर मना मध्ये साचलेली अविचारांची च घान, नको असलेले विचार, दुसर्‍या लोकां बद्दलचे निरर्थक विचार हे आपोआपच निघुन जातात... सत्य परिस्थिती स्विकारणे म्हणजे काय करायला पाहिजे, तर ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत किंवा घडत असतात त्या पैकी कोणत्या निरर्थक आहेत आणि कोणत्या महत्त्वाच्या आहेत हे तपासून पाहायला हव... वाईट विचारांच्या आणि कपटी मन असलेल्या लोकांचा सामना आपल्या प्रत्येकालाच आपल्या जिवनात करावा लागतो पण या गोष्टी ह्या निरर्थक आहेत त्याच्या आपल्या जीवनावर अथवा मनावर फरक पडणारा नसतो पण त्या विचार करून आपण स्वतःच आपल मन दुःखी करत असतो...आपल्या सोबत लोक कसे वागतील कसे बोलतील या गोष्टी आपण बदलू शकत नाही पण आपण याकडे बघण्याचा आणि याबद्दल विचार करण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो...तरच आपल मन शांत होईल आणि नको असलेले वाईट विचार आणि निरर्थक गोष्टी आपल्या मनातुन निघुन जातील त्यासाठीच मनातील विचार हे प्रवाही असण गरजेच आहे... एखाद्या छोट्या डबक्या प्रमाणे आपल मन बनल की तिथे घाण जमा होईल, दुर्गंधी पसरेल म्हण...

डायरी विचारांची 1):- सुट्टी ची मज्जा

शालेय जीवनात असताना दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याची सुट्टी असे दोन विलोभनीय सुट्ट्यांचे प्रकार अनुभवत असताना त्या आनंदाने सद्गदित होणार्‍या मनाचे वर्णन करणे कठीणच... खरतर आज दिड वर्ष झाले आपण बंदिस्त स्वरूपातच आहोत...पण या सगळ्यात ही एकदातरी बालपणात जाऊन आपण रमायला हव. सहामाही आणि वार्षिक परिक्षेचा शेवटचा पेपर देऊन घरी परतताना चा जो आनंद होता तो ना शब्द व्यक्त करता येतो ना आज कुठल्या कृतीत...त्या दोन तीन महिन्यांच्या सुट्टीत गावी जाण्याची मज्जाच वेगळी, आज आपण कुठे कुठे फिरतो... लांब लांब जातो... पण लहानपणी आईवडीलां सबोत गावी जाण्यासाठी बसस्टँडवर बस ची वाट बघत बसणे, आई च्या मांडीवर बसून खिडकीतून डोकावून पळणारी झाडे पाहण... हे सगळे क्षण जिवनात एक वेगळीच अनुभूती देतात... जिवनभराच्या प्रवासासाठी या गोड आठवणींची शिदोरी कायम कामाल येते... आपणा सर्वांना सुट्टी जरी हवी हवीशी वाटत असली तरी...सुट्टीला मर्यादा असणच गरजेचे आहे हे आज मगे वळुन बघताना जाणवत आहे... खरतर कुठलीही गोष्ट मर्यादेत केली तरच ती योग्य होत असते...!! -बुद्धीसार शिकरे.  (डायरी विचारांची) प्रकरण -1

लोकशाहीचे विद्रुपीकरण आणि नवभारताचे वार्तांकन

लोकशाहीचे विद्रुपीकरण आणि नवभारताचे वार्तांकन देशा समोरील प्रमुख अडचणी, महत्त्वाचे प्रश्न आणि या सगळ्याकडे बघण्याची तरुणांची मानसिकता या सगळ्याच्या विचार केला तर आपल्याला असच दिसुन येईल की... बहुसंख्य तरुण हे भरकटलेले आहेत. त्यांना देश ही संकल्पना आणि लोकशाही याची समज आलेली दिसत नाही आहे. त्यांना भरकटवण्याचा प्रयत्न होतोय का??  जर असा प्रश्न आपल्याला पडत असेल तर...आपले विचार भक्कम असतिल तर कुठलीच शक्ति आपल्याला भरकटू शकत नाही.  पण मागिल दोन तीन वर्षात आपण पाहिल तर देशातील तरुणांची विचार शक्ती आणि देश व लोकशाही या कडे पाहण्याची त्यांची दृष्टी अत्यंत संकुचित झाली आहे...सोशल मीडियावर याला जबाबदार असू शकतो पण शेवटी आपण काय विचार करायचा आणि काय विचार करण गरजेचं आहे हे पुर्णपणे आपल्यावरच अवलंबून असत. देश म्हणजे फक्त सैनिक, युद्ध आणि सीमा व लोकशाही म्हणजे फक्त निवडणूका एवढच काय ते आजच्या तरूणांची देश आणि लोकशाही बद्दलची मानसिकता झाली आहे. टिव्ही वर जे दाखवल जातय आणि सोशल मीडियावर जे व्हायरल होतय तेच खर आहे आणि तेच सत्य आहे असा समज आजच्या तरुण पिढीचा झाला आहे. चिकित्सक वृतीचा प्रचंड अ...

धर्म आणि धम्म

मला लोक नेहमी विचारतात की धम्म आणि धर्म यातला फरक काय आहे...  खर तर या प्रश्नाच उत्तर हे फार विस्तृत आहे कारण धम्म आणि धर्म हा काय एका वाक्यात किंवा एका तासात समजुन सांगायची गोष्ट नाही, पण मला उत्तर देणे हे भाग असत आणि प्रत्येकाला तासनतास तेच सांगत यात खुप वेळ जातो त्यामुळे मी या प्रश्नावर चिंतन करून त्याचा सार काढला आणि मला माझ अपेक्षित उत्तर मिळाल...!! ते पुढीलप्रमाणे उत्तर  "धर्म जिथे धार्मिक स्थळ उभारतो तिथे फुल, धुप, अगरबत्ती आणि तत्सम पुजा पाठ करायचे दुकान असतात... आणि धम्म ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ बांधतो त्या ठिकाणी फक्त आणि फक्त विद्वत्ता वाढवणारे पुस्तकांचे दुकान असतात..!!" धर्म अंधश्रद्धेवर उभा असतं आणि धम्म हा तर्कशुद्ध विचाराची कास धरायला शिकवतो -Budhisar (BS)

स्वर्ग आणि नर्क

स्वर्ग आणि नर्क ह्या खुळचट आणि थोतांड कथा आहेत... पण स्वर्गाची कल्पना हि सगळी कडे सुखच सुख अशी केली आहे आणि नर्काची कल्पना ही दुःख भोगण्याचे ठिकाण अशी केली आहे...  तर, प्रत्यक्षात स्वर्ग आणि नर्क ह्या जागा आहेत तरी कुठे??  या अथांग पसरलेल्या ब्रम्हांडात त्यांच स्थान आहे तरी कुठे??  तर, आपली ही जी पृथ्वी आहे जिला पृथ्वी अस मनुष्य प्राण्याने नाव दिल आहे...ती पृथ्वीचा जर का या अथांग पसरलेल्या ब्रह्मांडातील स्वर्ग किंवा नर्क असेल तर...??  ज्या प्रकारे स्वर्गाची कल्पना केली गेली आहे त्या प्रकारे तर पृथ्वी नक्कीच स्वर्ग असु शकत नाही... ईथे दुःख आहे, निराशा आहे यातुन मनुष्य प्राणी मुक्त झालेला नाही...दुखः आपण जन्मताच सोबत घेऊन येत असतो...  तो नष्ट करण्याचा मार्ग आहे पण.....  तर मग हि पृथ्वी जर का नर्क असेल तर तिला आपण अथक परिश्रमाने करूणामय आणि चोहीकडे सुखच सुख असलेल्या स्वर्गात हिचे रूपांतर करावे लागेल...!!  -Budhisar (BS)