Posts

"प्रभाव"

भगवान बुद्ध म्हणतात...या जगातील प्रत्येक गोष्ट नश्वर आहे...या जगातील प्रत्येक गोष्टीला अंत आहे...हे जग परिवर्तनीय आहे. "प्रेम" ह्या विषया संबंधी माझी धारणा अशी आहे की, प्रेम देखील नश्वर आहे... ज्या प्रकारे प्रेम निर्माण होत, अगदी त्याच पद्धतीने ते नष्ट देखील होत... निर्माण होण आणि नष्ट होण या प्रक्रिया आहेत, आणि बुद्ध म्हणतात की, घडणार्‍या प्रत्येक क्रियेच्या पाठीमागे कार्यकारणभाव असतो... तसेच या मध्ये, "प्रभाव" हा घटक देखीर महत्त्वाची भूमिका बजावतो...आपल्याला एखाद्या व्यक्तीवर तेंव्हाच प्रेम होत जेंव्हा त्या व्यक्तीचा आपल्यावर "प्रभाव" पडतो... अगदी त्याच प्रकारे हा प्रभाव संपला किंवा नष्ट झाला... किंवा तो नष्ट होण्यास विविध कारणे निर्माण होत गेली की, प्रेम देखील नष्ट होत किंवा कमी होत जात...  अंगुलीमाल हा प्रचंड द्वेषाने उन्मत्त झालेला आणि नरसंहाराचा ज्याच्यावर "प्रभाव" होता त्या अंगुलीमाला वर निःशस्त्र भगवान बुद्धांनी "प्रेमाचा" त्यांच्याकडे असलेल्या करूणामय मनाचा प्रभाव पाडला आणि तो क्रूरकर्मा अंगुलीमाल समोर करुणेने ओतप्रोत भरलेले बु...

"जाणीव"

कुठल्या तरी गोष्टी चा त्रास होत असेल तर त्या गोष्टीतून मुक्त होण्यासाठी किंवा त्या त्रासदायक गोष्टीचा विरोध करण्यासाठी मनाचा निर्धार असण फार गरजेच असत... म्हणूनच तर, बाबासाहेबांनी म्हटल आहे "गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या" यातला "जाणीव" हा शब्द फार महत्त्वाचा वाटतो मला... कारण जाणिवे शिवाया सर्व अशक्यच, जाणिवच नसेल तर प्रत्यक्ष कृती तरी कशी होईल... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सगळे "इझम" सगळे "विचार" हे जाणीवा जागृत करण्यासाठी च तर आहेत...  मानवी मनामध्ये गुलामी (सर्वच) प्रती विरोधाच्या जाणीवा ह्या कोणताच मनुष्य बाहेरून "Install" नाही करू शकत... ती "जाणीव" स्वतःच्या मनामध्ये स्वतःच "Create" करावी लागते...त्यासाठीच तर जगामध्ये पुस्तक लिहली गेली... पुस्तकांमधील "Code" वाचुन मनामध्ये गुलामगिरी विरोधातील "Software" स्वतःच "Create" कराव लागत... ते बाहेरून मिळत नाही...!! -BS

क्रांति

तुम्हारी क्रांति मेरे घर के बाहर छोड़ के आओ, मेरा जिवन मैं जिस हाल में व्यतीत कर रही हू वो तुम्हारे क्रांती की परिभाषा को नहीं समज आएगा, तुम बस बोल सकते हो, तुम बस हमारा जिवन देख सकते हो, तुम बस हमारा जिवन लिख सकते हो, तुम जी नहीं सकते हमारा जिवन, "तुम" और "हम" में फरक है, तुम हमारे लिए काम करते हो जरूर, पर हमारे यहाँ तुम रहते नहीं, तुम रहते हो दुर कही किसी बेहतर जगह, हमारा संघर्ष जिंदगी जिने का है, इसी को लेकर तुम करते हो संघर्ष तुम्हारे मुताबिक, हमारे रोजमर्रा के संघर्ष से हमें रोटी तक नहीं मिलती कभी कभी, हमारा संघर्ष लिख कर तुम्हें PhD यां मिलती है...!! * -Budhisar Shikare *

बुद्ध दृष्टी - 2

"अंगुलीमाल" हा भयंकर क्रूरकर्मा होता...लोकांची हत्या करून त्यांची बोटे छाटून तो त्या बोटांची माळ बनवत असे... प्रचंड दहशत या अंगुलीमाल ची पसरली होती... पण जेंव्हा या बद्दल बुद्धांना जेंव्हा समजल तेंव्हा बुद्ध लगेच त्याच्या कडे जाणण्यासाठी निघाले... त्याची बुद्धांना दया आली म्हणून बुद्ध त्याच्या दिशेने गेले... बुद्धांना पाहताच तो त्यांच्या दिशेने धावत गेला आणि शस्त्र उगारले पण, बुद्धांच्या जवळ जाताच त्यांच्या चेहर्‍यावरील मैत्री आणि करूणामय भाव पाहुन तो शांत झाला... बुद्धांनी त्याला उपदेश केला आणि त्या क्रूरकर्मा अंगुलीमाला ने शस्त्र खाली टाकले आणि तथागत बुद्धांना शरण गेला...  शेकडो लोकांची हत्या करणारा हा व्यक्ती तरी देखील बुद्धांनी त्याला माफ केल आणि त्याला उपदेश केला... आणि त्याला भिख्खू संघात देखील घेतल... याच कारण अस की, मुळातच त्या अंगुलीमाच्या मनामध्ये कुठे तरी करूणे चे बिज होतेच... खरंतर आपल्या सर्वांमध्ये उपजत करूणा आणि मैत्रीभाव असतोच... पण त्याचा शोध आपण कधी घेतलेलाच नसतो...म्हणूनच तर वाईट मार्ग आपण स्विकारत असतो... तुम्ही बघा प्रत्येक व्यसनी व्यक्ती कुठल्या ना कुठल्...

बुद्ध दृष्टी

* बुद्ध दृष्टी * सुखाच्या शोधासाठी मनुष्य आजन्म कष्ट उपसतो... धनसंचय करण्याकरिता तो अमाप कष्ट करतो...या सर्व कष्टाच उद्दिष्ट एकच असत ते म्हणजे "सुख मिळवणे"... आयुष्यभर आपल्याला क्षणिक सुख वारंवार मिळत असतात... पण प्रश्न आहे तो मनाच्या आत्मिक सुखाचा? जोपर्यंत मनाचे आत्मिक सुख मिळत नाही तो पर्यंत क्षणिक सुख हे निर्थक आहे... म्हणूनच तर त्याला क्षणिक म्हटल गेलय. दुःख हे आपल्या सोबतच जन्म घेत असत, "दुःख ही परग्रहावरील वस्तू नाही ती आपल्या मनातील एक भावना आहे, एक अवस्था आहे." राजघराण्यात जन्म झाला तरी देखील मिळत असलेली राजगादी त्यागून... संसारचा त्याग करुन... धनसंपत्ती चा त्याग करून तु दुखाःच मुळ शोधण्यासाठी गेलास. पैसा जवळ असेल तर हव ते सुख मी विकत घेईन...हा आमचा भ्रम तु सुरवातीलाच तोडुन टाकलास. मुळातच पैसा ही शौक पुर्ण करण्याची वस्तू आहे आत्मिक सुख देण्याची नव्हे. समस्त मानव जात "सुख" मिळवण्यासाठी ज्या गोष्टी मिळवते, ज्या गोष्टींकडे आयुष्यभर धावत असते त्याच गोष्टींकडे पाठ करूश तु "प्रवाहाच्या विरोधातला" हा प्रवास सुरू केलास. बोधी प्राप्त झाल्यान...

मनाचे विचार

सत्य परिस्थिती स्वीकारली की मनातील विचर देखील प्रवाही होतात...या प्रवाहा बरोबर मना मध्ये साचलेली अविचारांची च घान, नको असलेले विचार, दुसर्‍या लोकां बद्दलचे निरर्थक विचार हे आपोआपच निघुन जातात... सत्य परिस्थिती स्विकारणे म्हणजे काय करायला पाहिजे, तर ज्या काही गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत किंवा घडत असतात त्या पैकी कोणत्या निरर्थक आहेत आणि कोणत्या महत्त्वाच्या आहेत हे तपासून पाहायला हव... वाईट विचारांच्या आणि कपटी मन असलेल्या लोकांचा सामना आपल्या प्रत्येकालाच आपल्या जिवनात करावा लागतो पण या गोष्टी ह्या निरर्थक आहेत त्याच्या आपल्या जीवनावर अथवा मनावर फरक पडणारा नसतो पण त्या विचार करून आपण स्वतःच आपल मन दुःखी करत असतो...आपल्या सोबत लोक कसे वागतील कसे बोलतील या गोष्टी आपण बदलू शकत नाही पण आपण याकडे बघण्याचा आणि याबद्दल विचार करण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो...तरच आपल मन शांत होईल आणि नको असलेले वाईट विचार आणि निरर्थक गोष्टी आपल्या मनातुन निघुन जातील त्यासाठीच मनातील विचार हे प्रवाही असण गरजेच आहे... एखाद्या छोट्या डबक्या प्रमाणे आपल मन बनल की तिथे घाण जमा होईल, दुर्गंधी पसरेल म्हण...

डायरी विचारांची 1):- सुट्टी ची मज्जा

शालेय जीवनात असताना दिवाळीची सुट्टी आणि उन्हाळ्याची सुट्टी असे दोन विलोभनीय सुट्ट्यांचे प्रकार अनुभवत असताना त्या आनंदाने सद्गदित होणार्‍या मनाचे वर्णन करणे कठीणच... खरतर आज दिड वर्ष झाले आपण बंदिस्त स्वरूपातच आहोत...पण या सगळ्यात ही एकदातरी बालपणात जाऊन आपण रमायला हव. सहामाही आणि वार्षिक परिक्षेचा शेवटचा पेपर देऊन घरी परतताना चा जो आनंद होता तो ना शब्द व्यक्त करता येतो ना आज कुठल्या कृतीत...त्या दोन तीन महिन्यांच्या सुट्टीत गावी जाण्याची मज्जाच वेगळी, आज आपण कुठे कुठे फिरतो... लांब लांब जातो... पण लहानपणी आईवडीलां सबोत गावी जाण्यासाठी बसस्टँडवर बस ची वाट बघत बसणे, आई च्या मांडीवर बसून खिडकीतून डोकावून पळणारी झाडे पाहण... हे सगळे क्षण जिवनात एक वेगळीच अनुभूती देतात... जिवनभराच्या प्रवासासाठी या गोड आठवणींची शिदोरी कायम कामाल येते... आपणा सर्वांना सुट्टी जरी हवी हवीशी वाटत असली तरी...सुट्टीला मर्यादा असणच गरजेचे आहे हे आज मगे वळुन बघताना जाणवत आहे... खरतर कुठलीही गोष्ट मर्यादेत केली तरच ती योग्य होत असते...!! -बुद्धीसार शिकरे.  (डायरी विचारांची) प्रकरण -1