अब याद ऐ भगता तेरी आती..!!
23 मार्च 1931 भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील खुप महत्त्वाचा आणि काळा दिवस ठरला. कारण याच दिवशी शहिद-ए-आजम भगतसींग, सुखदेव, राजगुरु या तीन महान क्रांतिकारकांना इंग्रजांन फाशी दिली...पण या तिन क्रांतिकारकां मध्ये सगळ्यात महत्त्वाचे होते भगतसींग कारण ईतक्या कमी वयात प्रचंड शौर्य, निडरपणा, अफाट आणि अचाट विचारशक्ती ती त्यांच्या कडे होती. ज्या गुन्ह्या संदर्भात त्यांना अटक झाली होती त्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा होऊ शकते हे त्यांना पक्क ठाऊक होत तरी देखील त्यांनी माघार घेतली नाही, कारण त्या मागे त्यांच देशावर किती प्रेम होत..देशाला स्वातंत्र्य करण्याची जिद्द होती हे दिसुन येत. आणि ते स्वतःहुन अटक झाले होते कारण त्यामागे त्यांचा वेगळाच डाव होता...आणि तो अत्यंत घातक असा डाव त्यांनी खेळला आणि ते यशस्वी देखील झाले. कारण भगतसींगानी म्हटल होत मेरे मरने के बाद..देश पर मरने वालो का सैलाब आऐगा. आणि तसच झाल शहीद भगतसींग यांना फाशी देऊन 17-18 वर्षातच भारत स्वातंत्र्य झाला... शहीद भगतसींग यांच्या...