अब याद ऐ भगता तेरी आती..!!

        23 मार्च 1931 भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील खुप महत्त्वाचा आणि काळा दिवस ठरला. कारण याच दिवशी शहिद-ए-आजम भगतसींग, सुखदेव, राजगुरु या तीन महान क्रांतिकारकांना इंग्रजांन फाशी दिली...पण या तिन क्रांतिकारकां मध्ये सगळ्यात महत्त्वाचे होते भगतसींग कारण ईतक्या कमी वयात प्रचंड शौर्य, निडरपणा, अफाट आणि अचाट विचारशक्ती ती त्यांच्या कडे होती. ज्या गुन्ह्या संदर्भात त्यांना अटक झाली होती त्या गुन्ह्यासाठी फाशीची शिक्षा होऊ शकते हे त्यांना पक्क ठाऊक होत तरी देखील त्यांनी माघार घेतली नाही, कारण त्या मागे त्यांच देशावर किती प्रेम होत..देशाला स्वातंत्र्य करण्याची जिद्द होती हे दिसुन येत. आणि ते स्वतःहुन अटक झाले होते कारण त्यामागे त्यांचा वेगळाच डाव होता...आणि तो अत्यंत घातक असा डाव त्यांनी खेळला आणि ते यशस्वी देखील झाले. कारण भगतसींगानी म्हटल होत मेरे मरने के बाद..देश पर मरने वालो का सैलाब आऐगा.  आणि तसच झाल शहीद भगतसींग यांना फाशी देऊन 17-18 वर्षातच भारत स्वातंत्र्य झाला...
          शहीद भगतसींग यांच्यावर  सुरवातीला कर्तारसींग सराभा यांचा प्रभाव पडला...कर्तारसींग सराभा हे गदर पक्षाचे क्रांतिकारक होते. गदर पार्टी 21 फेब्रुवारी 1915 रोजी ब्रिटीश सैन्या विरुद्ध सशस्त्र उठाव करणार होती पण त्यांच्यातलाच एक किरपालसींग नावाच्या सहकार्याने फितुरी केली आणि उठाव फसला त्यामुळे गदर पार्टी च्या क्रांतिकारकांना पकडण्यात आल...त्यात 20 वर्षाचे कर्तारसींग सराभा हे देखील होते..कर्तारसींग सराभांना जेव्हा न्यायालयासमोर उभ केल तेव्हा ते म्हणाले... "गुन्ह्यासाठी मला जन्मठेपेची शिक्ष मिळेल किंवा फाशीची शिक्षा दिली जाईल. पण जोपर्यंत हिंदुस्थान स्वातंत्र्य होत नाही तोपर्यंत पुन्हा पुन्हा जन्म घेऊन फासावर लटकत राहीन हि माझी अंतिम ईच्छा आहे.." 
          अशा महान देशभक्त क्रांतिकारकांचा भगतसींग यांच्यावर प्रभाव पडल्याशिवाय कसा राहील... कर्तारसींग सराभा यांना 16 सप्टेंबर 1915 रोजी फाशी देण्यात आली. तेंव्हा भगत सींग आठ वर्षाचे होते...आणि जालीयनवाला बाग हत्याकांड झाल्यापासुन ते प्रत्यक्ष स्वातंत्र्य लढ्यात उतरले..
भगतसींग यांच जस-जस वाचन वाढत गेल तस-तस त्यांच्यावर अनेक विचारवंताचा प्रभाव पडत गेला त्यापैकिच एक होते.. काॅम्रेड व्लादिमीर लेनिन.
अगदी आयुष्याच्या शेवटच्या क्षणी देखील भगतसींग वाचन करत होते...भगतसींग यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा देखील प्रभाव होता...म्हणूनच भगतसींग यांना अस वाटत होत कि भारताच्या संपुर्ण स्वातंत्र्यासाठी राजकीय स्वातंत्र्या बरोबरच, आर्थिक समतेची ही गरज आहे. अस त्यांच स्पष्ट मत होत... भारताला स्वातंत्र्य करण्याच नुसतच स्वप्न त्यांनी पाहील नाही तर ते सत्यात देखील उतरवल...स्वतंत्र भारत कसा असेल याचा विचार सुद्धा भगतसींगानी केला होता...आपल्या देशात आपल्याच लोकांच राज्य आल्यानंतर तिथली राज्यव्यवस्था..शासनव्यवस्था..समाजव्यवस्था कशी असेल याचा विचार त्यांन आगोदरच केला होता..
        भगतसींग आणि असंख्य ज्ञात-अज्ञात क्रांतिकारकांच्या रक्तान लाल झालेल हे स्वातंत्र्य आपल्याला मीळाल...पण, खरच संपुर्ण स्वातंत्र्य मिळाल आहे का..? खर्या अर्थान ईन्कलाब आलाय का..? क्रांतिकारकांच्या अथक प्रयत्नांनी भारत देश स्वातंत्र्य झाला..आणि आज आपण स्वतंत्र भारतात वावरु शकतो...पण आजही भारतामध्ये अनेक प्रकारची गुलामी पाहायला मिळते...पुर्णपणे गुलामी मुक्त भारत आजही झाला नाही...हजारो हुतात्म्यांनी बलीदान देऊन मिळऊन देलल हे स्वातंत्र्य ठिकऊन ठेवण्यात खरच आपण समर्थ आहोत का..?? का आपणच कुठेतरी कमी पडतोय..या शुर हुतात्म्यांचा वारसा पुढे घेऊन जान्यामध्ये. आज देश स्वातंत्र्य होऊन सात दशक लोटली तरी भुकमरी ने मरणार्यांची संख्या काय कमी होत नाही...गरिबी वाढतच जात आहे..बेरोजगारी कमी व्हायच नाव घेत नाही.. देशासमोर हे व असे असंख्य प्रश्न आजही आहेत...कारण ईथला तरुन मोठ्याप्रमाणावर जागृत नाही...भगतसींग यांना फाशी दिली तेंव्हा त्यांच वय फक्त 23 वर्ष होत..आणि आजचा तरुन कुठ आहे...त्याला देशाबद्दल काही आत्मीयता उरलीय का नाही..?? आजच्या तरुनाने नोकरी..घर..संसार यांमध्ये गुरफटुन न जाता थोडा देशाचा देखील विचार केला पाहिजे.
            3 मार्च 1931 रोजी भगतसींग, सुखदेव, राजगुरु यांचे कुटुंबीय त्यांना भेटण्यासाठी लाहोर जेल ला गले...भगतसींग यांन आधिच कळल होत कि हि भेट त्यांची शेवटची भेट आहे..म्हणून त्यांनी आईला म्हटल कि "बेबिजी मेरी लाश लेने आप मत आना..कुलबीर को भेज देना..कही आप रो पडी तो लोग कहेंगे कि भगतसींग कि मा रो रही है..!!"
ईतक प्रचंड शौर्य आणि देशाबद्दल प्रेम आपल्यात ही असायला पाहिजे..भगतसींग यांच्या शौर्याचा आणि त्यांच्या सामाजिक, राजकीय व अर्थ विषयक विचारांचा थोडासा जरी अंश आपन घेतला तरी पुरेसा आहे..या देशाच्या हितासाठी.
       पण खरच शहीद भगतसींग यांच्या स्वप्नातला स्वतंत्र भारत देश निर्माण झालाय का..?? जे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भगतसींगानी बलिदान दिल..आज त्याच स्वतंत्र भारतात खुलेआम अभिव्यक्ती ची गळचेपी होताना दिसत आहे.
भारताच्या स्वातंत्र्य बद्दल दोन वाक्य खुप बोलकी आहेत
"स्वातंत्र्य कुण्या गाढवीच नाव हाय"
"स्वातंत्र्याच झाल काय तुमच्या-आमच्या पर्यंत आलच नाय"
भारताच्या स्वातंत्र्या बद्दल हे दोन वाक्य महत्वाचे आणि मार्मिक आहेत...कारण ह्या वाक्यातुन खर्या भारताच रुप कळत.. भारत देश स्वातंत्र्य झाला आणि दुसर्याच दिवशी आण्णाभाऊ साठे यांनी मोर्चा काढला होता.  आज देशाला स्वातंत्र्य होऊन सात दशक लोटली तरी ईथल्या सामान्य जनतेचे मोर्चे काय कमी झाले नाहीत...काही दिवसांपुर्वी नाशिक ते मुंबई शेतकर्यांचा निघालेला पायी लाॅंग मार्च...त्यामध्ये एक मागणी होती कि जीर्ण झालेले राशन कार्ड बदलुन द्या..बघा काय गम्मत आहे साध राशन कार्ड बदलुन मिळाव व यासंबधी सरकारने दखल घ्यावी यासाठी 200 किलोमीटर चालाव लागल...किती भयानक चित्र आहे ना स्वातंत्र्य भारताच.
                विचारस्वात्र्यासाठी लढणार्या..अभिव्यक्तीच्या रक्षण कर्त्याची भरदिवसा गोळ्या घालुन हत्या याच स्वातंत्र्य भारतात होते..हे पाहुन कस म्हणाव कि खरच आपला देश स्वातंत्र्य आहे...  जे भगतसींगाना आणि बाबासाहेबांना अभिप्रत अस स्वातंत्र्य होत ते आजही मिळालेल नाही..
आज देशात अनेक छोटे-मोठे प्रश्न आहेत... विजय माल्या, निरव मोदी, शिष्यवृत्ती घोटाळा, आदर्श घोटाळा, 2G स्पेक्ट्रम पासुन ते गल्लीतले रस्ते निट नाहीत, नाल्या स्वच्छ नाही, कचरा व्यवस्थापन निट नाही...शेतकर्यांचे, कामगर-मजुरांचे, आगंणवाडी सेविकांचे, विद्यार्थ्यांचे, महीलांचे, माहागाई असे अनगिनत प्रश्न आज देशासमोर आहेत..आणि सद्यस्थीतीला देश पुर्ण पणे या समस्यांने होरपळुन निघतोय...पण ईथल राजकारण करणारे लोक सामान्या जनतेच जाती-धर्माच भांडण लावुन लक्ष विचलीत करण्याच काम करत आहेत.
        पण खरच, शहिद-ए-आजम भगतसींग तुमच्या स्वप्नातला भारत देश आणखीन घडायचा आहे..आणि ती जबाबदारी आमची आहे...ज्या लोकांचा भारताच्या स्वातंत्र्य लढ्याशी काडीचाही संबंध नव्हता..ईतकच काय तर ज्यांनी ईंग्रजांची हुजुरेगीरी केली, इंग्रजांच बुट चाटल, जे लोक इंग्रजांचे चमचे बनुन राहीले पण भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही अशा विचारांच्या लोकांचे वारसदार आज तुमच्या(भगतसींग) नावाचा जयघोष करत आहेत...त्यात त्यांच राजकिय हीत आहे..असो, पण तुमचे विचार ह्या पिलावळींना पेलणरच नाहीत...तुम्ही स्वतः ठणकाऊन सांगत होतात कि मी नास्तिक आहे...तुम्ही जात-धर्म न मानणारे होतात...देवाची-धर्माची विधायक चिकीत्सा करणारे होतात...पण हे जे धर्माचे ठेकेदार लोक आहेत ते पण तुमच्या फोटोचा वापर आपल्या राजकीय स्वार्थ साठी करत आहेत... इंग्रजांच राज्य गेल आणि त्यांच्या चमच्यांच राज्य आल अशी परिस्थिती सध्या देशात निर्माण झाली आहे.
    भगतसींग...तुमचे धर्माविषयीचे विचार आणखीन ही ईथल्या जनतेला कळलेच नाहीत...तुम्ही देशासाठी शहीद झालात एवढच माहिती आहे ईथल्या लोकांना... पण त्यापलीकड जाऊन तुम्ही एक विचारवंत, द्रष्टा नेता, पत्रकार, गाढे अभ्यासक, लेखक होतात हे खुप कमी लोकांना माहिती आहे... तुमच साहित्य आजही दुर्लक्षीतच आहे...काॅंग्रेस चे तत्कालीन नेते पट्टाभिसितारमय्या यांनी लिहीलेल्या _भारतीय राष्ट्रीय काॅंग्रेस का ईतीहास_ या ग्रंथाथ लिहीले आहे- "यह कहना अतिशयोक्ती नही होगी कि उस क्षण भगतसींग का नाम पुरे भारत मे उतना ही व्यापक तौर पर जाना जाता था और उतना हि लोकप्रिय था जितना गांधी का."
ब्रिटीश सरकार च्या गुप्तहेर खात्याच्या अहवालात अस म्हटल होत कि- "काही काळ तर देशातील सर्वात आघाडीचा नेता म्हणून गांधींना भगतसींग मागे टाकेल, अशी परिस्थिती होती."
हे ईतक प्रचंड मोठ व्यक्तीमत्व असताना...आजही काही लोकांना तुमच्या विषयी फार माहिती नाही...याच कारण तुमच्या विषयी तेवढच शिकवल गेल आहे...आभ्यासक्रमात तुमच्या विषयी जास्त माहीती नाही...हे दुर्दैव आहे, पण ज्यांनी-ज्यांनी भगतसींग वाचलेला असलेल त्या प्रत्येक व्यक्ती ची जबाबदारी आहे कि..त्याने भगतसींग लोकांसमोर आणावा..कारण आज या देशाला भगतसींगाच्या राजकीय, सामाजिक आणि अर्थ विषयक विचारांची खुप गरज आहे.
भगतसींग, तुम्हाला सांगावस वाटत कि तुम्ही जे आझाद भारताच स्वप्न पाहील होत ते आद्याप पर्यंत पुर्ण झालेल नाही...ह्या देशात ज्या फॅसीस्ट, प्रतिगामी शक्ती आहेत त्यांच्यामुळे..त्यांच्या राजकीय स्वार्था मुळे ह्या देशाच वाटोळ झाल..पण मला अस वाटत, कि देशाच्या र्हासाला जितके हे फॅसीस्ट,प्रतिगमी लोक जबाबदार आहेत...तितकच कमी-अधिक प्रमाणात *स्वतःला पुरोगामी समजणारे...तुमच्या(भगतसींग)विचारांचा वारसाहक्क गाजवणारे...आणि डाव्या विचारांचे* जे लोक आहेत..ते सद्धा तितकेच जबाबदार आहेत...कारण, या देशाच आम्हाला भल करायच आहे पण आम्हाला राजकारणात यायच नाही..अशी आमची मानसिकता झाली आहे...आणि राजकारण वाईट आहे अस लेबल लावुन आम्ही मोकळे होतो, आणि भलत्याच लोकांच्या हातात देश देतो...खरतर आज राजकीय क्षेत्रा मध्ये जेवढे चांगले लोक असयला पाहिजे तेवढे नाहीत..ही तर शोकांतिका आहे...आणि भारताच्या वाटोळ होण्याच हे एक मुख्य कारण आहे..
म्हणूनच तर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल होत कि.. "जा आणि तुमच्या घराच्या भिंतीवर लिहुन ठेवा कि तुम्हाला ईथली शासन कर्ती जमात बनायच आहे.
बाबासाहेब असो किंवा भगतसींग यांना माहीती होत कि या देशाच आणि ईथल्या सामान्य जनतेच हित जर कशात असेल तर ते फक्त राजकारणातच आहे..पण भारतातल राजकीय क्षेत्र गढूळ झालय किंवा आपण असु म्हणू या कि ते क्षेत्र तुंबल आहे...त्याला प्रवाहाची गरज आहे म्हणून आपण त्याच्यात उतरलच पाहिजे...बाबासाहेबांच्या आणि भगतसींगाच्या वैचारिक ईमानदार वारसदारांनी ते क्षेत्र काबीज करुन या दोन महामानवांच्या स्वप्नातला भारत देश घडवायचा प्रामाणिक प्रयत्न करुया..
भगतसींगाचा भारत देश वाचवायचा असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानानुसारच हा लढा लढायला हा..आज संविधान सुद्धा धोक्यात आहे...भारताच स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी संविधानाच्या चौकटीत राहुनच हे युद्ध लढायच आहे..
भगतसींग म्हणतात कि, "पिस्तोल और बम ईन्कलाब नही लाते, बल्की ईन्कलाब कि तलवार विचारोंकि सान पर तेज होत है...ओर यही चिज थी जिसे हम प्रकट करना चाहते थे..!!
आणि आजही आम्ही ईथल्या प्रस्थापीत भांडवली, फॅसीस्ट व्यवस्थे विरुद्ध अहिंसक आणि संवैधानिक मार्गानेच लढतोय.. कारण आज आमच्या कडे सगळ्यात मोठ शस्त्र आहे आणि ते म्हणजे, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल संविधान..!!
पुन्हा एकदा..शहीद-ए-आजम भगतसींग, सुखदेव, राजगुरु यांना विनम्र अभिवादन
जय भीम..ईन्कलाब जिंदाबाद
                 -बुद्धीसार शिकरे
                 (9657172236)

Comments

Popular posts from this blog

नेता कसा असावा...नसावा

"प्रभाव"

क्रांति