"प्रभाव"
भगवान बुद्ध म्हणतात...या जगातील प्रत्येक गोष्ट नश्वर आहे...या जगातील प्रत्येक गोष्टीला अंत आहे...हे जग परिवर्तनीय आहे.
"प्रेम" ह्या विषया संबंधी माझी धारणा अशी आहे की, प्रेम देखील नश्वर आहे... ज्या प्रकारे प्रेम निर्माण होत, अगदी त्याच पद्धतीने ते नष्ट देखील होत... निर्माण होण आणि नष्ट होण या प्रक्रिया आहेत, आणि बुद्ध म्हणतात की, घडणार्या प्रत्येक क्रियेच्या पाठीमागे कार्यकारणभाव असतो...
तसेच या मध्ये, "प्रभाव" हा घटक देखीर महत्त्वाची भूमिका बजावतो...आपल्याला एखाद्या व्यक्तीवर तेंव्हाच प्रेम होत जेंव्हा त्या व्यक्तीचा आपल्यावर "प्रभाव" पडतो... अगदी त्याच प्रकारे हा प्रभाव संपला किंवा नष्ट झाला... किंवा तो नष्ट होण्यास विविध कारणे निर्माण होत गेली की, प्रेम देखील नष्ट होत किंवा कमी होत जात...
अंगुलीमाल हा प्रचंड द्वेषाने उन्मत्त झालेला आणि नरसंहाराचा ज्याच्यावर "प्रभाव" होता त्या अंगुलीमाला वर निःशस्त्र भगवान बुद्धांनी "प्रेमाचा" त्यांच्याकडे असलेल्या करूणामय मनाचा प्रभाव पाडला आणि तो क्रूरकर्मा अंगुलीमाल समोर करुणेने ओतप्रोत भरलेले बुद्ध पाहुन त्यांना शरण गेला...
हा सर्व प्रकार मला "प्रभाव" ह्या एकाच गोष्टीचा वाटतो आणि हा प्रभाव कालानुरूप कमी देखील होत असतो...तो टिकवून ठेवण्याची त्या त्या विषयाला धरून वेगळी कारणे आणि प्रकिया आहे...!!
-Budhisar Shikare
Comments
Post a Comment