Posts

Showing posts from April, 2018

न्याय...!!

            न्याय...!! असिफा...तुझयावर झालेल्या अत्याचाराबद्दल ऐकल आणि मन एकदम सुन्न झाल, खुप अस्वस्थ वाटायला लागल...तुझ्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल मनात खुप चिड निर्माण झाली आहे ह्या व्यवस्थे बद्दल..म्हणून मनातील चिड आणि आक्रोश व्यक्त करण्यासाठी हे लिहण्याच खटाटोप करत आहे..! देशाच्या न्यायव्यवस्थेवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत..ते या बलात्कारांच्या घटनांमुळे...त्यातल्यात्यात आपल्या देशामध्ये जात बघुन ठरवतात कि आवाज उठवायचा कि नाही ते..पण आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाही आणि संविधानावर विश्वास असणारी लोक आहोत म्हणून आम्ही जोपर्यंत तुला न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही न्याय मागत राहु. देशात कुठेही बलात्काराची घटना घडली कि आपण म्हणतो कि, जर ती आपल्याच घरातली एखादी असती तर आपण स्वस्थ बसलो असतो का..! अस आण म्हणत असतो पण, जर आपल्यात मानुसकी असेल तर अत्याचार झालेली स्त्री आपल्या घरातली असण गरजेच...