न्याय...!!
न्याय...!!
असिफा...तुझयावर झालेल्या अत्याचाराबद्दल ऐकल आणि मन एकदम सुन्न झाल, खुप अस्वस्थ वाटायला लागल...तुझ्यावर झालेल्या अत्याचाराबद्दल मनात खुप चिड निर्माण झाली आहे ह्या व्यवस्थे बद्दल..म्हणून मनातील चिड आणि आक्रोश व्यक्त करण्यासाठी हे लिहण्याच खटाटोप करत आहे..!
देशाच्या न्यायव्यवस्थेवर वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत..ते या बलात्कारांच्या घटनांमुळे...त्यातल्यात्यात आपल्या देशामध्ये जात बघुन ठरवतात कि आवाज उठवायचा कि नाही ते..पण आम्ही बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाही आणि संविधानावर विश्वास असणारी लोक आहोत म्हणून आम्ही जोपर्यंत तुला न्याय मिळत नाही तो पर्यंत आम्ही न्याय मागत राहु.
देशात कुठेही बलात्काराची घटना घडली कि आपण म्हणतो कि, जर ती आपल्याच घरातली एखादी असती तर आपण स्वस्थ बसलो असतो का..! अस आण म्हणत असतो पण, जर आपल्यात मानुसकी असेल तर अत्याचार झालेली स्त्री आपल्या घरातली असण गरजेच नाही...मानवतेच्या नात्यान अत्याचार झालेल्या स्त्री साठी आवाज उठवणे आपल कर्तव्य आहे मग ती स्त्री कोणत्याही जाती-धर्माच असो..आपली कुणी नातेवाईक असो किंवा नसो तिच्या न्याया साठी झगडण हे आपल कर्तव्य मानल पाहिजे.
असिफा...तु आमच्या प्रांतातील नव्हतीस...तु आमची भाषा बोलत नव्हतीस...तुझा आणि आमचा काडीचाही संबंध नाही, पण तुझ्याशी आपलेपणाच नात निर्माण झालय..तु माझ्याच घरातली कोणी तरी आहेस अस वाटत आहे..पण तु आज या जगात नाही याच तिव्र दुःख होत आहे.
तुझ वय फक्त आठ वर्षाच, तु किती स्वप्न रंगवली असशील तुझ्या मनात...पण ईथल्या पाशवी निच षुरुषी मानसिकतेने तुझ्या सगळ्या स्वप्नांचा चुराडा केला..कळी खुलायच्या आतच खुडुन टाकली गेली.
तुझ्यावर सतत आठ दिवस सामुहिक बलात्कार केला गेला आणि तो ही एका मंदिरात..देवावर माझा विश्वास नाहीच परंतु आज ते परत एकदा सिद्ध झालय कि देव नावाची कल्पना या जगात अस्तित्वात नाही...पण जे माननारे आहेत विचाराव वाटत आहे कि, एका आठ वर्षाच्या चिमुरडीवर सामुहिक बलात्कार होत होता तोही त्या तुमच्या तथाकथित देवासमोर तरीही त्या निष्ठुर देवाला कशी काय दया आली नाही...कातुमचा दे सुद्धा तुमच्या सारखाच जातियवादी आहे..
असिफा...तुला न्याय मिळेल कि नाही हे येणारी वेळच ठरवेल..कारण ईथली न्याय व्यवस्था सुद्धा त्या दगडाच्या देवासारखी जातियवादी झाली आहे.
निर्भया च्या वेळेस जो देशभरात प्रचंड आक्रोश पाहायला मिळाला होता..तितक्या प्रमात सुद्धा आक्रोश तुझ्यावेळेस पाहायला मिळत नाही...कारण तुम्ही जात आडवी आली..नाही तर आख्खा देश पेटुन उठला असता..देशातील मानसिकता प्रचंड प्रमाणावर जातियवादी आणि आराजक होत चालली आहे...खैरलांजीतील सुरेखा आणि प्रियंकाच्या वेळेस सुद्धा तेच झाल आणि आता तुझ्या सोबत तेच होताना दिसत आहे...कारण तुमच्या दोघी मध्ये एक साम्या आहे ते म्हणजे खालच्या जातीच...म्हणूनच कि काय तुमच्या साठी म्हणावा तेवढा आक्रोश दिसला नाही...माफ करा आम्हाला.
ईतकी हैवानियत कुठुन येते..डोक्यात कुठुन येत एव्हढ जतीच विष...कि समोर आठ वर्षाच लेकरु आहे हे देखील विसरुन जातो.
असिफा...तुझ्या बलात्कार्यांना शिक्षा होऊ नये म्हणून काही लोक तिरंगा हातात घेऊन रस्त्यावर उतरले... का..? तर तु त्यांच्या जातीची नव्हतीस म्हणून...देशाच्या एकात्मतेच व्याख्याच बदलुन टाकली आहे ह्या लोकांनी...मला त्या तिरंगा हातात घेतलेल्या दहशतवाद्याला सांगायच आहे कि..आसिफा पण याच देशातली होती ना...मग तिच्या साठी उठव कि आवाज तिरंगा हातात घेऊन. पण असिफा आमची होती आणि आम्ही तिच्या साठी शेवटपर्यंत न्याय मागणर.
कोपर्डीच्या पिडीतेवर जेव्हां अत्याचार झाला तेंव्हा संपुर्ण मराठा समाज रस्त्यावर उतरला लाखोंचे मोर्चे काढले गले...पण आपण शिवाजी माहाराजांना मानतो पण त्यांच्या विचारांना आत्मसात करत नाही...कारण शिवाजी महारज एका मुस्लीम स्त्री बद्दल काय उद्गार काढतात..." अशिच सुंदर असती आमची आई रुपवती..आम्ही ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती."
हे असे परस्त्रीचा आणि ते ही मुस्लीम स्त्री चा सन्मान करणारे शिवाजी महाराज होते..पण त्यांचा पाईक म्हणवुन घेणारे त्यांच्या विचारांना तिलांजली देताना दिसत आहेत.
चला एक होऊया असिफा साठी ...!!!
चला एक होऊया असिफाला न्याय मिळवुन देण्यासाठी...!!
-बुद्धीसार शिकरे
9657172236
Comments
Post a Comment