शिवराय आमची अस्मिता
काल राम मंदिराच भूमिपूजन नरेंद्र मोदींच्या हस्ते झाल... त्यात भाषणा दरम्यान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा उल्लेख केला... म्हणजे जे कोणी लोक या बाबारी मशीद पाडण्यापासुन ते भुमिपुजना पर्यंत जे जे लोक या आंदोलनात सहभागी होते त्या सर्वांना मोदींनी मावळा अस म्हटल आहे...आता कार्यकर्त्यांना मावळा बनवून ते स्वतःला शिवाजी महाराज तर समजत नसावेत ना...?? नाही म्हणजे यागोदर त्यांच्या काही लोकांनी महाराजांच्या फोटीशी मोदींचा फोटो जोडुन बरोबरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे... तर, माझा राम मंदिर भुमिपुजनाला आक्षेप नाही... त्यात मोदींनी केलेल्या भाषणाला देखील आक्षेप नाही फक्त मावळ्यांचा आणि शिवरायांचा मुद्दा सोडून... कारण, शिवरायांच स्वराज्य हे कधीच धार्मिकतेवर आधारीत नव्हत... शिवरायांच्या स्वराज्यात धार्मिक उन्मादाला थारा नव्हता... मावळे स्वराज्यासाठी लढले...प्रसंगी त्यांनी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली... स्वराज्यात कधीही हिंदू मुस्लिम भेदभाव नव्हता... अनेक मुस्लिम मावळे स्वराज्यासाठी लढले आणि मेले सुद्धा... शिवरायांनी कधीही मस्जिद तोडण्यासाठी युध्द केल नाही... कधीही...