शिवराय आमची अस्मिता

काल राम मंदिराच भूमिपूजन नरेंद्र मोदींच्या हस्ते झाल...
त्यात भाषणा दरम्यान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि मावळ्यांचा उल्लेख केला... म्हणजे जे कोणी लोक या बाबारी मशीद पाडण्यापासुन ते भुमिपुजना पर्यंत जे जे लोक या आंदोलनात सहभागी होते त्या सर्वांना मोदींनी मावळा अस म्हटल आहे...आता कार्यकर्त्यांना मावळा बनवून ते स्वतःला शिवाजी महाराज तर समजत नसावेत ना...??  नाही म्हणजे यागोदर त्यांच्या काही लोकांनी महाराजांच्या फोटीशी मोदींचा फोटो जोडुन बरोबरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे... 

तर, माझा राम मंदिर भुमिपुजनाला आक्षेप नाही... त्यात मोदींनी केलेल्या भाषणाला देखील आक्षेप नाही फक्त मावळ्यांचा आणि शिवरायांचा मुद्दा सोडून... 

कारण, शिवरायांच स्वराज्य हे कधीच धार्मिकतेवर आधारीत नव्हत... शिवरायांच्या स्वराज्यात धार्मिक उन्मादाला थारा नव्हता... मावळे स्वराज्यासाठी लढले...प्रसंगी त्यांनी स्वराज्यासाठी प्राणाची आहुती दिली... स्वराज्यात कधीही हिंदू मुस्लिम भेदभाव नव्हता... अनेक मुस्लिम मावळे स्वराज्यासाठी लढले आणि मेले सुद्धा... शिवरायांनी कधीही मस्जिद तोडण्यासाठी युध्द केल नाही... कधीही मुस्लिम वस्त्या उद्वस्त केल्या नाहीत... शिवरायांचा स्वराज्यात जेवढा मान हिंदूंना होता तितकाच मुस्लिम समाजाला देखील होता... शिवराय हे सर्व समाजाचे छत्रपती होते म्हणून सर्व समाजातील लोक त्यांच्यासाठी प्रसंगी जीव द्यायला देखील मागे पुढे पाहत नसत... 

जर, अस शिवरायांच स्वराज्य असेल आणि अशा स्वराज्यासाठी मावळे लढले असतील तर... राममंदिर या मुस्लिम द्वेष चिकटलेल्या प्रकरणात जाणिवपूर्वक शिवरायांचा आणि मावळ्यांचा उल्लेख करण हा मी छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि मावळ्यांचा अपमान समजतो...

जर आपण शिवाजी महाराजांना मानत असु तर पहिलाच नियम हा असतो की आपण कुठल्याही समाजाचा द्वेष नाही केला पाहिजे... रामाच्या नावाने हजारो मुस्लिमांच्या कत्तली करण्यात आल्या... हे आवडल असत का शिवाजी महाराजांना...?? 

    मोदी आणि त्यांची कंपनी वारंवार जाणूनबुजून शिवाजी महाराजांच्या इतिहासाच विद्रुपीकरण करत आहे... खोटा आणि द्वेषमुलक इतिहास समाजासमोर ठेवत आहे... आणि हे घातक आहे...

पण आम्ही हा प्रयत्न यशस्वी होऊ देणार नाही... 
कारण शिवराय हे आमची अस्मिता आहे...!! 
       -बुध्दीसार शिकरे 

जय जिजाऊ जय शिवराय

Comments

Popular posts from this blog

नेता कसा असावा...नसावा

"प्रभाव"

क्रांति