Posts

Showing posts from September, 2020

स्वयंप्रकाशीत व्हा...!!

एक इमारत आहे त्या इमारती मधुनच सर्वांची सर्व कामे होतात... आणि सर्व काही त्याच इमारती मधुन निश्चित होत असत..केल जात, आणि सर्व निर्णय घेण्यासाठी त्या इमारती मध्ये जाण्यासाठी लोक निवडुन दिली जातात... आता त्या इमारती मध्ये निवडून जाण्यासाठी कोणीही निवडणूक लढवु शकतो... पण आज जर आपण बघितल तर आपल्याला अस दिसेल की, इमारतीच्या आत मध्ये निर्णय घेणारा एक वर्ग आहे आणि इमारतीच्या बाहेर निर्णय व्हावे यासाठी जिवनभर आंदोलने आणि संघर्ष करणारा एक वर्ग आहे...  तर, आपण इमारतीच्या बाहेरचा जो वर्ग आहे आंदोलन करणारा त्याबद्दल बोलुयात... आजपर्यंत या वर्गाने कधीही इमारतीत जाऊन निर्णय प्रक्रियेचा भाग बनण्याच्या प्रयत्न केला नाही...मी ही विभागवारी तीन प्रकारे करतो, इमारती मधील वर्ग... इमारती बाहेरील वर्ग आणि जनता  या तीन प्रकारात मी वर्गवारी करतो.          जनता या वर्ग प्रकारात अजुन काही घटक आपण जोडू शकतो...जसे की,  कामगार, श्रमीक, मजुर, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, इत्यादी. आता या सर्व प्रतिवर्गाचा एक एक प्रतिनिधी असतो... नेता असतो तो नेहमीच या लोकांच्या साठी आंदोलने करत अस...