स्वयंप्रकाशीत व्हा...!!
एक इमारत आहे त्या इमारती मधुनच सर्वांची सर्व कामे होतात... आणि सर्व काही त्याच इमारती मधुन निश्चित होत असत..केल जात, आणि सर्व निर्णय घेण्यासाठी त्या इमारती मध्ये जाण्यासाठी लोक निवडुन दिली जातात... आता त्या इमारती मध्ये निवडून जाण्यासाठी कोणीही निवडणूक लढवु शकतो... पण आज जर आपण बघितल तर आपल्याला अस दिसेल की, इमारतीच्या आत मध्ये निर्णय घेणारा एक वर्ग आहे आणि इमारतीच्या बाहेर निर्णय व्हावे यासाठी जिवनभर आंदोलने आणि संघर्ष करणारा एक वर्ग आहे...
तर, आपण इमारतीच्या बाहेरचा जो वर्ग आहे आंदोलन करणारा त्याबद्दल बोलुयात... आजपर्यंत या वर्गाने कधीही इमारतीत जाऊन निर्णय प्रक्रियेचा भाग बनण्याच्या प्रयत्न केला नाही...मी ही विभागवारी तीन प्रकारे करतो, इमारती मधील वर्ग... इमारती बाहेरील वर्ग आणि जनता
या तीन प्रकारात मी वर्गवारी करतो.
जनता या वर्ग प्रकारात अजुन काही घटक आपण जोडू शकतो...जसे की,
कामगार, श्रमीक, मजुर, कर्मचारी, शेतकरी, शेतमजूर, इत्यादी. आता या सर्व प्रतिवर्गाचा एक एक प्रतिनिधी असतो... नेता असतो तो नेहमीच या लोकांच्या साठी आंदोलने करत असतो यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी... पण तो कधीच या इमारतीत जाण्याचा प्रयत्न करीत नाही... या सर्वांचे प्रश्न जसेच्या तसेच राहतात... आणि वर्षानुवर्षे ते जसेच्या तसेच आहेत.
मुद्दा हा आहे, जर का सर्वच कामे इमारतीच्या आत मधुन होत असतील तर इमारतीच्या बाहेर कितीही जिवाची आदळआपट केली तरी ती शेवटी निरर्थकच ठरणार आहे... त्यामुळे या लोकांनी यांच्या विश्वासातील माणसे इमारतीच्या आत मध्ये पाठवायला हवीत...
पण, आज जर आपण निरखून पाहिल्यावर अस लक्षात येईल की, या लोकांचे जे प्रतिनिधी आहेत इमारतीच्या बाहेर राहुनच आंदोलन करण्यात धन्यात मानत आहेत... तो आता एकप्रकारे या प्रतिनिधींचा धंधाच बनला आहे.
मी तर अस म्हणेन की हे जे नेक्सस आहे इमारती मधिल आणि इमारती बाहेरील लोकांच ते वेळीच ईथल्या जनतेन ओळखल पाहिजे...इमारती बाहेरील जो प्रतिनीधींचा जो वर्ग आहे तो जनतेच्या पाठींब्याचा उपयोग इमारती मधिल लोकांना निवडणून देण्यासाठी करतो...आणि हा इमारती बाहेर लढण्याचे नाटक करतो. सब झोल है.
याला जातीय रूप देखील आहे... जर तुम्ही या तीन वर्गांच (इमारती मधिल निर्णय घेणारा वर्ग... इमारती बाहेर लढण्याचे नाटक करणारा वर्ग आणि जनता) सुक्ष्म निरिक्षण केलं तर तुम्हाला अस दिसून येईल की जे सुरवातीचे दोन वर्ग आहेत ते विशिष्ट जातीसमुहांच्या ताब्यात आहेत आणि जनता ह्या वर्गात नेहमीच SC.. ST... OBC आदिवासी, भटके विमुक्त इत्यादि मागास आणि वंचित असलेल्या जाती राहिलेल्या आहे...या जातिंना कधीच इमारतीच्या आत मध्ये जाऊन निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत स्थान मिळालेल नाही आणि याचाच फायदा दुसर्या प्रकारच्या वर्गाने घेतला म्हणजेच आंदलने करणारा वर्ग... पहिल्या वर्गाने वंचित ठेवल आणि दुसऱ्या वर्गाने हक्क आणि न्याय मिळवून देतो म्हणून वर्षानुवर्षे झुलवत ठेवल... पण कोणीच इमारती मध्ये जाऊ दिल नाही. जाण्याणा अधिकार आणि संधी असुन देखील...
आंदोलने करण वाइट अस माझ मत अजिबात नाही... तर आंदोलन जिवंत राहण हे लोकशाही साठी गरजेचच आहे... पण.. पण, जर वर्षानुवर्षे आंदोलनानेच तुमचे प्रश्न सुटतील अस जर का कोण म्हणत असेल तर तो साफ खोट बोलतोय हे समजुन जा... योग्य ठिकाणी जोपर्यंत योग्य लोक बसत नाहीत तोपर्यंत हे सगळ असच सुरू राहील... आता योग्य जागी बसण्यासाठी धडपड करायची आहे की आयुष भर आंदोलनच करायची आहेत हे तुमच तुम्हाला ठरवण्याचा पूर्ण हक्क आहे...!!
तर, हा सगळा राजकारणाचा जातिय घोळ आणि ठरवुन परिस्थिती निर्माण करण आणि जनतेला वेड्यात काढण इथ वर्षानुवर्षे चालत आलेल आहे...
जनतेने आता स्वयंप्रकाशीत व्हायची वेळ आली आहे...!!
-बुध्दीसार शिकरे
Comments
Post a Comment