धर्म आणि धम्म
मला लोक नेहमी विचारतात की धम्म आणि धर्म यातला फरक काय आहे... खर तर या प्रश्नाच उत्तर हे फार विस्तृत आहे कारण धम्म आणि धर्म हा काय एका वाक्यात किंवा एका तासात समजुन सांगायची गोष्ट नाही, पण मला उत्तर देणे हे भाग असत आणि प्रत्येकाला तासनतास तेच सांगत यात खुप वेळ जातो त्यामुळे मी या प्रश्नावर चिंतन करून त्याचा सार काढला आणि मला माझ अपेक्षित उत्तर मिळाल...!! ते पुढीलप्रमाणे उत्तर "धर्म जिथे धार्मिक स्थळ उभारतो तिथे फुल, धुप, अगरबत्ती आणि तत्सम पुजा पाठ करायचे दुकान असतात... आणि धम्म ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ बांधतो त्या ठिकाणी फक्त आणि फक्त विद्वत्ता वाढवणारे पुस्तकांचे दुकान असतात..!!" धर्म अंधश्रद्धेवर उभा असतं आणि धम्म हा तर्कशुद्ध विचाराची कास धरायला शिकवतो -Budhisar (BS)