स्वर्ग आणि नर्क
स्वर्ग आणि नर्क ह्या खुळचट आणि थोतांड कथा आहेत... पण स्वर्गाची कल्पना हि सगळी कडे सुखच सुख अशी केली आहे आणि नर्काची कल्पना ही दुःख भोगण्याचे ठिकाण अशी केली आहे...
तर, प्रत्यक्षात स्वर्ग आणि नर्क ह्या जागा आहेत तरी कुठे??
या अथांग पसरलेल्या ब्रम्हांडात त्यांच स्थान आहे तरी कुठे??
तर, आपली ही जी पृथ्वी आहे जिला पृथ्वी अस मनुष्य प्राण्याने नाव दिल आहे...ती पृथ्वीचा जर का या अथांग पसरलेल्या ब्रह्मांडातील स्वर्ग किंवा नर्क असेल तर...??
ज्या प्रकारे स्वर्गाची कल्पना केली गेली आहे त्या प्रकारे तर पृथ्वी नक्कीच स्वर्ग असु शकत नाही... ईथे दुःख आहे, निराशा आहे यातुन मनुष्य प्राणी मुक्त झालेला नाही...दुखः आपण जन्मताच सोबत घेऊन येत असतो...
तो नष्ट करण्याचा मार्ग आहे पण.....
तर मग हि पृथ्वी जर का नर्क असेल तर तिला आपण अथक परिश्रमाने करूणामय आणि चोहीकडे सुखच सुख असलेल्या स्वर्गात हिचे रूपांतर करावे लागेल...!!
-Budhisar (BS)
Comments
Post a Comment