लोकशाहीचे विद्रुपीकरण आणि नवभारताचे वार्तांकन
लोकशाहीचे विद्रुपीकरण आणि नवभारताचे वार्तांकन देशा समोरील प्रमुख अडचणी, महत्त्वाचे प्रश्न आणि या सगळ्याकडे बघण्याची तरुणांची मानसिकता या सगळ्याच्या विचार केला तर आपल्याला असच दिसुन येईल की... बहुसंख्य तरुण हे भरकटलेले आहेत. त्यांना देश ही संकल्पना आणि लोकशाही याची समज आलेली दिसत नाही आहे. त्यांना भरकटवण्याचा प्रयत्न होतोय का?? जर असा प्रश्न आपल्याला पडत असेल तर...आपले विचार भक्कम असतिल तर कुठलीच शक्ति आपल्याला भरकटू शकत नाही. पण मागिल दोन तीन वर्षात आपण पाहिल तर देशातील तरुणांची विचार शक्ती आणि देश व लोकशाही या कडे पाहण्याची त्यांची दृष्टी अत्यंत संकुचित झाली आहे...सोशल मीडियावर याला जबाबदार असू शकतो पण शेवटी आपण काय विचार करायचा आणि काय विचार करण गरजेचं आहे हे पुर्णपणे आपल्यावरच अवलंबून असत. देश म्हणजे फक्त सैनिक, युद्ध आणि सीमा व लोकशाही म्हणजे फक्त निवडणूका एवढच काय ते आजच्या तरूणांची देश आणि लोकशाही बद्दलची मानसिकता झाली आहे. टिव्ही वर जे दाखवल जातय आणि सोशल मीडियावर जे व्हायरल होतय तेच खर आहे आणि तेच सत्य आहे असा समज आजच्या तरुण पिढीचा झाला आहे. चिकित्सक वृतीचा प्रचंड अ...