लोकशाहीचे विद्रुपीकरण आणि नवभारताचे वार्तांकन
लोकशाहीचे विद्रुपीकरण आणि नवभारताचे वार्तांकन
देशा समोरील प्रमुख अडचणी, महत्त्वाचे प्रश्न आणि या सगळ्याकडे बघण्याची तरुणांची मानसिकता या सगळ्याच्या विचार केला तर आपल्याला असच दिसुन येईल की... बहुसंख्य तरुण हे भरकटलेले आहेत. त्यांना देश ही संकल्पना आणि लोकशाही याची समज आलेली दिसत नाही आहे. त्यांना भरकटवण्याचा प्रयत्न होतोय का?? जर असा प्रश्न आपल्याला पडत असेल तर...आपले विचार भक्कम असतिल तर कुठलीच शक्ति आपल्याला भरकटू शकत नाही.
पण मागिल दोन तीन वर्षात आपण पाहिल तर देशातील तरुणांची विचार शक्ती आणि देश व लोकशाही या कडे पाहण्याची त्यांची दृष्टी अत्यंत संकुचित झाली आहे...सोशल मीडियावर याला जबाबदार असू शकतो पण शेवटी आपण काय विचार करायचा आणि काय विचार करण गरजेचं आहे हे पुर्णपणे आपल्यावरच अवलंबून असत. देश म्हणजे फक्त सैनिक, युद्ध आणि सीमा व लोकशाही म्हणजे फक्त निवडणूका एवढच काय ते आजच्या तरूणांची देश आणि लोकशाही बद्दलची मानसिकता झाली आहे. टिव्ही वर जे दाखवल जातय आणि सोशल मीडियावर जे व्हायरल होतय तेच खर आहे आणि तेच सत्य आहे असा समज आजच्या तरुण पिढीचा झाला आहे. चिकित्सक वृतीचा प्रचंड अभाव इथे दिसून येईल. देश म्हणजे काय असत, तर देश म्हणजे त्या देशातला प्रत्येक व्यक्ती. निवडणुक ह्या पूर्णपणे देशभक्ती, सैनिक, युद्ध याच विषयावर लढवल्या जात आहेत... जर का इथल्या बहुसंख्य तरूण पिढीला त्याच्याच भविष्याची आणि नोकरीची चिंता नसेल तर नेता लोक तर अशा विचार हिन तरूणांना का नाही नाचवणार.
सरकार इथल्या युवांसमोर एक एक गारज फेकत असत आणि युवा देखील निमुटपणे प्रश्न न करता ते गारज खातात. धर्म, जात हे निवडणुकीचे विषय कसे असू शकतात... नौकरी, विकास, प्रगती, उन्नती कशी साधता येईल या विषयावर निवडणूक लढवायला हवी...आणि जो हे सगळ पुर्ण करण्याची धमक ठेवेल त्याला निवडुन देण हे देशातल्या लोकांच काम आहे. पण स्वतः चा आणि आपल्या आजूबाजूचा विकास हे प्रश्न जर स्वतःलाच भेडसावत नसतील आणि तर निवडणुका ह्या धर्म, जाती याच विषयावर होणार. बाजारपेठेचा एकक्ष नियम आहे मागणी तसा पुरवठ...जर तरुणांकडून ज्या विषयाची मागणी होत असेल...तरूण जे विषय डोक्यावर घेऊन नाचत असतील निष्कर्ष सरकार देखील तेच त्यांना पुरवेल त्यांना तर हेच हल आहे.
एका अभिनेत्याची आत्महत्या या देशातील प्रमुख विषय बनतो दोन महिने तो प्रसार माध्यमांचा प्रमुख विषय बनतो आणि याच घटने दरम्यान कोरोना मुळे लाखो मजुरांचे स्थलांतर हा प्रश्न दुय्यम तर सोडाच पण साधा चर्चीला देखील जात नाही यावरूनच देश कुठल्या दिशेने वाटचाल करत आहे हे स्पष्ट होत. पण हे सगळ घातक आहे कारण बहुसंख्य मुर्ख लोकांमुळे जे उरलेसुरले लोक आहेत त्यांचे हाल होत आहेत आणि त्यांना या मुर्खपणाची किंमत भोगावी लागत आहे.
-Budhisar Shikare
Comments
Post a Comment