"तुम्ही स्वतः"
"कधी स्वतःच्या पाया पडलात का??" जिवन जगण्याच्या या घोडदौडी मध्ये... तुम्ही नशिबाशी अजुन टकरा देत असाल तर ती तुमची जिद्द आहे, तुम्हाला तुमच Gole Achieve झाल असेल तर त्या यशात सगळ्यात जास्त वाटत तुमचा स्वतःचा आहे... इतर कुठल्या ही व्यक्ती पेक्षा... इतकच काय तर देवापेक्षाही... कारण तुम्ही हारला नाहीत, हे जगण स्वतःच च तर आहे...आपण स्वतःच स्वतःला कसे काय विसरू शकतो?? जिद्द...उमेद...लढवय्येपण... हे सगळ तर स्वतःमध्ये च तर उमलत, तरी देखील आपण स्वतःला का Thank You म्हणत नाही एकदा ही, आज तुम्ही कुठे ही असाल, यशस्वी झाले असला किंवा त्या वाटेवर असाल... जर तुमची साथ तुम्हाला नसती तर तुम्ही तिथ पर्यंत गेलाच नसतात, मदत करणारे हात असतात भरपूर...त्या हातानां विसरायच नसत कधीच, खचलेल्या काळात धिर देणारे शब्द देखील असतात खुप... ते ज्या तोंडून आले त्या चेहर्यांना विसरायच नसत कधीच, पण ते ऐकुन चालणारे पाय आपले आहेत, कष्ट करणारे हात आपले आहेत, म्हणून स्वतःलाही विसरायच नसत कधीच...!! -Budhisar Shikare