माणसासम वागणे...!!
लातुर मधील लोकहो, समजा जर तुमच्या घरासमोरील कचरा उचललाच गेला नाही...रोज घरातून निर्माण होणारा कचरा रोजच्यारोज तसाच साचत चाललाय, गल्लीबोळात सगळ्यांच्या घरासमोर कचऱ्याचे ढीग च्या ढिग जमा झालेत, प्रचंड दुर्गंधी पसरली आहे... माशा, मच्छर यांच प्रमाण वाढलय..रस्त्यावर चालताना देखील नाकाला हात लावून साचलेल्या कचऱ्यातून वाट काढत चालाव लागतय... नाल्या ओसंडून वाहत आहेत, नाल्यातील गाळ रस्त्यावर आला आहे... विचार करा जर अशी स्थिती लातूर ची झाली तर...?? आता तुम्हाला वाटेल की अशी स्थिती कशाला उद्भवेल... रोज कचरा उचलणारे कर्मचारी येतात कचरा घेऊन जातात... सफाई कर्मचारी रोड स्वच्छ करताता मग कशी होईल अशी लातुर ची दयनीय अवस्था. पण लातुरकर हो, अशी वेळ आपल्यावर यायला वेळ लागणार नाही कारण लातुर मधील कचरा व्यवस्थापन करणारे आणि सफाई कर्मचारी यांची फार दैना झाली आहे हे लोक प्रचंड हलाखीत त्यांच जिवन व्यथीत करत आहेत... तर त्यांच्या जीवनाच्या अशा दयनीय अवस्थेला जबाबदार आहे इथल प्रशासन... कारण इथल प्रशासन हे या लातुर ला स्वच्छ व निरोगी ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे... त्यांची कुचेष्टा करत आहे...