माणसासम वागणे...!!

लातुर मधील लोकहो,
समजा जर तुमच्या घरासमोरील कचरा उचललाच गेला नाही...रोज घरातून निर्माण होणारा कचरा रोजच्यारोज तसाच साचत चाललाय, गल्लीबोळात सगळ्यांच्या घरासमोर कचऱ्याचे ढीग च्या ढिग जमा झालेत, प्रचंड दुर्गंधी पसरली आहे... माशा, मच्छर यांच प्रमाण वाढलय..रस्त्यावर चालताना देखील नाकाला हात लावून साचलेल्या कचऱ्यातून वाट काढत चालाव लागतय... नाल्या ओसंडून वाहत आहेत, नाल्यातील गाळ रस्त्यावर आला आहे... 

विचार करा जर अशी स्थिती लातूर ची झाली तर...?? 
आता तुम्हाला वाटेल की अशी स्थिती कशाला उद्भवेल... रोज कचरा उचलणारे कर्मचारी येतात कचरा घेऊन जातात... सफाई कर्मचारी रोड स्वच्छ करताता मग कशी होईल अशी लातुर ची दयनीय अवस्था.

पण लातुरकर हो, अशी वेळ आपल्यावर यायला वेळ लागणार नाही कारण लातुर मधील कचरा व्यवस्थापन करणारे आणि सफाई कर्मचारी यांची फार दैना झाली आहे हे लोक प्रचंड हलाखीत त्यांच जिवन व्यथीत करत आहेत... तर त्यांच्या जीवनाच्या अशा दयनीय अवस्थेला जबाबदार आहे इथल प्रशासन... कारण इथल प्रशासन हे या लातुर ला स्वच्छ व निरोगी ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे... त्यांची कुचेष्टा करत आहे.

या कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार दिला जात नाही... पगार दिलाच तर तो तीन महिन्यांत एकदाच दिला जातोय तो ही एकाच महिन्याचा... या कर्मचाऱ्यांकडे सुरक्षिततेची साधन उपलब्ध नाहीत...त्यंच्या कडे मास्क, बूट, Gloves यापैकी काहीच नाही... ईतके सारे प्रश्न असताना देखील ते त्यांच काम नित्यनेमाने करतच आहेत... त्यांच काम हे आपल्या सोयीशी, आपल्या आरोग्याशी निगडीत आहे म्हणून आपणच त्यांचा विचार केला पाहिजे... 

याच प्रश्नाला घेऊन लातुर मधील काही तरुण मुल 31 जानेवारी 2020 पासुन आमरण उपोषण करणार आहेत...त्याला लातुरकरांनी पाठींबा द्यावा.

प्रशासनाचा कर्मचाऱ्यांवर अत्याचार असाच सुरू राहिला तर हे कर्मचारी एक ना एक दिवस काम करायच सोडुन देतील आणि वर सांगितल्याप्रमाणे परिस्थिती निर्माण होण्यास वेळ लागणार नाही...

आणि दुसरा मुद्दा म्हणजे, आपण फक्त इथे सफाई कर्मचाऱ्यांची चर्चा करतोय, पण लक्षात घ्या की यांच्या मागे त्यांचा परिवार देखील आहे... तिन महिन्यातून एकदाच पगार होत असेल तर हे लोक घर कस चालवत असतील विचार करा...आणि यांच काम अस आहे की त्याचा परिणाम थेट आरोग्यावर होत असतो, आणि जर का यांना कोणता रोग झालाच तर...??  
मग ईथे परत आर्थिक प्रश्न निर्माण होतोच की... 

म्हणून विचार करा, हे सफाई कर्मचारी आपल्या सर्वांपासून खुप वेगळ आणि खुप महत्वाच देखील...!! 

म्हणून आपण देखील त्यांच्यासाठी कायतरी केल पाहीजे, आपण सर्व एकजूट होऊन प्रशासनावर दबाव आणला पाहिजे तरच या स्वच्छता दुतानां खऱ्या अर्थानं सुखाचे दिवस येतील...!!
        
   -Budhisar Shikare (BS)

Comments

Popular posts from this blog

नेता कसा असावा...नसावा

"प्रभाव"

क्रांति