मी दाभोळकर व्हाव...!!
मी ही दाभोळकर व्हाव...!!
त्यांच्या रक्ताचा एक एक थेंब सार्थ व्हावा,
समाजातील मनामनात विवेक जागावा,
निर्भय, नीतिमान समाज घडवावा,
त्यासाठी मी ही दाभोळकर व्हाव...!!
घेऊनी खांद्यावर पताका विवेकाची,
अंधाऱ्या पथावर,
निर्भय, निडर चालाव,
त्यासाठी मी ही दाभोळकर व्हाव...!!
उपहासाचे मन ते भेदभावाचे आगार,
एकजूट होऊ आपण करू नव समाज निर्माण,
त्यासाठी मी दाभोळकर व्हाव...!!
जखडले ते मन त्या अंधश्रद्धा लय कठीण,
द्यावयास त्यास उत्तर,
पटवून देऊ तयांना मन मनाचे आजार,
त्यासाठी मी दाभोळकर व्हाव...!!
भिती ही मरणाची नाही किंचीत ही आम्हा,
विवेकी वारकरी आम्ही आमचा तुका सोयरा,
गोळीला तुमच्या आमचे आभंग उत्तर,
त्यासाठी मी दाभोळकर व्हाव...!!
गांधी-आंबेडकरांचा समाज दृष्टिकोन,
अंधश्रद्धा त्यामधील च एक अडचण,
ती होऊन दुर मग संविधान समाज,
बघा कसा घडणार,
त्यासाठी मी दाभोळकर व्हाव
त्यासाठी मी दाभोळकर व्हाव...!!
-Budhisar Shikare
Comments
Post a Comment