पुरोगामीत्व
लातुर मध्ये १४ तारखेला जो आंतआजातीय विवाह संकल्प कार्यक्रम झाला....त्या कार्यक्रम विषयी व त्याच्या पार्श्वभूमीवर...
१४ तारखेचा कार्यक्रम अत्यंत छान झाला आणि बाबासाहेबांना एका विशिष्ट प्रकारे अभिवादन करण्यात आल...स्वतः बाबासाहेबांनी म्हटल होत कि जातींच निर्मूलन करायच असेल तर आंतरजातीय विवाह केला पाहिजे...तरच जातीनिर्मूलन शक्य आहे...पण खेदाची आणि दुःखाची बाब अशी आहे कि बाबासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाणारी माणस...जाती निर्मूलनाच स्वप्न बघणारी माणस...जेंव्हा असले आंतरजातीय विवाह संकल्पाचे कार्यक्रम ठेवतात तेंव्हा त्यांच्या विचारांची किव करावीसी वाटते...कारण पुरोगामी विचारांची लोक किंवा आपण त्यांना आपण अस म्हणुया कि स्वतःला पुरोगामी विचारांचे पाईक म्हणवणार्या लोकांना...पुरोगामी विचारांची पताका पुढे घेऊन जाणार्या व्यक्तीनां...आंतरजातीय विवाह करण्याचा संकल्प करावा लागतोय यासारखी दुर्दैवी घटना कोणतीही नसेल...
जातीअंताच स्वप्न बघणारी आणि ते सत्यात उतरवण्यासाठी धडपड करणारे आपण सच्चे?? कर्यकर्ते आहोत...आपल्याला जर जात नष्ट करायची असेल..तर बाबासाहेबांनी आंतरजातीय विवाह हा प्रभावी उपाय सांगीतला आहे...
पण ईथे प्रश्न असा निर्माण होतो कि, जर आपण स्वतःला बाबासाहेबांच्या विचारांचे अनुयायी म्हणत असु...आपण जर स्वतःला पुरोगामी विचारांचे सच्चे पाईक म्हणत असु...आपण जर जाती निर्मूलनाचे स्वप्न पाहत असु...आंतरजातीय विवाह करायचाच हा अंजेंडा असला पाहिजे...कारण हा सुद्धा पुरोगामी विचारच आहे कि... आणि स्वतःला पुरोगामी म्हणवुन घेणारे लोकांनीच जर परोगमी विचारांची पायमल्ली कले तर कसे होणार आहे आपले जाती निर्मूलनाचे स्वप्न साकार....??
पुरोगाम्यांना आंतरजातीय विवाह संकल्प करण्याची गरज नाही...तो त्यांनी म्हणजे जे स्वतःला पुरोगामी म्हणतात...जे लोक जातीअंताच स्वप्न बघतात अशा लोकांनी केलाच पाहिजे...
ज्या पुरोगाम्यांचे जातीत लग्न झाले असेल...त्यांना तर खुप मोठी सुवर्ण संधी आहे..जातीनीर्मूलन करण्यकची...ती अशी...कि त्यांनी त्यांच्या मुलांचे लग्न आंतरजातीय लावले पाहिजे...कारण तर आणि तरच ही जाती व्यवस्था नष्ट होणार आहे...
-बुद्धीसार शिकरे
Comments
Post a Comment