जाती व्यवस्था नष्ट करायची असेल तर.....
भारता मध्ये हजारो जाती आहेत...ईथला प्रत्येक माणूस कुठल्या न कुठल्या जाती मध्ये विभाला गेला आहे.जाती व्यवस्था ही चातुवर्णव्यवस्थे पासुन निर्माण झालेली आहे... तर जशी चातुवर्णव्यवस्था शोषीक आहे..तसच तिच्यापासुन तयार झालेल्या जाती व्यवस्थेच आहे...कारण भारतामधल्या हजारो जाती आहेत म्हणून..कुठली तरी जात कुठल्या तरी जाती पेक्षा उच्च आहे...उच्च जातींची व निच्च जातीचीं विभागणी केलेली आहे...आणि हजारो वर्षे ईथल्या निच्च जातील समजले जाणारे लोक म्हणजेच...कष्टकरी,मजुर..अशा लोकांचा फायदा व उपयोग आणि शोषण ईथल्या उच्च जातीतल्या लोकांनी करुन घेतला...जाती व्यवस्था ही भारताला लागलेली किड आहे..अस आपण सतत म्हणत असता...पण आपल्या कडे ति नष्ट करण्याचा ठोस असा कृती कार्यक्रम किंवा उपाय नाही...
हजारो वर्षापासुन ईथल्या व्यवस्थेत..ईथल्या संस्कृतीत जातीचा पगडा असल्याने ति ईथल्या लोकांच्या जाणीवा आणि नेणीवे मध्ये घर करुन बसली आहे..आणि ती त्यांच्या मनामधुन ईतक्या सहजतेने जाण शक्य नाही...भारत देशातल्या प्रत्येक बाबी मध्ये..राहणीमानामध्ये..भाषेमध्ये..वस्तुंमध्ये..ईतकच काय तर इथल्या खाद्यपदार्था मध्ये सुद्धा जात दिसुन येते किंवा त्यावर जाती संस्थेचा प्रभाव दिसुन येतो.यावरुन हे स्पष्ट होत कि ही जाती व्यवस्था किती चीवट आणि किती खोलवर रुजली आहे..
तर...खरच आपल्याला जाती निर्मूलन करायच असेल तर आपल्या समोर प्रचंड मोठे आव्हान आहे...जाती निर्मूलन करणे म्हणजे काय करणे...?? हे आगोदर आपण जाणुन व समजून घेतल पाहिजे..कारण जात ही कय एक वस्तू नाही..तर जात हि अप्रत्यक्ष..न दिसणारी पण मानवाच्या जिवनावर प्रभाव टाकणारी प्रवृत्ती किंवा प्रणाली आहे...
जाती निर्मूलन करण्यासाठी आंतरजातीय/आंतरधर्मीय विवाह करणे...हा प्रभावी उपाय बाबासाहेबांनी सांगीतला आहे...
तर दुसरा उपाय असा करता येईल आपल्याला...कि जर आपण या देशातल्या प्रत्येक (जाती व्यवस्थेच समर्थन करणार) नागरिकाच्या मनामध्ये दुसर्या जातीच्या व्यक्ती प्रती समता व बंधुत्वाची भावना निर्माण करु शकलो तर जाती व्यवस्था नष्ट हईल....
कारण जातीव्यवस्थे मध्ये प्रत्येक माणसाला समान वागणूक नसते...जाती व्यवस्थे मध्ये उच्च-निच्च तेची भावना असते...वरच्या जातीतला माणुस खालच्या जातीतील माणसाला हिन भावनेने बघतो..वागवतो...जातीव्यवस्थे मध्ये श्रेष्ठ-कनिष्ठ तेची भावना असते.
हे सर्व जातीव्यवस्थेचे चित्र आपल्याला माहीतच आहे...म्हणून आपण जर ईथे समता व बंधुत्वतेचा विचार पेरण्यात यशस्वी झालो तरच जातीचा नाश होऊ शकेल...कारण प्रत्येकाच्या मनामध्ये दुसर्या व्यक्तीबद्दल प्रेमाची..आपुलकीची..मित्रत्वाची भावना निर्माण झाली तर जात हि आपोआपच नष्ट होईल...भारत देश हा बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेवर चालतो म्हणून ह्या देशाच्या घटने नुसार सर्व समान आहेत..कोणीच श्रेष्ठ नाही कोणीच कनिष्ठ नाही इथे सर्व समान आहेत...आणि संविधानाने प्रत्येक नागरिकाला समान दर्जा दिला आहे..आणि हेच जर आपण प्रभावी पणाने तळागळातल्या लोकंमध्ये रुजवल तरच जाती नष्ट होतील...
-बुद्धीसार शिकरे
9657172236
Comments
Post a Comment