ते आमच क्षेत्र नाही का..??

                                                     
व्यवसाय (business) हे क्षेत्र म्हटल कि लगेचच डोळ्यांसमोर ज्या समाजाच चित्र उभ राहत ते म्हणजे..मारवाडी आणि गुजराती समाजातील लोकांच अस का होत..व्यवसाय म्हटल कि ठराविक समाजातील लोकांचच नाव तोंडावर का येत..?? कारण त्या क्षेतामध्ये त्यांची संख्या जास्त आहे ते तिथले बहुसंख्य आहेत.आज ह्या दोन व्यवसायीक जातींनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर हे क्षेत्र काबिज केल आहे.कुठलाही व्यवसाय असो..छोटा किंवा मोठा तो यांचाच. क्वचित अपवाद वगळता थोड्याफार प्रमाणावर बहुजन समाजातील लोक व्यवसायात दिसतील. हे मारवाडी आणि गुजराती या क्षेत्रा चे मक्तेदार बनत चालले आहेत.देशातला प्रत्येक मोठा व्यावसाईक हा गुजराती आहे...आणि आता तर काय भांडवलदारांच च सरकार आहे. गुजराती असो किंवा मारवाडी असो माझ त्यांच्याशी काही व्यक्तीगत अशा स्वरुपाच भांडण नाही...किंवा त्यांच्या बद्दल अथवा त्यांच्या समाजा बद्दल अजिबातच राग नाही...तर जी सत्य परिस्थिती आहे जी वस्तूस्थीती आहे ती सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे.
      मारवाडी आणि गुजराती समाजाला व्यवसाय क्षेत्रातील मक्तेदार म्हणाव कि नाही...?? आज आपण पाहायला गेल तर व्यवसाय करणारे आणि त्या क्षेत्रात सर्वात जास्त संख्येने असणारे हे मारवाडी आणि गुजरातीच आहेत हे सत्य नाकारता येत नाही...आणि हे भांडवलजादे गोरगरीब जनतेच आणि कामगारांच आतोनात छळ करतात तो विषयच वेगळा आहे...त्यावर स्वतंत्र चर्चा होऊ शकते पण सध्या ईथ त्या बद्दल लिहल गेल नाही..असो.
तुम्ही (मारवाडी आणि गुजराती) व्यवसाय क्षेत्रात आता प्रस्थापीत झाला आहात हि वस्तूस्थीती आहे..त्याबद्दल माझ काही दुमत नाही...तुम्ही तुमच्या मेहनतीने हे सगळ हासील करु शकलात याच नक्कीच तुम्हाला श्रेय द्याव लागेल...पण तुम्ही (मारवाडी आणि गुजराती) तुमचाच विकास करत गेलात..तुमच्याच समाजाचा विकास करत गेलात आणि करत आहात.तुमच्या घरात आणि तुमच्या व्यवसायात काम करणारी जी सगळी मासण आहेत ती सगळी मासण हि बहुजन समाजातील आहेत. तुम्ही त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या समाजा बद्दल काहिच केल नाही. ठिक आहे पण आता बहुजन समाज आता अशिक्षित आणि आडाणी नाही राहीला त्यांच्या साठी काय चांगल आहे आणि काय वाईट आहे हे ते आता ओळखु शकत आहेत...पण आजही काही प्रमाणात बहुजन समाजाला त्यांचा क्षत्रु कोण आणि मित्र कोण याचामधला फरक करता येत नाही...म्हणून तर ह्या देशात आम्हीच बहुसंख्य असुन आम्हीच गुलाम आहोत..ही परिस्थिती आपल्याला नाकारता येत नाही..म्हणून त्यासाठी विचार करण गरजेच आहे.
व्यवसाय आणि आर्थिक बांबींशी निगडीत शैक्षणिक क्षेत्र म्हणजे वाणिज्य (commerce) तिथ हि त्याच दोन समाजातील विद्यार्थींची संख्या जास्त प्रमाणात..सगळ्यात जासत CA त्यांचेच. शिक्षण घेण हा सगळ्यांचा हक्क आहे आणि ते त्यांचा हक्क पुरेपुर बजावत आहेत..पण बहुजन समाज काय त्यांनी ह्या क्षेत्रा कडे यायचच नाही का..?? तर ह्यासाठी आपल्यालाच ह्या क्षेत्राबद्दल बहुजन समाजात प्रबोधन कराव लागणार आहे...UPSC आणि MPSC सोडुन सुद्धा अनेक क्षेत्र आहेत हे दाखवुन द्यायला हव. वाणिज्य विषयाच शिक्षण बहुजन समाजातील विद्यार्थी घेत नाही अशातला भाग नाही..ते ही वाणिज्य विषयाच शिक्षण घेतात पण ते तिथ कमी प्रमाणात आहेत.आमचा विकास कुठल्या क्षेत्रातुन होईल हे आम्हाला कळतच नाही..म्हणून त्यांची संख्या तिथ जास्त प्रमाणात आहे.
वरी म्हटल्या प्रमाण..कि मारवाडी आणि गुजराती समाजाच्या व्यवसायात राबण्यासाठि..तिथ काम करण्यासाठी..तिथ काम करुन आपल आणि आपल्या परिवाराच पोट भरण्यासाठी सगळी बहुजन मंडळी राबत असते.जसे ते व्यवसायातले प्रस्थापीत आणि मक्तेदार बनले आहेत..तसेच ईथला बहुजन समाज त्यांचा हाताखाली काम करण्यातच प्रस्थापित आणि मक्तेदार होतो कि काय अशी परिस्थिती बनत चालली आहे. हे सगळ आपण आपल्या हाताने करत आहोत.ही परिस्थिती कोणी आपल्यावर लादली नाही ती वर्षानुवर्षे आपण स्वीकारत आलो आहोत..पण आता अस चालणार नाही आम्हीही ह्या क्षेत्रात म्हणजेच व्यवसायत येऊ शकतो आणि तिथ प्रस्थापित होऊ शकतो हे दाखवुन द्यायची पाळी आली आहे. आजच्या घडीला मुस्लीम समाज ही ह्या क्षोत्रात चांगली पकड बनवत आहे.
आपण पाहतोय कि काॅन्वेंट शाळेत बहुजन समाजातील विद्यार्थी हे कमी प्रमाणात असतात..त्यामागच कारण आहे आर्थिक परिस्थिती.त्यांची आर्थिक परिस्थिती ही त्यांच्या मुलांना काॅन्वेंट शाळेत शिकण्याची परवानगी देत नाही.आणि ह्या ज्या काॅन्वेंट ईंग्लीश शाळा आहेत आणि  त्याच शाळांपुढे दुःख विस्तारत चालेल्या झोपडपट्टया आहेत..पण त्या वस्ती मधील मुल हि त्या शाळेत शिकु शकत नाहीत..हि परिस्थिती आजही आपल्या समाजात आहे..त्या शाळे मध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांच्या घरीची भांडी घासण्यासाठी...धुण धुण्यासाठी त्याच शाळेच्या समोर असलेल्या दलीत वस्ती असो किंवा झोपडपट्टी तेथील महिला ह्या तिथ कामला जातात...आणि त्या वस्त्यामधील पुरुष मंडळी कचर्याच्या गाडी वर..मजुरी..सफाई कामगार..फळ किंवा भाजेपाल्यांचा गाडा ही सर्व कामे करतात...आणि रोजच्या कमाई वर ह्यांच पोट भरत असत..एक दिवस कमाई नाही झाली कि उपाशी पोटीच झोपी जाव लागत.पण विरोधाभास बघा ह्या सर्व कष्टकरी जनतेची मुल त्यांच्याच वस्ती समोर असलेल्या शाळेत जाऊ शात नाहीत..हि कसली समानता आहे?? आणि खरच स्वातंत्र्याच्या 71 वर्षानंतर ही ह्या देशात समानता प्रस्थापित झाली आहे का...?? हा प्रश्न आज आपल्याला पडायला पाहिजे.
मुद्दा आहे तो दोन वेगवेगळ्या शांळेमध्ये मिळणार्या शिक्षणाच्या दर्जाचा.ज्या दर्जाच शिक्षण हे काॅन्वेंट शाळेत मिळत नक्कीच त्या दर्जाच शिक्षण हे आपल्या मराठी माध्यमाच्या शाळेत मिळत नाही..मग त्या शाळेतील आणि मराठी माध्यामाच्या शाळेतील विद्यार्थ्यांची बरोबरी कशी काय होऊ शकेल.आपण जे पेरतो तेच उगवत असत अगदी तशीच परिस्थिती शिक्षणाच्या संदर्भात होताना आपल्याला दिसत आहे.तुम्ही विद्यार्थ्याला शिक्षणाचा दर्जा कसा देताय ह्यावर विद्यार्थी घडत असतो.जस मोदीजींनी GST लागु केली एक देश एक कर अशी त्यामागची संकल्पना आहे..मग माननीय प्रधानमंत्रीजी एक देश एक शिक्षण पद्धती का असु शकत नाही..??
बहुजन समाजाला जर व्यवसाय क्षेत्राची ओळख करुन देण्यासाठी...बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखे संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्याची गरज आहे अस मला वाटत.या संबंधीच प्रबोधन जर करायच असेल तर..झोपडपट्टयामध्ये कार्यशाळा घ्यावा लागतील...तिथल्या विद्यार्थ्यांना वाणिज्य शाखेसंदर्भात सखोल अस तज्ञ व्यक्ती मार्फत सेमिनार घ्यावे लागतील...तिथल्या महिलांना लघुउद्योगा बद्दल समजवुन आणि त्या बद्लची सखोल माहीती सांगावी लागेल..ह्या विषयाची माहीत देणारे लेख सोप्या आणि सहज त्या लोकांना कळतील अशा भाषेत लीहावे लागतील...आणि  हे सगळ काम आपल्याला करायच आहे..जर खर्या अर्थाने आपल्याला जातीनिर्मूलन आणि समता प्रस्थापित करायची असेल तर हे काम करण गरजेच आहे.
             हा लेख वाचुन मी मारवाडी आणि गुजराती समाजाचा विरोधक आहे..आणि मला त्यांच्या बद्दल प्रचंड राग आहे..अशा प्रकारचा गैरसमज काही लोकांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो...परंतु मला हे स्पष्ट सांगायच आहे कि माझ्या दृष्टी ने माझा कोणीही क्षत्रु नाही..मला मारवाडी आणि गुजराती समाजाबद्दल नितांत आदर आहे मी त्याचा सन्मान करतो..पण ते आमचे क्षत्रु नसुन ते आमचे प्रतिस्पर्धी आहेत अस मी मानतो.
                   -बुद्धीसार शिकरे
                   9657172236

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

नेता कसा असावा...नसावा

"प्रभाव"

क्रांति