व्यक्तीची अभिव्यक्ती
सध्या देशामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती लोकशाही साठी घातक आहे असच म्हणाव लागेल. कारण गेल्या चार-पाच वर्षांमध्ये अशा काही घटना घडत आहेत..आणि रोज घडत आहेत ते सगळ बघुन असच म्हणाव लागेल कि भारता मध्ये संविधानाला आणि लोकशाहीला अनुकूल वातावरण आता राहीलेल नाही. आपल्या देशामध्ये अनेक जाती-धर्माचे लोक राहतात,वेगवेगळे प्रांत आहेत, त्या-त्या प्रांता नुसार ती-ती भाषा बोलणारे लोक आहेत आणि त्यांची वेगवेगळी संस्कृती आहे...असा आपला विविधतेमध्ये एकता असलेला देश आहे.. एवढ असुन ही आजतागायत आपला देश टिकुन आहे ते फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानामुळेच. आणि आज त्याच संविधानावर विविध प्रकारे हल्ले केले जात आहेत...लोकशाहीला पायदळी तुडवल जात आहे...संविधानाने दिलेल्या वेगवेगळ्या स्वातंत्र्यावर गदा आणली जात आहे...ते नष्ट करण्याचे प्रयत्न होत आहेत...आणि ही देशातली विध्वंसक परिस्थिती लक्षात घेता तरुणांवर खुप मोठी जबाबदारी आहे संविधान आणि लोकशाही वाचवण्याची व ती टिकवुन ठेवण्याची आणि या सर्वासाठी लढा देण्याची. जेव्हां आपण संविधान वाचवण्याची भाषा करतो..त्या साठी ईथल्या प्रस्थापीत व्यवस्थे विरोधात लढतो तेंव्हा आपला लढा हा संविधानाच्या चौकटीत राहुनच लढला पाहिजे. संविधान वाचवण्याचा लढा संविधानाच्या चौकटीत राहुन लढुया.. देशातील सद्य परिस्थिती आणि राजकारण ओळखुन...भविष्यात उद्भवणार्या धोक्यांवर कशाप्रकारे मात करता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. वाचन वाढवुन तर्कशील विचार करुन हि लढाई आपल्याला लढावी लागणार आहे.
डाॅ.नरेंद्र दाभोलकर, काॅम्रेड गोविंद पानसरे, एम.एम.कलबुर्गी, गौरी लंकेश...या चार विचारवंताच्या हत्या होतात आणि मारेकरी मोकाट फिरतात...जुलमी व अन्यायकारी व्यवस्थेविरोधात आवाज उठवणार्या प्रत्येकाचा आवाज दाबला जातोय...सरकार विरोधात बोलण अथवा निवडुन येण्याच्या आगोदर जे आश्वासन दिल होत ते पुर्ण का झाली नाहीत असा सवाल सरकार ला विचारण म्हणजे देशविरोधी बोलण नव्हे...पण सध्याच सरकार देशभक्ती च्या नावाखाली लोकांना मुर्ख बनवत आहे...लोकांना विकासाच्या मुद्दयावर बोलु दिल जात नाही...जे बोलत आहेत त्यांचा आवाज थांत केला जातोय..आणि जनतेच विकासाच्या मुद्दयाकड लक्ष जाऊ न देण्यासाठी वेगवेगळे जुमले हे सरकार करत आहे... जे सरकार विरोधी बोलतील ते सर्व देशद्रोही आहेत अस सध्याच सरकार म्हणत आहे... देशातल्या महत्त्वाच्या विश्वविद्यालयांना सुद्धा धारेवर धरल जात आहे...तीथल्या सरकार वर सवाल उपस्थित करणार्या विद्यार्थींची गळचेपी केली जात आहे...वेगवेगळ्या पद्धतीन अभिव्यक्त होणार्या लोकांवर बंधने लादली जात आहेत...आणि काल लोकशाह साठी आणि संविधान खरोखरच धोक्यात आहे हे सांगणारी घटना घडली...ती म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या चार न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेऊन देशातल्या व्यवस्थे बद्दल प्रश्न उपस्थित केल..आणि न्यायव्यवस्था सुद्धा धोक्यात आहे अस मत मांडल...
या जातीयवादी सरकार विरोधात आवाज उठवणार्या त्या विरोधात बंड करणार्या रोहीत वेमुला ला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल जात...कन्हैय्या कुमार ला देशद्रोहाच्या खोट्या आरोपाखाली जेल मध्ये टाकल जात (पोलीसांनी चार्जशीट आणखीन दाखल केली नाही)...
निवडुन येण्याआगोदर जे अच्छे दिन च गाजर जनतेला मोदीजींनी दाखवल होत...पण प्रत्यक्षात तर काय अच्छे दिन आलेच नाही... शेतकरी आत्महत्या करतच आहेत, बेरोजगारी वाढतच आहे..नोटबंदी नंतर आणखीन वाढल आहे, प्रत्येक वर्षी 2 लाख तरुणांना रोजगार देण्याच आश्वासन दिल होत पण प्रत्यक्षात त ही झाल नाहीच, भ्रष्टाचार कमी झाला नाही, काळा पैसा परत आणला नाही, माहागाई कमी झाली नाही, दलीत-मुसलमान-स्त्री यांच्यावरचे अत्याचार कमी होताना दिसत नाहीत.... हे सगळे देशासमोरील प्रश्न आहेत आणि याबात आपण सलकारला जाब विचारल पाहिजे...पण सरकार दुसराच तमाशा उभा करुन जनतेच लक्ष विचलीत करत आहे. कधी देशभक्ती च्या नावन, कधी गोरक्षेच्या नावन तर कधी रामाच्या नावन जनतेला खेळवत ठेवत आहे...आणि जे लोक ह्या बद्दल बोलतील त्यांचे आवज दाबले जात आहेत...
प्रत्येकाने प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आदर केलाच पाहिजे. तरच हि लोकशाही टिकुन राहील. लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणार्या मिडीयावर सुद्धा बंधन लादली जात आहेत...पत्रकारांवर हल्ले केले जात आहेत...फेक न्युज च प्रमाण वाढत आहेत..म्हणून आपण ह्या सगळ्या विरुद्ध आवाज उठव गरजेच आहे...न भीता निर्भय आणि निर्भीड पणे आपल्याला ही लढाई लढावी लागणार आहे... जरी आज आपला आवज कमी संख्येत असला तरी आपण सातत्याने सत्या लोकांसमोर आणल पाहिजे. आज देशामध्ये जरी आराजकतेचा माहौल असला तरी आपण न डगमगता अशा परिस्थिती सुद्धा लोकांना सत्या सांगत राहण गरजेच आहे...संविधानाच्या प्रस्तावनेच्या एक-एक शब्दावर घाला घातला जात आहे... देशामध्ये अनेक लोक न्याया पासुन वंचित आहेत, अनेक मुल शिक्षणापासुन वंचित आहेत, अनेक लोक रोजगारापासुन वंचित आहेत बेरोजगार आहेत, अनेक कुटुंब अशी आहेत जे एकवेळच्या खाण्यापासुन वंचित आहेत, अनेक खेडी गाव लाईट,रस्ते,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अशा मानवाच्या मुलभूत हक्कांपासुन वंचित आहेत, अनेक बालक कुपोषण ग्रस्त आहेत, एखाद्या रुग्णाला दवाखान्यात नेण्यासाठी पायी मैलनमील पायपीट करावी लागते...आज जरी आपण स्वातंत्राचे 71 वे वर्ष साजरे करत असलो तरीही हे प्रश्न आजच आहेत...त्यामुळ जाती-पातीच्या राजकारणात आपण न अडकता आपण आपल्या व देशाच्या विकासाच्या मुद्दयाकड लक्ष दिल पाहिजे...आणि सरकार ला प्रश्न विचारत राहिल पाहिजे.
देशातील याच प्रश्नांबरोबर आणखीन दुसरे काही प्रश्न आपल्या समोर आहेत त्याचा सुद्धा जाब आपण सरकार ला विचारल पाहिजे... दाभोलकर,पानसरे, कलबुर्गी,गौरी लंकेश यांचे मारेकरी का सापडत नाहीत..??
अखलाख आणि पेहलू हत्या का झाली..?? कोपर्डीच्या बलात्कार पीडीतेला एक न्याय आणि खैरलांजीतल्या आणि खर्डा गावातील नितीन आगे ला वेगळा न्याय का...?? ह्या सर्व प्रश्नांचा आपण निर्भीड पणे जबाब विचारला पाहिजे..
आता ह्या सरकार चा नविन जुमला सुरू झाला आहे...
न्युज पेपर आणि न्युज चॅनल वर नकारात्मक बातम्या जास्त दाखल्या जात आहेत...यामुळे लोकांमध्ये नकारार्थी विचार वाढत आहेत अस...जे-जे भाजपा ला सपोर्ट कणारचे चॅनल आहेत त्यांच अ मत आहे.. पण हे त्यांच षडयंत्र आहे हे ओळखल पाहिजे कारण...जनते समोर देशात जो सरकार विरोधी आक्रोश चालू आहे तो ईतर लोकांपर्यंत जाऊ नये म्हणून हे सगळे प्रयत्न आहेत...नकारात्मक बातम्या ही देशातली सद्या परिस्थिती आहे...आणि ती कोणीही नाकारु शकत नाही...पण हि परिस्थिती निर्माण होण्यासाठी कुठेतरी हे सरकारच जबाबदार असल्याने जे भाजपाचे न्युज चॅनल आहेत ते असला फालतु तमाशा उभा करत आहेत...
सरकार कोणतही असो, जर ते सरकार देशातील जनतेच्या मागण्या पुर्ण करत नसेल तर त्या सरकार वर प्रश्न उपस्थित करण्याचा आपल्याला पुर्ण अधिकार आहे... खरलांजी हत्याकांड घडल तेव्हां काॅंग्रेस च सरकार होत..त्या सरकार च्या काळात ही न्याय मीळाला नाही आणि आता भाजपा सरकार च्या काळात पण न्याय वेशीलाच टांगलेला आहे...डाॅ.दाभोलकरांच हत्या झाली तेव्हां काॅंग्रेस च सरकार होत आणि आता भाजपाच सरकार सत्तेवर आहे...दोन्ही सरकार च्या कळात मारेकरी मोकाट फिरत आहेत..
म्हणून सरकार कोणतही असो आपण आपल्या प्रश्नांबाबत हक्कांबाबत सरकारला जाब विचारत राहिला पाहिजे.
कोण्याही व्यक्ती च आणि कोणत्याही समाजात मन दुखावणार नाही अस अभिव्यक्त होऊयात...पण जे सत्या आहे तेच सांगत राहुयात... संत तुकाराम म्हणतात " सत्य ते माझ म्हणाव..माझ ते सत्य म्हणू नये" आणि जे सत्या आहे ते स्वीकरण्याची तयारी ठेवायला हवी, तरच लोकशाही टिकुन राहील.
अभिव्यक्ती स्वतंत्र अबाधीत राहाव यसाठी आपण लढतच आहोत पण सोबतच आपला या देशात समानता यावी याच्या साठी सुद्धा लढा असला पाहिजे...समता व बंधुता प्रस्तापीत करण्यासाठी आपला लढा असला पाहिजे...देशाल संघटित ठेवण्यासाठी आपला लढा असला पाहिजे...जाती-धर्म विसरुन देशाच्या प्रगती साठी आपला लढा असला पाहिजे...स्त्रीच नाक कापणारा नाही तर रोडवर आणि गर्भात स्त्री सुरक्षीत राहावी यासाठी आपला लढा असला पाहिजे...गाय वाचवुन माणस मारणाराल लढा नको आहे, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा आपला लढा असला पाहिजे...धर्माच्या राजकारणातुन एकमेकांमध्ये द्वेष पसरवण्या पेक्षा एकमेकांबद्दल प्रेम पसरवुया आणि एकमेकांच्या जाती-धर्माचा आदर करुया...
-बुद्धीसार शिकरे,लातुर
(9657172236)
Comments
Post a Comment