भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील महत्त्वाचे शब्द आजची स्थिती
सर्व प्रथम मी संविधान स्वीकृती दिनाच्या शुभेच्छा देतो आणि माझ्या लेखाला सुरुवात करतो
भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेची सुरुवात.. आम्ही भारताचे लोक या अत्यंत महत्त्वपुर्ण वाक्या पासुन होते..आपण गर्वाने तर म्हणतो अम्ही भारताचे लोक पण खरच आपण तस वागतो का..भारतातच राहण्या-या ईतर धर्माच्या-जातीच्या लोकांना आपण आपल मानतो का..? हे आगोदर लक्षात घेतल पाहिजे..आणि ह्या वाक्याचा आपल्यावर किती परिणाम होतो..ते आपण सत्यात उतरवतो का..? ह्याचा विचार आपण केला पाहिजे..म्हणून आपल्याला ईथल राजकारण आणि जातीचा उपयोग करुन केल जाणार राजकारण हे आपण समजुन घेतल पाहिजे..जातीय राजकारण आणि राजकारणासाठी वापरली जाणारी जात..ह्या आम्ही भारताचे लोक ह्या वाक्याला सुरुंग लावण्याच काम करते..ईथले तथाकथीत धर्मरक्षक प्रत्येक जाती-धर्माला एकमेकांच्या विरोधात उभ करतायत आणि त्यांना स्वतःच हित जपण्यासाठी राजकारणी मंडळी पाठिशी घालत आहेत.. हे धर्मीक आराजक माजवणारं आणि भारताच्या संविधानाला धोका असणार धर्मांध राजकारण वेळीच आपण लक्षात घेतल पाहिजे.. भारत देश हा विविधते मध्ये एकतेच प्रतिक आहे प्रास्ताविकेच वाचन करताना आपण भारताला सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही गणराज्या घडवण्याची शपत घेतो..आणि असा भारत देश आपल्याला घडवायचा आहे आणि असा भारत घडवण्यासाठी काही लोक धडपडत आहेत... पण काही विखारी व विध्वंसक विचारांची मंडळी समाजात आराजकता माजवत आहेत...जे लोक सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही.. विचार प्रस्तापीत करण्याचा प्रयत्न करत आहेत..त्या लोकांचे खुन केले जात आहेत. हे अस का होत आहे...ते कोण लोक आहेत कि त्यांना हा भारत देश एक सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही..व्हायला नको आहे अस वाटत आहे..याचा विचार आपण केला पाहिजे.कारण गेल्या चार-साडेचार वर्षा मध्ये दाभोलकर,पानसरे,कलबुर्गी,गौरी लंकेश यांच्या हत्या झाल्या..आणि सरकारला त्यांचे मारेकरी सापडत नाहीत..देशाला सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष,लोकशाही राष्ट्र घडवणा-यांची हत्या होते..आणि त्यांचे मारेकरी मोकाट आहेत..हे कुठ तरी लोकशाहीला घातक वातावरण निर्माण करत आहे आणि त्यांवर सरकार मायबाप मेहेरबान आहे असच म्हणाव लागेल..
धर्मनिरपेक्ष.. आज खरच देशामध्ये धर्मनिरपेक्ष वतावरण आहे का..? ह्यावर विचार करण गरजेच आहे. कारण सध्या देशात धार्मिक आराजकता दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.. धार्मिक आराजकता का वाढत चालली आहे यावर विचार करण आणि त्या मागे असलेल्या विखारी विचारांच्या लोकांविरोधात बोलण गरजेच आहे.. जर आपल्याला धर्मनिरपेक्ष राष्ट्र घडवायच असेल तर आपल्याला हे करण गरजेच आहे. 2016-17 हे वर्ष मोर्चांच वर्ष ठरल असच म्हणाव लागेल..कारण वेगवेगळ्या समाजाचे लाखोंच्या संख्येचे मोर्चे आपण बघितले आहेत..पण न्यायासाठी आंदोलन करणे, मोर्चे काढणे हा संविधानाने आपल्याल दिलेला अधिकार आहे...पण जाती-जातींमध्ये एकमेकांविरुद्ध द्वेष पसरवणे आणि त्याचा उपयोग आपल्या राजकारणासाठी करणे..या मागील राजकारण आपण वेळीच ओळखल पाहिजे..आणि ते वेळीच ओळखुन हाणुन पाडण गरजेच आहे...नंतर चा मुद्दा म्हणजे राममंदिराचा.. मुस्लीम आणि हिंदू सामाजामध्ये वाद लावण्यचा हा विषय आहे..अर्थातच त्यामागे देखील राजकारणच आहे..दोन्ही समाजामध्ये आपआपसामंत भांडण लावुन ते आपली निवडणुकित सीट पक्की करत आसतात..यामागच गलिच्छ राजकारण दोन्ही समाजातील तरुनांनी ओळखाव.. या सगळ्या गोष्टी धर्मनिरपेक्ष राष्ट्राला बाधा पोहचवत आहेत
लोकशाही.. सध्याची देशाची स्थिती बघुन तर अस वाटतय कि लोकशाही धोक्यात आहे..आणि ती का आहे हे समजुन घेण आणि त्यावर विचार करण गरजेच आहे..कारण वेगवेगळ्या कारणांनी..आणि वेगवेगळ्या पद्धतीने लोकशाही वर हल्ले केले जात आहेत..लोकशाही साठी झगडणा-या, लोकशाही टीकुन राहावी यासाठी प्रयत्न करणा-या लोकांवर हल्ले केले जात आहेत. देशामध्ये लोकशाही विरोधी वातावरण निर्माण होत आहे..अस म्हणन वावग ठरणार नाही. निवडणूक हि लोकशाहीचा प्राण आहे..निवडणूक प्रक्रिया बघुन लोकशाही खतरे मे है असच म्हणाव लागेल...कारण दारु,मटन,पैसा देऊन मत विकत घेण्याची प्रथा या देशात आहे..पण सध्या तर EVM मशीन मध्येच गडबड करुन मत वळवण्याचा प्रयत्न होत आहे.. आणि हे सगळे कृत्य लोकशाही घातक आणि लोकशाही विरोधी आहेत.. EVM मशीन मध्ये घोळ करुन मत वळवणार्यांची दोन उद्दिष्ट असली पाहिजेत..१) लोक आपल्याला मत देणार नाहीत हे त्यांना पक्क माहीती आहे..म्हणून ते मशीन मध्येच घोळ करुन मत वळवत आहेत
२) ज्यांना लोकशाही मान्य नाही,संविधान मान्य नाही तेच लोक हे कृत्य करत आहेत..
सामाजिक,आर्थिक व राजनैतिक न्याय...
कोपर्डी मधिल पीडीतेवर पाशवी अत्याचार करणा-या नराधमांना 29 नोव्हेंबर रोजी शिक्षा सुनावली जाईल..न्याय मिळण्याच्या दृष्टीने हि अंत्यत आनंदाची बाब आहे..पण जर न्याय हा जात बघुन दिला जात असेल तर हा जातियवादी पण खपवुन घेतला जाणार नाही..खैरलांजीत घडलेला प्रकार आठवला कि तळपायची आग मस्तकात जाते..सवर्ण जातितील लोकांनी दलित कुटुंबकर केलेला अत्याचर व गावातुन काढलेली सुरेखा,प्रियंकाची नग्न ढिंड..आमानुष पणे केलेला बलात्कार..सर्व गावाने बघितला त्या हल्ल्यातुन भैय्यालाल भोतमांगे एकटेच वाचले..त्यांच संपुर्ण कुटुंब उद्वस्थ झाल..शेवटी भैय्यालाल भोतमांगे न्याय मागता मागता त्यांनी प्राण सोडला पण न्याय काय मीळाच नाही...कोपर्डी आणि खैरलांजी प्रकरणातील वकिल एकच..आणि कोपर्डी प्रकरणात प्रत्यक्ष साक्षीदार नव्हते..परिस्थितीजन्य पुराव्यांवर उज्वल निकम यांन केस लढवली आणि न्याय मिळवुन दिला...पण खैरलांजी प्रकरणात प्रत्यक्षदर्शी असताना देखील न्याय मिळू शकला नाही..कारण आडवी आली जात.. समाना न्यायाच तत्व कुठ आहे..
खर्डा गावातील नितीन आगेच तसच झाल..त्याल देखील न्याय मिळाला नाही..कारण होत सगळे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फीतुर झाले..या देशामध्ये जर जात बघुन न्याय मिळत असेल तर..मग सामाजिक न्यायच तत्व गेल कुठ...सामाजिक न्याय हा प्रास्ताविकेत वाचन्या पुरताच मर्यादित ठेवला जात आहे..
निखील वागळेंनी लातकर च्या एका सभेत अस म्हटल होत कि, तुम्हीमला न्यायाधीशाच नाव सांगा मी तुम्हाला निकाल सांगतो.. हे वाक्यच पुरेस आहे भारतात न्याय कशा पद्धतीने मिळतो हे सांगण्यासाठी.
विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य..
विचार करण्यावर आणि विचार माडण्यावर अघोषित आणिबाणी लादली गेली आहे...विचारवंताचे खुन केले जात आहेत...पत्रकारांवरती हल्ले होत आहेत...त्यांच्यावर मर्यादा आणल्य जात आहेत...प्रसार माध्यमांची गळचेपी केली जात आहे...Facebook वर विचार मांडणा-या आणि विचारवंताच्या खुनाचा सरकार ला जवाब विचारणा-या लचकांना पोलीस प्रशासन नोटीस पाठवत आहे...अशाप्रकारे विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पायामल्ली होत आहे...या विरोधात आपण आवाज लठवला पाहिजे...अभिव्यकती स्वातंत्र्या समर वेगवेगळख आव्हान निर्माण होत आहेत.
विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य अबाधीत राहाव यासाठी मोर्चे,आंदोलन करावी लागतात कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे...अभिव्यक्त होणार्या रोहत वेमला ला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल जातय...कन्हैय्या कुमर आणि त्याच्या साथीदारांवर खोटा देशद्रोहाचा आरोप केला जातोय...हि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची हत्या नाही तर काय आहे...
श्रद्धा व उपासना...
जात ह आपल्या देशाला लागलेली किट आहे हे आपल्याला माहीतच आहे...धर्म आणि जाती वरुन भारतामध्ये अनेक देश विघातक कृत्य घडलेली आहेत आणि घडत आहेत...त्याच तज उदाहरण म्हणजे बलात्कारी हरामखोर रामरहीम बाबा च्या समर्थकांनी डेरासच्चासौदा ईथ केलेल अमानविय आणि असवैधानिक कृत्य...देशातील प्रत्येक नागरिकाला त्याच्या धर्माची उपासना करण्याचा अधिकार आहे...पण तरी ही समाजामध्ये धार्मीक असंतोष पसरवला जात आहे...यामागच राजकारण ओळखन गरजेच आहे. गोमांस खाल्ल किंवा घरात लपवुन ठेवल्याच्या संशयावरुन मुस्लीम समाजावर अन्याय केला जात आहे...आजही स्वातंत्र्य मिळुन 71 वर्षे झाली तरीही काही ठिकाणी दलितांना मंदिरात प्रवेश करु दिला जात नाही...सार्वजनिक ठिकाणी पाणी भरु दिल जात नाही...हिंदू धर्माचा खोटा अर्थ सांगुन हिंदू समाजातील तरुनांचे माथे भडकवण्याच काम ईथले तथाकथीत धर्मरक्षक करत आहेत...गौरक्षेच्या नावखाली दहशत माजवली जात आहे...या सगळ्या वरुन हेच लक्षात येत कि धर्म आणि उपासना याच स्वातंत्र्य धोक्यात आहे.
वैष्णव जन ते तेने कहीए जे..पिड पराई जाने रे
याचा अर्थ असा कि, राम हा विष्णु चा आवतार आहे...मग राम हाच विष्णु आहे...मग हिंदू धर्मामध्ये जे लोक विष्णु ला मानतात त्या लोकांना वैष्णव अस म्हणतात...मग रामाल माननारे सुद्धा वैष्णव...तर वरचा श्लोक अस सांगतो कि, जे दुसर्या लोकांच दुख: दुर करतात ते सगळे वैष्णव आहेत...पण ईथ तर उलटच आहे रामाच नाव घेऊन कत्तली करणारे लोक आहेत...खर तर त्यांना खरख हिंदू धर्मच कळलेला नसतो अथवा त्यांना चुकिचा हिंदू धर्म सांगीतला गेल असतो...माणस मारुन गाई वाचवा अस हिंदू धर्म सांगत नाही.
जवाहरलल नेहरु विश्वविद्यालयामध्ये(JNU) गोरख पांडे नावाचे कवी आहेत ते अस म्हणतात कि,
अनके पास सबकुछ है,
धन-दौलत,गोला-बारुद सबकुछ है...लेकिन ओ एक बात से डरते है...
ओ ईस बात से डरते है कि लोग उनसे डरना बंद कर देंगे...
सध्या देशामध्ये सगळीकड अराजकतेच वातावरण आहे...पण अशा काळात सुद्धा आपण निर्भीड पणे बोलत राहील पाहिजे..
-बुद्धीसार शिकरे,लातुर
9657172236
Comments
Post a Comment