नेता कसा असावा...नसावा
अनेक दिवसांपासुन ह्या विषयावर लिहायच होत...पण ति वेळ आज आली आहे. कारण काही दिवसांपासुन अशा अनेक घटना घडल्या आहेत कि त्या चळवळीसाठी अंत्यत घातक आहेत...आणि अशा विषयावर बोलण आणि लिहण माझ काम आहे..चळवळीत काम करत असताना अनेक वाईट प्रसंगांना सामोर जाव लागत, मान-अपमान पचवावे लागतात...आणि ह्या सर्वांची तयारी ठेवावी लागते...चळवळीत काम करताना हे असे प्रसंग येणारच आहेत...पण ह्या सार्यांना तोंड देऊन आपण पुढ गेल पाहिजे..तरच संघटना,चळवळ पुढे जात राहील. पण काही संघटनांमध्ये जे वरिष्ठ मंडळी आहेत(सर्वच नाही...काही जण) काही ठिकाणी संघटनेमध्ये वरिष्ठ कार्यकर्ते संघटनेमधील वयाने लहान...विचाराने परिपक्व नसलेल्या किंवा नविन जुडलेल्या कार्यकर्त्यांवर हक्क गाजवू पाहतात...पण संघटनेमध्ये अशा घटना होण चुकिच आहे...सामाजिक काम करत असताना सर्वांनी खांद्याला-खांदा लावुन काम करायच असत...मतभेद असावेत..ते असायलाच पाहिजे आणि ते असतीलच...पण झालेल्या मतभेदांना व गैरसमजांना बसुन सोडवण गरजेच असत...नेत्याने किंवा वरिष्ठ कार्यकर्त्यांने अपमानास्पद वागणूक दिली नाही पाहिजे. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धती वेगळी आहे...संघटनेमध्ये सर्वांचेच विचार जुळतील अस काही नाही, पण सगळ्यांना समजुन घेण आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या विचारांचा आदर केला गेला पाहिजे...पण काही वेळा काय होत कि एखाद्या वायाने लहान कार्यकर्त्याने संघटनेमधील वरिष्ठाला प्रश्न विचारला किंवा शंका उपस्थित केली तर त्या वरिष्ठ कर्यकर्त्याची जबाबदारी असते कि त्या व्यक्ती ने विचारलेल्या प्रश्नाच अथवा शंकेच निरसन करण...त्याची शंका दुर झाली पाहिजे अस उत्तर तुम्ही त्याला दिल पाहिजे..पण काही ठिकाणी प्रश्न विचारणार्या व्यक्ती चा एकतर अपमान केला जातो किंवा अन्या कुठल तरी कारण देऊन उत्तर देण टाळल जात...अशा स्थीतीत कार्यकर्ते तुटतात..मनातुन खचतात आणि ते नैराश्येच्या गर्तेत जातात. म्हणून संघटनेमधील वरिष्ठाची ही जबाबदारी आहे कि त्यान प्रत्येकाच म्हणणे एकुन घ्याव...तो/ती जे म्हणत आहे ते महत्वाच असेल किंवा नसेल पण एकदा ऐकुन घेण गरजेच आहे...संघटनेमधील प्रत्येकाचा आदर केला गेला पाहिजे...प्रत्येकाच्या विचारांचा सन्मान केला पाहिजे.
माझ्या मते मी नेता ह्या पदाचे दोन भाग केलेत..1) ज्या व्यक्ती मध्ये आगोदर पासुनच नेता बनण्याची व नेतृत्व गुण असतात असे
2) समुहाने किंवा संघटनेने बहुमताने ज्यावर विश्वास ठेवलेला असतो आणि संघटनेची जबाबदारी दिलेली असते..असे
तर हे असे दोन प्रकार आहेत अस मला वाटत..
संघटनेचा नेता खंबीर असेल व समजूतदार आणि सर्वसमावेशक भुमिकेचा असेल तरच संघटना चालू शकते अथवा संघटना बंद पडायला वेळ लागणार नाही...ज्या व्यक्ती मध्ये लहानपणापासुनच नेतृत्व गुण असतात ते माणस अशा चुका करत नाहीत...संघटना चालवायच असेल तर संघटनेमधील प्रत्येक कार्यकर्ता गरजेचा आहे ही भावना असावी लागते..गटबाजी करायला नको...
आगोरपासुनच नेतृत्व गुण असेला व्यक्ती संघटनेमधील कोणाचही मध दुखावेल अस बोलत नाही..तो प्रत्येकाचा आदर करतो. नेता गेल्यावरही संघटना पुढे न डगमगता चालणे हे त्या नेत्याची खुबी असते कि तो संघटन कस तयार करतोय..कार्यकर्ते कसे घडवतोय हे त्या नेत्यावर आवलंबुन असत..
दुसर्या पद्धती चा जा नेता प्रकार आहे, तो म्हणजे समुहाने आणि संघटनेने विश्वासाने पुढे केलेली व्यक्ती... ति व्यक्ती वैचारिक असेलच अस काही नाही परंतु त्या व्यक्तीला थोडा वेळ लागेल वैचारिक व्हायला...संघटनेमध्ये कार्यकर्ते कसे टिकवुन ठेवावेत त्यांच्याशी कस बोलल पाहिजे हे ह्या प्रकारच्या नेत्याला बहुतांश वेळी कळत नसत...पण कालांतराने ते गुण त्या व्यक्ती मधये विकसित होतील...आणि मग ति व्यक्ती खर्या अर्थाने नेतृत्व करण्यासाठी तयार असेल.आपण जर संघटनेचे मुख्य कार्यकर्ते असलो तर आपण जिथे-कुठे बोलत असु त्या ठिकाणी आपण विचारपुर्वकच बोलल पाहिजे, नेहमीच संयमी भुमिका असली पाहिजे...कार्यकर्त्यांना कस बोलाव जेणेकरुन ते नाराज होणार नाहीत याची खबरदारी घ्यायला हवी..
मी एक सामान्य कार्यकर्ता आहे मी माझ्या परीन आत्तापर्यंत अनेक संघटनांच्या नेत्यांच निरीक्षण केल आहे...आणि नेता कसा असावा याचा अभ्यास करतो आहे...म्हणूनच हा लेख लिहण्याचा प्रपंच केला...कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर क्षमस्व कारण मी भावना दुखावण्यासाठी हा लेख लिहलेला नाही..आणि तस समजुही नये...हा लेख म्हणजे नेत्याबद्दल च माझ निरीक्षण आणि नेत्याला केलेल्या काही सुचना आहेत...
-बुद्धीसार शिकरे
(9657172236)
खूप छान सर्व संघटन, संस्था नक्किच याचा बोध घेतील आपला लेख मी समाजातील नेत्याना फॉरवर्ड केला आहे
ReplyDeleteआपण केलेले चिंतन खरच , खूप महत्वाचे आहे , धन्यवाद
ReplyDelete