देशभक्ती...देशप्रेम आणि देशविकास
सर्वप्रथम तर भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्यासाठी बलिदान देणार्या तमाम ज्ञात-अज्ञात शहीद क्रांतिविरांना नमन करतो आणि त्यांच्या स्मृतीस अभिवादन करतो...आणि तमाम भारतवासीयांना 72 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दीक शुभेच्छा देऊन माझ्या लेखाची सुरुवात करतो.
देशाबद्दल सर्वांनाच प्रेम असत, देशाप्रती अभिमानाची भावना सगळ्यांच्याच मनामध्ये असते..किंबहुना आपण सर्वचजण देशभक्त असतोच.
डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्या प्रमाणे "मी प्रथमतः आणि अंतिमत: भारतीय आहे." हि भावना सगळ्यांना असते...देशाबद्दल आपण थोडेफार भावनिक देखील असतो...पण गेल्या तिन चार वर्षांपासुन देशभक्ती बद्दल सेन्साॅल करण्याच काम काही उपद्रवी लोक करत आहेत...म्हणजे ह्या उपद्रवी लोक देशभक्तीची व्याख्या ठरवणार आहेत...ज्यांचा देशभक्तीशी काडीमात्र संबंध नाही...ज्यांच देशप्रेम हे फक्त नावापुरतच असत हे लोक आता आम्हाला देशभक्ती शिकवु पाहतात...म्हणूनच तर आपण सगळ्यात आगोदर देशभक्ती, देशप्रेम याच्या संकल्पना स्पष्ट करुन घेतल्या पाहिजेत. आपण देशाच्या सिमेवर लढण एव्हढीच देशभक्ती मर्यादित करुन ठेवली आहे... मला सैनिकांप्रती प्रचंड आदर आहे. पण सिमेवर जाऊन देशासाठी लढण हा देशप्रेमाचा फक्त एक भाग आहे...नाहीतर आजकाल तथाकथित देशभक्तांची सवयच झाली आहे कि,
कोणी काही सैनिकांबद्दल बोलल...सरकार बद्दल बोलल कि लगेच पाठवा त्याला पाकिस्तानात...पाठवा त्याला सिमेवर लाढायला...म्हणून तर मी म्हणतोय कि देशभक्ती फक्त सिमेवर लढण इतकीच मर्यादित करुन चालणार नाही. आणि ज्यांच्या घरात बाँम्ब सापडतात.. जे लोक देशविघातक कारवाया करतात अशा लोकांनी आम्हाला देशभक्ती शिकण्याची गरज नाही... म्हणूनच तर देशाच्या सिमेवर आतंकवाद्यांशी लढण आणि देशात राहुन घरात बाँम्ब बनवणार्या आणि विचारवंतांच्या हत्या करणार्या लोकांविरोधात लढण देशभक्तीच आहे..
भाजपा सरकार सत्तेवर आल्या पासून देशप्रेम, देशभक्त हे शब्द जरा जास्तच कानावर पडायला लागले आहेत... ते काय आहे माहिती आहे का, कि जो कोणी ह्यांच्या विरोधात बोलेल त्याला हे लगेच देशद्रोही ठरवून टाकतात..आणि या सरकार च्या विरोधात आवाज उठवणार्या लोकांना पाकिस्तानात जावा अस म्हणण्याची एकही संधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सोडत नाही... पण संघ परिवारचेच सदस्य जे आता प्रधानमंत्री आहेत ते नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला बिन बुलाए मेहमान बनुन पाकिस्तानात गेले होते त्याबद्दल यांच काय म्हणणं आहे..?
देशाला स्वातंत्र्य होऊन सात दशक लोटली पण संपूर्ण स्वातंत्र्य आणखीन मिळालच नाही याची तिव्रतेने जाणीव होते... देशाला स्वातंत्र्य मिळाल आणि दुसर्याच दिवशी अण्णाभाऊ साठे यांनी मोर्चा काढला होता आणि त्यात त्यांनी "ऐ आझादी झुठी है देश कि जनता भुकी है" हा नारा दिला होता...आण्णाभाऊंनी किती अचूक ओळखल होत...परंतु सात दशक लोटुन सुद्धा आजही अशी परिस्थिती पाहायला मिळते... मग आपण कस म्हणू शकतो की आपण स्वातंत्र्य झालो आहैत म्हणून..?
जो विकास व्हायला हवा होता तो झालाच नाही... भगतसिंग यांच्या स्वप्नातला स्वतंत्र भारत निर्माण झालाच नाही... पण इथे प्रश्न असा निर्माण होतो कि भारताचा विकास झाला नाही किंवा तो होऊ दिला नाही... आणि तस असेल तर काय कारण आहेत ते शोधायला हवीत...
का आजही भारतात गरिबी आहे..?? का आजही भारतात कुपोषणाणे बालक मरतात..?? का आजही बेरोजगारी कमी होत नाही..?? का आजही स्त्री सुरक्षित नाही.. ती मोकळे पणाने का फिरु शकत नाही..?? कुठपर्यंत जातीच विष कालवून लोकांची हत्या केली जाणार आहे..?? एकसमान शिक्षण व्यवस्था कधी निर्माण होईल..??
या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळण्यासाठी किती स्वातंत्र्य दिन जावे लागणार आहेत. जेव्हा या सर्व प्रश्नांमधुन देश मुक्त होईल तेव्हांच खर्या अर्थाने स्वातंत्र्य मिळाल अस म्हणता येईल...आणि देशभक्त नुसतीच आमच्या तोंडात नाही... तर ती आम्ही सत्यात देखील उतरवत असतो आणि देशाविकासाच्या मुद्द्यांवर बोलण ही पण एक देशभक्तीच आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाव म्हणून इंग्रजांशी लढणार्यांमध्ये विद्यार्थी हे सगळ्यात पुढे असायचे हे विसरून चालणार नाही... गांधीजींनी "चले जाव" चा नारा दिला "असहकार आंदोलन" पुकारल गांधीजी ना साथ देण्यासाठी शाळा सोडुन, वह्यापुस्तक टाकुन भारताला स्वातंत्र्य मिळवुन देण्याच्या तिव्र ईच्छेने म्रुत्युची पर्वा नकरता इंग्रजांशी दोनहात करायला पहिल्यांदा कोणी तयार असेल तर ते विद्यार्थी च होते...
पण स्वतंत्र भारतातील युवकाला काय झालय काय माहिती.. तो फक्त त्याच्या करिअर च्याच मागे लागला आहे देशाला पुर्णपणे विसरुन गेला आहे आजचा तरुन...त्याला देशविकासा विषयी काय देनघेन च राहील नाही...हा देश तरुण आहे म्हणून भारताचा विकास फक्त युवकांच्याच हाती आहे... म्हणून प्रत्येक तरुणामध्ये देशविकासा ची भावना निर्माण व्हावी... चला जातीपातीच्या पलिकडे जाऊन देशविकासा साठी योगदान देऊया....नुसतच facebook आणि whatsapp पुरतीच आपली देशभक्ती मर्यादित न ठेवता..आपल देशप्रेम,आपली देशभक्ती देशाच्या विकासासाठी कामाला आणली तर त्याचा उपयोग आहे. तरुन मित्रांनी जातीपातीच्या राजकारणामध्ये ध अडकता उलट ते समजून घेऊन त्यावर वैचारिक रित्या मात करायला हवी... भारताचा शत्रू फक्त पाकिस्तान च आहे अस नाही... तर सनातन, विश्व हिंदू परिषद, हिंदू जनजागरण समिती ह्या सारख्या संघटना ज्या धर्माच्या नावाखाली तरुणांची माथी भडकवण्याच काम करत आहेत...भगवा दहशतवाद पसरवत आहेत...जाति-धर्मा मध्ये विष कालवून तरुणांना एकमेकांच्या समोर उभ करत आहेत...बाँम्ब बनवण्याच प्रशिक्षण देत आहेत...विचारवंताच्या हत्या घडवुन आणत आहेत.
देशात राहून हे असले दिशविघातक काम करणार्या संघटना देखील भारताच्या व आपल्या शत्रू आहेत...यांच्या मध्ये आणि आतंकवाद्यांमध्ये काहीच फरक नाही.. हे सनातनी दहशतवादी लोक धर्माच्या नावाखाली देश पोखरून काढत आहेत... म्हणून यांचा डाव ओळखुन तो हाणून पाडण्याची जबाबदारी ईथल्या तरुणांची आहे...
विचार मांडले म्हणून हत्या होत आहोत...लोकांच्या खाण्यावर बंधन लादली जात आहेत...कोणी काय पोषाख घालावा यावर बंधने लादली जात आहेत...गोरक्षेच्या नावाखाली निष्पाप मुस्लिम नागरिकांची हत्या केली जात आहे... दिवसेंदिवस दलितांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत...शेतकर्यांच्या आत्महत्या वाढत आहेत...त्याचबरोबर भारतातल्या नागरीकांचे करोडो रुपये घेऊन पळून जाणार्यांची संख्या वाढत आहे आणि सरकार ह्या सगळ्यांचा बचाव करत आहे... हे सगळ पाहून स्वातंत्र्य खरण धोक्यात आहे अस वाटत.
भारताचा आत्मा व भारताची अस्मिता, भारताची शान असणार्या संविधान दिवसाढवळ्या मनुस्मृती चाहणार्यांनी पोलींसासमोर जाळल...संविधान जाळुन देशाच्या लोकशाही आणि स्वातंत्र्याबद्दल तुम्हाला राग आहे..आणि हे सगळ तुम्हाला नको आहे हेच दाखवून दिल आहे... संविधान जाळण यामागे फक्त आणि फक्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती असलेला द्वेष आहे... डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच संविधान आणखीन ही काही भटाळलेल्या भटोबांना मान्यच नाही... म्हणून त्यांनी हे क्रुत्य केल...यांना मनुस्मृती च राज्य आणायच आहे..पम हे अस उघड क्रुत्य करण्याची हिंमत करत आहेत याच कारण म्हणजे कि, सत्तेवर जे संघी लोक बसलेले आहेत ना तेच यांना पाठशी घालत आहेत...
येणारा काळ हा कठीण असणार आहे...देशाच्या लोकशाही आणि स्वातंत्र्या समोर अनेक आव्हान उभे केली जातील त्या सर्वांना आपल्याला नेस्तनाबूत करयाच आहे...म्हणूनच तर देशभक्ती आणि देशप्रेम फक्त नावालाच न राहता ते क्रुतीत उतरवुयात आणि देशाच स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी तत्परत राहुया...वेळोवेळी आपल्याला विकासाच्या मुद्यावरुन भटकवण्याचा प्रयत्न होईल पण आपण न डगमगता देशाच्या आंतर्गत सुरक्षेसाठी आणि न मिळाले स्वातंत्र्य मिळवण्यासाठी लढा दिला पाहिजे. भारताला लागलेली किड म्हणजे जातिव्यवस्था म्हणूनच तर भारतातल्या विचार करणार्या प्रत्येक तरुणासमोर हे एक आव्हानच आहे.
आज 72 वा स्वातंत्र्य दिन ज्याला स्वतःच राहायला घर नाही तो पण शुभेच्छा देत होता...फुटपाथच ज्याच घर आहे तो देखील आज स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत होता...कर्जबाजारी पणाला कंटाळून ज्या शेतकर्यांने आत्महत्या केली त्याची मुल तोच जुना फाटका शाळेचा गणवेश घालुन साकाळी राष्ट्रध्वजाला वंदन करण्यासाठी अती उत्साहाने शाळेत गेली...ज्याला आज रात्री पोटभर जेवायला मिळेल का नाही याची शास्वती नाही तो देखील स्वतंत्र दिना बद्दल आनंदी होता...शहरातील एका सफाई कामगाराने कचरा वेचत-वेचतच स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि न मिळालेल्या वेतना बद्दल खंत हि व्यक्त केली..
या सगळ्यांना स्वातंत्र्य दिनाचा आंनद तर आहेच पण तो फक्त एकदिवसापुरता मर्यादित आहे कारण पुन्हा तेच गरिबी ने बरबटलेल आंधार जिवन त्यांना जगायच आहे किंवा अस म्हणून या कि आलेला दिवस कस तर कडेला लावायचा आहे...हा आनंद फक्त एकदिवसापुरता सिमीत आहे...कारण यांना देखील देशावरती प्रेम आहे...पण त्यांची काही स्वप्ने देखील आहेत.
स्वतंत्र भारतातील या व आशा अनेक लोकानां भुखमरी, गरिबी, बेरोजगारी यांपासून आझादी मिळो...प्रत्येकाला स्वतःच घर असाव...उपाशी पोटी झोपण्याची वेळ कोणावरही येऊ नये...गरिबीतून मुक्तता व्हावी...एकाही शेतकर्याला आत्महत्या करण्याची वेळ येऊ नये....आणि सर्व नागरिकांच्या मुलभूत गरजा पुर्ण होवो...यासाठी आपणही कटीबद्ध राहुयात एव्हढच...।।
परत एकदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक...हार्दिक शुभेच्छा
जय भारत...।।
-बुद्धीसार शिकरे
9657172236
Comments
Post a Comment