डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पत्र..।।
हे पत्र लिहण्यामागे एक कारण आहे... आता लोक म्हणतील कि,तुला दाभोलकरांचे मारेकरी माहिती आहेत म्हणून तु त्यांना पत्र लिहत आहेस का..?? तर दाभोलकरांवर कोणत्या व्यक्तीने गोळी झाडली याची मला कल्पना नाही... हा पण कोणत्या विचारधारे ते लोक असु शकतात याची जाणीव माझ्या सहीत आता संपूर्ण भारताला झाली आहे. दाभोलकरांना मारुन त्यांची हत्या करुन अंधश्रद्धा निर्मुलन समिती संपेल...डॉ. दाभोलकरांचे विचारल मरतील..नष्ट होतील या भाबड्या आशेतुन ज्या निच विचारांच्या लोकांनी डॉ. दाभोलकरांवर गोळ्या झाडल्या त्यांचा एवढा मुर्ख दुसरा कोणी ह्या जगात नसेन...आणि हे मुर्ख सनातनी लोक आता पश्चाताप करत बसले असतील..का, तर त्यांचा हा डाव आता त्यांचावर उलटला आहे... म्हणूनच त्या मुर्खांना जाणीव करुन देण्यासाठी हे पत्र लिहित आहे...।।
नाप्रिय,
तुला हे पत्र मी का लिहतोय माहिती आहे का, मी तुला हे याच्यासाठी लिहीत आहे कि...तु आणि तुझा जो कोण कर्ताकरवीता धनी असेल त्याने जो विचार करुन डॉ. दाभोलकरांची हत्या घडवुन आणली... हा डाव तुमचा सपशेल फसला आहे. हा...मात्र तु डॉ. नरेंद्र दाभोलकर नावाचा एक 70 वर्षाचा म्हातारा व्यक्ती संपवण्यात यशस्वी झालास एव्हढच काय ते तुझ यश...बाकी आजकाल आमची म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन समितीची प्रगती तर बघतच असशील... तुम्हाला काय वाटल डॉ. दाभोलकरांना मारल कि तुम्ही जिंकला, पण मुर्खांनो खरतर तुम्ही त्याच दिवशी खऱ्या अर्थाने हारलात...कारण तुम्ही हतबल झालात डॉ. दाभोलकरांच्या अथांग विचारांपुढे...तुम्हाला हे प्रखर विचार झेपावलेच नाहीत.. म्हणून तुम्ही हा मार्ग निवडलात... पण, तुम्हाला काय वाटल कि.. दाभोलकरांना माहिती नसेल का कि त्यांची कधी ना कधी हत्या होणार आहे म्हणून... त्यांना सगळ माहिती होत रे...तुझ्या सारखे खुप जण टपुन होते त्यांचा डाव साधायला...पण दाभोलकरांसारखे माणस तुमच्या सारख्या भेकड लोकांकडे लक्ष देत नसतात...बलिदानाच कफन बांधुन तुझ्यासारख्या धमकीविरांची परवा न करता डॉ. दाभोलकर समाजपरिवर्तनाच ध्येय उराशी बाळगुन ईथल्या सनातनी आणि मनुवादी विचारांच्या लोकांना भिडत ते त्यांच काम करत राहीले...आणि काय कमाल आहे बघ, डॉ. दाभोलकरांची हत्या होऊन पाच वर्षे झाली तरी आजही त्यांचे विचार तुम्हाला पुरून उरत आहेत...अस म्हणुयात कि तुमची "रातो कि नींद हराम." होत आसेल.
जेंव्हा रस्त्यावर "आम्ही सारे दाभोलकर" म्हणत हाजारो उतरतात तेव्हां तर तुमच्या उरात धडकिच भरत असेल ना...।।
डॉ. दाभोलकरांची हत्या झाल्यापासून अंधश्रद्धा निर्मुलन समितीची प्रचंड प्रमाणात वाढ झाली...मी आणि माझ्यासारखेच असंख्य तरुण अंनिस शी जोडले गेले.. दाभालोकरांची हत्या झाली आणि जणू काही त्यांचा विचारांच तुफानच देशभर आल अशी परिस्थिती निर्माण झाली होती... माहाराष्ट्रातच नव्हे तर आता साऱ्या जगात दाभोलकरांच्या विचारांचा झेंडा फडकत आहे... 2013 पर्यंत माहाराष्ट्रापुरतीच मर्यादित असलेली अंनिस आता जगभर पोहचली आहे...
ज्या संघटनेचा महाराष्ट्रात एकही नगरसेवक, आमदार, खासदार नाही तरीही अंनिसच्या रेट्यामुळे आणि डॉ. दाभोलकरांच्या बलिदानामुळे दोन कायदे मंजुर झाले...दाभोलकरांचे विचार तरुणांना आकर्षित करत आहेत... डॉ. दाभोलकरांच्या हत्येनंतर पाच वर्षे न थांबता...न थकता अंनिसचे कार्यकर्ते ज्या जोमाने काम करत आहे...आणि हे सगळ आमच यश बघुन तुम्हाला नक्कीच अस वाटत असेल कि "आपल्या हातुन किती मोठी चुक झाली आहे." याची जाणीव तुम्हाला नक्कीच झाली असेल...हाजारो तरुणांच्या हातात असलेले "आम्ही सारे दाभोलकर.. पानसरे" चे पोस्टर्स पाहुन तुझा जिव वरखाली होत असेल ना...
हे शिवराय-फुले-शाहु-आंबेडकर यांचा विचार मानणारी लोक अशीच असतात रे...हे मरणाला घाबरत नाहीत... आणि तुझ्या सारख्यांना धमकीविरांना तर भिक पण घालत नाहीत...आम्ही नेहमी एक घोषणा देत असतो बघ, तु र ऐकलाच असशील ना कारण तुझे कान आणि डोळे नेहमीच आमच्यावर लक्षक्रेंदीत असतात ना, "दम है कितना गोली मे तेरे,देखा है ओर देखेंगे." तुझ्या गोळ्या संपतील गोळ्या झेलणाऱ्या छाती मात्र कमी होणार नाहीत, दिवसेंदिवस छातीवर गोळ्या झेलणाऱ्यांची संख्या वाढतच आहे... हे पाहुन तुझ्या पायाखालची जमीन सरकली असेल कदाचीत.
तु ज्या प्रकारे डॉ. दाभोलकरांना संपवलस त्याच प्रकारे तु काँम्रेड गोविंद पानसरे... एम.एम.कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांना संपवलस...तु तुझी झालेली हार स्विकारायला का तयार नाहीस..?? तुला हे कस कळत नाही कि माणस मारून विचार मरत नाहीत... आणि डॉ. दाभोलकरांना मारून तु तर ते प्रत्यक्षात पाहीलस..तरीही दुसऱ्या विचारवंताचे खुन केलेसच...कारण तुझ्या शरीरावर तुझ मस्तच नाही
पण ह्या चौघांचा यासाठीच लढा होता, आपल्याला शरीरावय आपलच मस्तक असायला हवं... माणसाने कोणत्याही गोष्टीचा तर्कशुद्ध विचार केला पाहिजे, धर्मांध लोकांनी बिघडवलेल्या धर्माची कठोर विधायक चिकित्सा केली पाहिजे... जेणेकरून आपण अंधश्रद्धा मुक्त व शोषण मुक्त समाजात वावरु शकु...पण हे सगळ केल्याने कुणाचे दुकान बंद होणार होते.. कुणाचे राजकीय नाते दुखावले जाणार होते...आणि हे सगळ बदल्यावर लोकांना मुर्ख बनवता येणार नाही...याचा फायदा धर्मांध राजकारण करुन मत मिळवता येणार नाहीत...या सर्व गोष्टी लक्षात घेऊनच दाभोलकर,पानसरे,कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांची हत्या घडवली गेली.
या सर्वांचा विचार पुढे घेऊन जाण्याची जबाबदारी आम्ही चोख पार पाडत आहोत...आम्ही भीत नाही रे तुम्हाला आणि तुमच्या बंदुकीला, कारण आमच्याकडे विचार आहेत आणि याचीच धास्ती तुम्ही लोकांनी घेतली आहे..म्हणून तुम्ही बंदुकिचा आधार घेऊन माणस मारत आहात...विचार मरतील या आशेने. आणि म्हणूनच आम्ही तुमच्या बंदुकिचा सामना लेखणीने करण्याचा ध्यास घेतला आहे... तुझ्या बंदुकिच्या एका गेळीच्या बदल्यात समोर हजारो व्यक्ती विचार आणि लेखणी घेऊन उभे आहेत तुझा सामाना करायला... कारण आम्ही कणभर सुद्धा तुला आणि तुझ्या बंदुकिला घाबरत नाही... तु जेवढे मासण मारशील तु तितका हारशील आणि आमचा विजय होतच रहील कारण आमची बाजु सत्याची आहे... निशाण्यावर राहणारी लोक निशाण्याला घाबरत नसतात...पळपुटा तर त आहेस. तु माँर्निंग वाँक करताना हत्या केली...तरीही आम्ही हजारोंच्या संख्येने हजार वेळेस निर्भय मार्निंग वाँक केले आहेत आणि या पुढेही करतच राहु...तुला दाखवण्यासाठी कि आम्ही तुला आणि तुझ्या बंदुकिला भीत नाही... कारण आमचा प्रयत्न हा विवेशील आणि निर्भय समाज घडवण्याचा आहे.
त देखील तुझ्या हातातील बंदुक टाकुन विवेकवादाचा मार्ग अवलंबशील अशी आशा करतो...कारण आम्ही आशावादी आहोत.
एक विवेसाथी
बुद्धीसार शिकरे
9657172236
Comments
Post a Comment