माझी समिक्षा भाग - 1

पैसा,माध्यमे आणि राजकारण -पी.साईनाथ
अनुवाद- वनराज शिंदे
🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱🌱

पी.साईनाथ यांच पैसा,माध्यमे आणि राजकारण हे वनराज शिंदे यांनी अनुवीदित केलेल आणि हरिती पब्लिकेशन्स यांनी प्रकाशित केलेल पुस्तक वाचल...!!
पुस्तक छोटसच आहे...पण त्यात खुप महत्वाची आणि मोलाची माहीती पी.साईनाथ यांनी दिली आहे...या पुस्तकामध्ये चर्चा करताना पी.साईनाथ यांनी, भारतातील सत्ताधीशांच्या आणि करोडपती राजकारण्यांच्या हातच बाहुल बनलेल्या व मुठभर उद्योगपतींची लाळ चाटणार्या अशा लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणार्या मध्यमाचां(मिडीया) आणि ह्या सगळ्याला खतपानी घालणार्या व ही दलाल व्यवस्था पोसणार्या सर्वच घटकांचा समाचरा... मुद्देसूदपणे, वेगवेगळे दाखले देऊन, अनेक घटनांचा उल्लेख करुन, आकडेवारीचा आधार घेऊन अगदी व्यवस्थित पणे आपणाला समजेल अशा भाषेत पण वैचारिक पद्धतीची मांडणी केली आहे.
       पत्रकारीता कुठल्या थराला गेली आहे...मुळात तो एक उद्योगधंदा बनला आहे..आणि सामान्य जनतेला मुर्ख बनवण्याच हे नेमक षडयंत्र आहे तरी काय...??
पेड न्युज म्हणजे काय...?
माध्यामांचा वापर राजकारणासाठी आणि एकुनच निवडणूकीसाठी कसा पद्धतशीर केला जातो...
मिडीयाचे रेटकार्ड कशाप्रकारचे असते...??
या व अशा अनेक मुद्यांची चर्चा पी.साईनाथ यांनी या पुस्तकात केली आहे.

हे प्रकरण केवळ मिडीया आणि पत्रकार एव्हढच मर्यादित नसुन...
यात उद्योजकांचा काय हात आहे...त्यांना कशा प्रकारे फायदा होतो..आणि या सर्व प्रकरणाचे धागादोरे विदेशात देखील आहे...

माध्यमांनी सामाजिक बांधिलकि जपली पाहीजे...जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारला पाहिजे...माध्यमांनी जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांच्या लढ्यात उतरुन एक निरपेक्ष भुमिका घेऊन सामान्य जनांचा आवाज बुलंद करुन त्या आवाजाला बळ दिल पाहिजे...पण हे होताना दिसत नाही.
कारण मध्यम हे विकले गेले आहेत...त्यांचा उद्योजक मालक जी आज्ञा देईल तिच ती पाळत आहेत...आणि उद्योजकांचे आणि सत्ताधार्यांचे नात जगजाहीर आहे...

पण सगळेच काय बिकाऊ नसतात...त्यामुळ आजही या क्षेत्रात निरपेक्ष भूमिका घेऊन काम करणारे आणि सत्य दाखवणारे...लिहणारे पत्रकार आहेत...ते वेळोवेळी असले काळेधंदे उघड करतच असतात...आणि हे सत्य पुर्णपणे सामन्य जनते पर्यंत घेऊन जण्याची जबाबदारी आपली पण आहे...
कारण या विषयाबद्दल जे काही लिहल गेलय...जे काही बोलल गेलय ते जनते समोर तेवढ्या तिव्रतेने आल नाही....म्हणून आजही बरेचसे लोक या प्रकाराबद्दल अनभिज्ञ आहेत...पण हे फार भयंकर आणि भीषन आहे आणि हे जनते समोर आल पाहिजे व ते आपण नेल पाहिजे...
म्हणूनच तर पी.साईनाथ आपल्याला आवाहन करत आहेत कि,
भविष्यातील आशादायज वाटचालीसाठी आणि माध्यजगतातल्या नव्या पिढी साठी वाट्टोल ती किंमत मोजण्याची तयारी ठेवा..
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
           -बुद्धीसार शिकरे,लातूर
            9657172236

   पुस्तकासाठी संपर्क:-
                राहुल लोंढे
             7385521336

Comments

Popular posts from this blog

नेता कसा असावा...नसावा

"प्रभाव"

क्रांति