माझी समिक्षा भाग -2
वाचावे असे काही
-----------------------------------------------------
दत्ता देसाई यांच शहीद भगतसिंह
भारतीय क्रांतीचा युवा प्रणेता ,हरिती प्रकाशन,पुणे
-------------------------------------------------
शहीद भगतसिंहावर मी अनेक पुस्तक वाचली आहेत...पण हे पुस्तक मात्र वेगळ आहे.
भगतसिंह यांनी त्यांच्या अल्पशा आयुष्यात जो दैदिप्यमान अस क्रांतिकारी इतिहास घडवला आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासात एक वेगळ नाव निर्माण केल हे सगळ्यांनाच माहीती आहे.
आपण भगतसिंह यांना फक्त भारतीय स्वातंत्र्य लढ्यापुरत मर्यादित करुन ठेवल आहे आणि आजवर आपणाला त्यांचा इतिहास तसा सांगण्यात आला...पण दत्ता देसाई यांनी त्यांच्या या पुस्तकातुन भगतसिंह यांची वेगळी छबी मांडली आहे...किंबहुना आपण अस म्हणूया कि वेगळा भगतसिंह आपल्याला या पुस्तकाद्वारे वाचायला मिळेल.
भगतसिंह यांच्या विचारांची प्रगल्भता किती व्यापक होती, त्यांचा सर्वच विषयावर विचार करण्याचा वेगळा दृष्टीकोण होता.
ते मार्क्सवादी होतो का नाही..?? त्यांचा मार्क्सवाद कोणत्या धाटणीचा होता? डाव्या भारतीय राजकारण करणाराणी त्याकडे कस बघितलं या सर्व प्रश्नांची उत्तरे खूप विवेकी पद्धतीने देसाई यांनी दिले आहेत. त्याच बरोबर त्यांचा राजकारणाबद्दलचा वैश्वीक विचार, अस्पृश्यांबद्लल त्यांची भुमिका, स्वतंत्र भारत कसा असला पाहिजे, धर्म,जात, भाषा, प्रांत या सर्व विषयांकडे बघण्याचा भगतसिंह यांचा दृष्टीकोण वेगळ्या धाटणीचा होता हे स्पष्टपणे समोर आणतात.
या सर्वांबद्दल दत्ता देसाई यांनी नेमकी मांडणी केली आहे.
एकंदरच शहिद-ए-आजम भगतसिंह यांच्या जिवनाचा आणि विचारांचा एक वेगळक पैलू त्यांनी लोकांसोमर ह्या पुस्तकाद्वरे ठेवला आहे.
हे पुस्तक वाचून आपणाला लक्षात येत कि भगतसिंह यांच आयुष्य फक्त भारतीय स्वातंत्र्य लढा आणि फाशी ईतकच मर्यादित नाही तर...भगतसिंह हे विचारांने किती वैश्विक होते. त्यांचे विचार साचेबंद नव्हते. त्यांचे विचार धर्म, जात, भाषा, प्रांत, देश ह्या सर्वांची पलिकडे जाऊन कधीच वैश्वीक झाले आहेत हे दिसुन येत.
असे पुस्तक हरीती प्रकाशन पुणे यांनी प्रसिद्ध केल्याबद्दल त्यांचे व लेखकाचे मनापासून अभिनंदन करतो.
आपण सर्वांनी हे पुस्तक जरूर वाचावे असा आग्रह मी करतो.
📚📚📚📚📚📚📚📚📚📚
-बुद्धीसार शिकरे,लातूर
मो. 9657172236
Comments
Post a Comment