उत्सव लोकशाहीचा
26 जानेवारी सबंध भारतवासीयांचा सण...लोकशाही चा उत्सव...15 आॅगस्ट 1947 ला दिर्घ असा हिंसक व अहिंसक लढा देऊन भारत स्वातंत्र्य झाला...अखेर आपल्याच मातृभूमीमध्ये आपण मुक्त झालो होतो..ब्रिटिशांची राजवट गेली, आता आपला भारत देश हा खऱ्या अर्थाने आपला झाला होत...जिथ शासन सुद्धा ईथल्याच लोकांच असणार...आपण स्वातंत्र्य तर झालो होतो पण, अजून ही आपल्याकडे आपली स्वातंत्र्य अशी घटना नव्हती...मग त्यासाठीच भारतीय घटनेचे शिल्पकार डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची गठित करण्यात आली...आणि 2 वर्ष 11 महिने व 18 दिवसांच्या अथक परिश्रमा नंतर संविधान बनुन तयार झाल आणि 26 नोव्हेंबर 1949 ला संविधान सभेने ते स्वीकृत केल.
भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला गणराज्य दिन असेही म्हटले जाते.भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी इ.स. १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला...
जगातील सर्वांत मोठा घटना म्हणून भारताच्या संविधानाकडे पाहिल जात, अत्यंत परिश्रमाने आणि कित्येक ज्ञात अज्ञात क्रांतिकारकांच्या बलिदानाने नटलेली ही लोकशाही आपल्याला मिळाली...आपल संविधान हे व्यक्ती केंद्री आहे.
आज जरी आपण मुक्त पणाने बोलत असलो, लिहत असलो, कुठेही फिरत असलो हे तर हे सर्व फक्त आपल्या संविधानामुळे शक्य झाल आहे..व्यक्ती च्या स्वातंत्र्याला आपल्या घटनाकारांनी घटना बनवताना फार महत्त्व दिल होत, आणि त्याच मुळे आपण आज स्वातंत्र्याची फळे चाखत आहोत...
जरी संविधानाने स्वातंत्र्य दिल असल तरी ते संविधान ठिकवुन ठेवण हे देखील आपलच काम आहे, कारण संविधानाच्याप्रास्ताविककेची सुरुवात ही आम्ही भारताचे लोक या वाक्या पासुन होते...
आणि सर्व भारतीयांना मिळून, भारताला एक सार्वभौम,समाजवादी,धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडवण्याचा प्रयत्न करायचा निर्धार करीत आहोत.
भारतातल्या सर्वच नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक या संबंधी समान न्याय आहे...कुठेही उच्च नीच आपल्या संविधानाने निर्माण केली नाही गरिब श्रीमंत, काळा गोरा, स्त्री पुरुष हे सर्व संविधाना समोर समान आहेत...आणि हीच तर आपल्या संविधानाची खासियत आहे...
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे, शेकडो परंपरा आणि संस्कृती भारतामध्ये आहेत, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक ईथ राहतात...आणि ह्या सर्वांची मोट बांधून सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणून...सर्वांना, मग तो कुठल्याही जाती धर्माचा असो त्याला श्रद्धा आणि उपासना करण्याचे स्वातंत्र्य देऊन आपापसांत बंधुता निर्माण करणार आणि त्यातुन राष्ट्राची एकता आणि एकात्मता अबाधित ठेवणार आपला संविधान आहे.
संविधानाचा उत्सव आपण उत्साहात साजरा करायला हवा, कारण संविधान आहे तर आपण आहेत हे लक्षात घ्यायला हवं...ज्याप्रकारे संविधान आपल्याला स्वातंत्र्य देत...सर्वांना समान संधी देत, प्रत्येक व्यक्ती ला समान प्रतिष प्रदान करत व सर्व नागरीकांच रक्षण करत त्याचप्रकारे आपणही संविधानाच रक्षण केल पाहीजे ते टिकवल पाहिजे...
स्वातंत्र्य हे आपण मिळवल आहे...ते टिकवून ठेवल तरच ते टिकेल...म्हणूनच संविधानाची शप्पथ घेऊन देशाच्या हितासाठी व संविधानाच्या रक्षणार्थ आपण प्रयत्न करत राहील पाहीजे.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संविधानाच्या रक्षणाची लढाई देखील आपल्याला संवादाचा आदर करुन संविधाच्या चौकटीत राहीनच लढावी लागणार आहे.
भारतीय संविधान जिंदाबाद
गीता,बायबल हो या कुराण सबसे आगे है संविधान.
-बुद्धीसार शिकरे
Comments
Post a Comment