#2

जीवनात आपल म्हणता येतील अशी माणस कमवा... चळवळ, राजकारण होत राहिली पण या सगळ्यात माणस दुरावतील किंवा दुखावतील या सर्व गोष्टी आपण टाळल्या पाहिजे... किंबहुना आपणा चळवळ, राजकारण याचा वापरच माणस जोडण व मित्रत्व प्रस्थापित करुन एकमेकांप्रती प्रेम भावना निर्माण करण्यासाठी केला पाहिजे...मनुष्य हा सामाजिक प्राणी आहे, आपल्याला कोणाच्यातरी सहवासाची गरज असतेच कारण आपण त्या परिस्थितीतच लहान पणा पासुन मोठे झालेलो असतो, त्यामुळेच एकटे पण हे आपल्याला नैराश्येत घेऊन जात असत, म्हणुनच माणस जोडण म्हणजे फक्त संपर्कात राहण एव्ढच नसुन त्यात आपुलकी निर्माण होण... एकमेकांच्या सुख दुःख ची देवाणघेवाण होण, मदती च्या वेळेस निःस्वार्थ पणे धावुन जाण या सगळ्या गोष्टी त्या मध्ये येतात... आपल्या नैराश्याला आपण स्वतः च जबाबदार असतो, आपल्या आजूबाजूला आपल्यावर प्रेम करणारी, आपल्याला हसवणारी, मनसोक्तपणे गप्पा मारणारी माणस असली की नैराश्य नाहीस होण्यास मदत होते... त्यामुळे आपण जिथे कुठे असु त्या क्षेत्रात माणस कमवा, उगीच मी पणाच्या नादात किंवा स्व जोपासण्याच्या नादात माणस दुरावण यात काही शहाणपण नाही याचा त्रास हा नंतर आपल्यालाच भोगावा लागतो... म्हणूनच आत्महत्या सारखे विचार आपल्या मनात येत आसतात, याला जर नाहीस करायच असेल तर हा एक पर्याय आहे अस मला वाटतं...
          उगच चळवळ व राजकारणाच्या नादात माणस दुरावत असतील तर असल राजकारण आणि चळवळ ख्खड्यात घाला व आंनदी जगा...!!
              -बुध्दीसार

Comments

  1. Slotyro Casino Hotel Map & Floor Plans - Mapyro
    Find 구미 출장샵 the best location 태백 출장마사지 for 태백 출장마사지 Slotyro Casino Hotel in Wyo. View detailed floor plans, reviews, photos, 나주 출장마사지 location maps, 777 Casino Way 목포 출장안마 Wyo, Wyo, (469) 778-7000.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

नेता कसा असावा...नसावा

"प्रभाव"

क्रांति