बंदिस्त भारतीय संस्कृती
"बंदिस्त भारतीय संस्कृती "
भारतीय संस्कृती ही स्त्री पुरुष समानतेला पोषक आहे अस मला वाटत नाही. भारतीय संस्कृती ही खूप संकुचित आहे मुळातच इथली संस्कृती ही पुरूषप्रधान आहे...आणि इथूनच मग स्त्री च्या इज्जतीचे आणि तिच्या स्वतंत्र अस्तित्वाचे सर्व प्रश्न निर्माण होतात. भारतीय संस्कृती मध्ये फक्त आई आणि बहीण ह्या दोनच स्त्रियांचा सन्मान करायला शिकवतात, *माझ्या दृष्टीकोनातून आपल्या संस्कृतीत स्त्री ची नव्हे तर फक्त या दोन नात्यांची इज्जत आणि सन्मान करायला शिकवतात...
ती तुझी बहीण असती तर, ती तुझी आई असती तर असच बघितला असतास का, असच बोलला असतास का वगैरे वगैरे... हे सर्व वाक्य आपण ऐकलेच असतील तर ही आहे आपली संस्कृती, ही आहे आपली शिकवण जी की फक्त घरातल्या आई आणि बहिणीचाच सन्मान करायला शिकवते...म्हणून मी ह्या अशा संस्कृती ला बंदिस्त म्हणतो संकुचित म्हणतो आणि का म्हणू नये.
आपली संस्कृती आणि शिकवण ही शिवाजी महाराज आणि गौतम बुद्ध यांची असली पाहिजे, कारण त्यांच्या दृष्टीने सर्वच स्त्री ही समान आहेत...स्त्री ची इज्जत करण्या साठी ती फक्त माझी आई किंवा बहिण असण गरजेच नाही, आणि तीचा सन्मान किंवा तिची इज्जत करण्यासाठी तिला आई किंवा बहीण मानुनच तिचा सन्मान, इज्जत केली जाईल असेही काही नाही...मुद्दा हाच आहे की तिची इज्जत कुठल्याही नात्यात अडकवू नका तिला बंदिस्त करू नका...
इज्जत करणे म्हणजेच तिचे रक्षण करणे असते लोकहो...!!
-Budhisar (BS)
खरय 👍
ReplyDelete