स.. म.. ज
आपण नेहमीच कोणाला तरी कुठल्या ना कुठल्या गोष्टी वरून *समजावत* असतो, आणि जर का आपण चळवळीत असु तर मग *समजावण* किंवा *समजून सांगण* हा आपला धंदाच बनुन जातो, असो इथ विषय तो नाहीये... मुळात मला हा मुद्दा मांडायचा आहे की, आपल्या दैनंदिन जीवनात *"तुला समजलय का...??"* *"तुला समजत नाही का...??"* *"मग तु समजावुन सांगायच ना...??"* *"ते मीच समजावुन सांगू शकतो...* अशा वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपण दिवसभर बोलत असतो, ऐकत असतो... तर कुठली ही गोष्ट परिपूर्ण अर्थाने समजण हे खुप गरजेच असत, आणि जर का त्या गोष्टी बद्दल आपणाला काही माहिती नसेल तर ती योग्य त्या व्यक्ति कडुन समजावून घ्यायची असते... कारण, जिवनात *"समज"* ही खुप महत्वाची असते, मग ती कुठल्या ही गोष्टीची असो... किंवा आपण अस म्हणूया की पुर्ण जीवनच *"समजे"* वर अवलंबून असत...!! आणि आपण चळवळीच्या अंगाने विचार केला तर पुर्ण चळवळच यावर आधारलेली आहे, कारण जर तुम्ही *"समजवण्यात"* कमी पडलात अथवा अपयशी ठरलात तर चळवळीला फारसा अर्थ उरत नाही अस मला वाटत... ...