लांड्या
एकेकाळी खुप गाजलेला शब्द... तस ह्या शब्दाला धार्मिकतेची किनार आहे आणि राजकारणी इतिहास सुद्धा...कट्टर हिंदुत्ववादी मंडळींकडून मुस्लीम लोकांना हिणवण्यासाठी हा शब्द वापरला जाई (जातो)...म्हणून ह्या शब्दाला धार्मिक आवरण चढल आहे...खरतर हा मराठी शब्द आहे...याचा वापर अशा पद्धतीने केला गेला हे दुर्दैवी आहे.
तर, माझ्या दृष्टीकोनातून लांड्या हा शब्द, मुस्लिम समाजातील पोषाखावरुन घेण्यात आला असावा... मुस्लिम समाजातील लोक हे पॅन्ट जरा आखुडच घालतात...ती त्यांची धार्मिक बाबा आहे त्याबद्दल आपणाला काही हस्तक्षेप असण वा अडचण असण याला काही अर्थ नाही... पण काही अंध हिंदुत्ववादी लोकांनी याचा राजकीय वापर केला... मग या शब्दावरून चिडवण, हिणवण सर्रास सुरू झाल... खरतर या चिडवण्याला आणि हिणवण्याला काहीच बेस नाही... यामागे निव्वळ द्वेष आणि कुत्सित भाव आहे, असो...
पण, आज जर आपण पाहिल तर आपणाला अस दिसून येईल की अखुड पॅन्ट घालण ही तर आज ची fashion झाली आहे... आणि जवळजवळ सर्वच तरूण मंडळी हे ह्या प्रकारी पॅन्ट घालत आहेत... मुलींमध्ये हे प्रमाण अधिक आहे...आपण पॅन्ट लांडी झाली/होत आहे अस सर्वसाधारणपणे म्हणतो...पण आता तर ही fashion च होऊन बसली आहे... तर मग आता लांड्या कोण...??
मुद्दा हा आहे की, कोणत्याही गोष्टीकडे आपण डोळस पणाने पाहणे गरजेचे असते... केवळ तुम्ही हिंदू आहात म्हणून तुम्ही मुस्लिम द्वेष केलाच पाहिजे अस काही नाही...धार्मिक द्वेष हा नेहमीच मानव जातीला घातक असतो...!!
*-Budhisar (bs)*
Comments
Post a Comment