स.. म.. ज
आपण नेहमीच कोणाला तरी कुठल्या ना कुठल्या गोष्टी वरून *समजावत* असतो, आणि जर का आपण चळवळीत असु तर मग *समजावण* किंवा *समजून सांगण* हा आपला धंदाच बनुन जातो, असो इथ विषय तो नाहीये...
मुळात मला हा मुद्दा मांडायचा आहे की, आपल्या दैनंदिन जीवनात *"तुला समजलय का...??"* *"तुला समजत नाही का...??"* *"मग तु समजावुन सांगायच ना...??"* *"ते मीच समजावुन सांगू शकतो...* अशा वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य आपण दिवसभर बोलत असतो, ऐकत असतो... तर कुठली ही गोष्ट परिपूर्ण अर्थाने समजण हे खुप गरजेच असत, आणि जर का त्या गोष्टी बद्दल आपणाला काही माहिती नसेल तर ती योग्य त्या व्यक्ति कडुन समजावून घ्यायची असते...
कारण, जिवनात *"समज"* ही खुप महत्वाची असते, मग ती कुठल्या ही गोष्टीची असो... किंवा आपण अस म्हणूया की पुर्ण जीवनच *"समजे"* वर अवलंबून असत...!!
आणि आपण चळवळीच्या अंगाने विचार केला तर पुर्ण चळवळच यावर आधारलेली आहे, कारण जर तुम्ही *"समजवण्यात"* कमी पडलात अथवा अपयशी ठरलात तर चळवळीला फारसा अर्थ उरत नाही अस मला वाटत...
आता चळवळ काय नवीन नाहीये, आणि चळवळीचे विचार चळवळीचे उद्दिष्ट तर त्याहून ही जुने आहेत, पण मग आपण जी आजची पिढी चळवळीत आहे ती, वारंवार समाजाला तेच समजवण्याचा प्रयत्न करतोय जे आपल्या पुर्वीच्या अनेक पिढ्यांनी केला आहे, हा, बदल झाला आणि त्यात नावीन्य आल पण ते फार किंचित स्वरूपाच आहे अस दिसत... आणि हेच नाविन्य आणि झालेला बदल आपल्याला तपासुन पाहण्याची वेळ आली आहे...
मग हे जे समाजाला समजवण्याच जे काम प्रचंड वर्षांपासून सुरू आहे ते समाजात मुरत का नाही याचा विचार व्हायला हवा...
तर मला अस वाटत की, ह्या प्रकरणात *"समजावण आणि समजून घेण"* हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे...
आपण पोटतिडकीने समजावुन सांगत असतो पण लोक समजावुनच घेत नसतील तर...?? यावर काय उत्तर आहे,
तर यावर मला मुद्दे मांडावेसे वाटतात
*1) आपली समजावुन सांगण्याची क्षमता, पद्धत, त्या विषयाचा आपला अभ्यास*
*तर, लोक समजत नाहीत यावर माझ विवेचन अस आहे की,*
आपण जे काही सांगत असतो ते लोक ऐकतात पण अमल करत नाहीत... *आता जे ऐकल त्याचा अमलच होत नसेल तर बदल तरी कुठून होईल* म्हणून आता इथे *"अमल"* हा प्रमुख मुद्दा होतो...
*"अमल"* का होत नसाव...??
तर, आपण जर कुठल्या तरी दबावा खाली अथवा विशिष्ट प्रकारच्या गुलामीत असलो तर विचारात बदल होत नसतो,
म्हणून इथली व्यवस्था लोकांना मग ती *धार्मिक असो वा सामाजिक* जर का स्वतंत्र विचार करण्याच आणि नविन विचारांच अमल करण्याच स्वातंत्र्य देत नसेल तर... *बदल* हा प्रश्न परत व्यवस्थे पाशी येउन थांबतो...
मग आता आपल्याला *"काय बदलायच आहे...??"* *"काय समजवायच आहे...??"* आणि कशा रीतीने ते काम कराच आहे याची चिकित्सा झाल्या शिवाय जो बदल आपल्याला हवा आहे तो होणारच नाही.
*शेवटी काय तर चळवळीला आणि त्यामधील कार्यकर्त्यांनी सुद्धा समजुन घेण्याची गरज आहे.*
*-बुध्दीसार शिकरे*
याच विषयाला धरून विस्तृत विवेचन नंतर करणार आहे...!!
Comments
Post a Comment