बुद्ध दृष्टी - 2

"अंगुलीमाल" हा भयंकर क्रूरकर्मा होता...लोकांची हत्या करून त्यांची बोटे छाटून तो त्या बोटांची माळ बनवत असे... प्रचंड दहशत या अंगुलीमाल ची पसरली होती... पण जेंव्हा या बद्दल बुद्धांना जेंव्हा समजल तेंव्हा बुद्ध लगेच त्याच्या कडे जाणण्यासाठी निघाले... त्याची बुद्धांना दया आली म्हणून बुद्ध त्याच्या दिशेने गेले... बुद्धांना पाहताच तो त्यांच्या दिशेने धावत गेला आणि शस्त्र उगारले पण, बुद्धांच्या जवळ जाताच त्यांच्या चेहर्‍यावरील मैत्री आणि करूणामय भाव पाहुन तो शांत झाला... बुद्धांनी त्याला उपदेश केला आणि त्या क्रूरकर्मा अंगुलीमाला ने शस्त्र खाली टाकले आणि तथागत बुद्धांना शरण गेला... 

शेकडो लोकांची हत्या करणारा हा व्यक्ती तरी देखील बुद्धांनी त्याला माफ केल आणि त्याला उपदेश केला... आणि त्याला भिख्खू संघात देखील घेतल... याच कारण अस की, मुळातच त्या अंगुलीमाच्या मनामध्ये कुठे तरी करूणे चे बिज होतेच... खरंतर आपल्या सर्वांमध्ये उपजत करूणा आणि मैत्रीभाव असतोच... पण त्याचा शोध आपण कधी घेतलेलाच नसतो...म्हणूनच तर वाईट मार्ग आपण स्विकारत असतो...

तुम्ही बघा प्रत्येक व्यसनी व्यक्ती कुठल्या ना कुठल्या कारणाने दुःखी असतेच...हे व्यसन केवळ नशा होईल या वस्तु च नसत तर, वाईट बोलण्याच व्यसन, वाईट विचार करण्याच व्यसन, वाईट वागण्याच व्यसन...या सर्व गोष्टी दुःखातुन जन्म घेतात. 

पाप.. पुण्य हा मुद्दा इथे गौण आहे, तुम्ही तुमच्या भूतकाळात ज्या काही चुका केल्यात त्याचा पश्चाताप करण देखील व्यर्थ आहे... पण केंव्हा?? 

जेंव्हा तुम्ही वर्तमानात चांगला विचार, चांगला आचार अंगिकारणार असाल तेंव्हाच...!!
-Budhisar Shikare

Comments

Popular posts from this blog

नेता कसा असावा...नसावा

"प्रभाव"

क्रांति