बुद्ध दृष्टी
*बुद्ध दृष्टी*
सुखाच्या शोधासाठी मनुष्य आजन्म कष्ट उपसतो... धनसंचय करण्याकरिता तो अमाप कष्ट करतो...या सर्व कष्टाच उद्दिष्ट एकच असत ते म्हणजे "सुख मिळवणे"... आयुष्यभर आपल्याला क्षणिक सुख वारंवार मिळत असतात... पण प्रश्न आहे तो मनाच्या आत्मिक सुखाचा?
जोपर्यंत मनाचे आत्मिक सुख मिळत नाही तो पर्यंत क्षणिक सुख हे निर्थक आहे... म्हणूनच तर त्याला क्षणिक म्हटल गेलय. दुःख हे आपल्या सोबतच जन्म घेत असत, "दुःख ही परग्रहावरील वस्तू नाही ती आपल्या मनातील एक भावना आहे, एक अवस्था आहे."
राजघराण्यात जन्म झाला तरी देखील मिळत असलेली राजगादी त्यागून... संसारचा त्याग करुन... धनसंपत्ती चा त्याग करून तु दुखाःच मुळ शोधण्यासाठी गेलास. पैसा जवळ असेल तर हव ते सुख मी विकत घेईन...हा आमचा भ्रम तु सुरवातीलाच तोडुन टाकलास. मुळातच पैसा ही शौक पुर्ण करण्याची वस्तू आहे आत्मिक सुख देण्याची नव्हे.
समस्त मानव जात "सुख" मिळवण्यासाठी ज्या गोष्टी मिळवते, ज्या गोष्टींकडे आयुष्यभर धावत असते त्याच गोष्टींकडे पाठ करूश तु "प्रवाहाच्या विरोधातला" हा प्रवास सुरू केलास.
बोधी प्राप्त झाल्यानंतर तु ठरवलस की, या ज्ञानाचा वापर मी कशाकरता करू... दुखाःने पिडीत या जगाला सत्य सांगण्यासाठी तु प्राप्त केलेल्या ज्ञानाचा उपयोग केलास... या साठी अखंड पायपीट केलीस... प्रवाहाच्या विरोधातील तुझ हे काम असणार याची कल्पना तुला होतीच.
खरतर त्याग हाच प्रवाहाच्या विरोधात असतो...जेंव्हा तुला विचारल गेल की तु इतके वर्ष जगंलात राहुन काय मिळवल... त्यावर तु म्हणालास की, "मिळवल तर काहीच नाही पण, उलट मोह, ईर्षा, मत्सर, राग, लोभ या गोष्टी मी गमवल्या"
काहीतरी मिळवण्याच्या या संघर्षात आपण काय प्राप्त करतोय आणि काय गमवतोय याकडे आपण डोळस पणे पाहण गरजेच आहे...!!
-Budhisar Shikare
Comments
Post a Comment