"जाणीव"
कुठल्या तरी गोष्टी चा त्रास होत असेल तर त्या गोष्टीतून मुक्त होण्यासाठी किंवा त्या त्रासदायक गोष्टीचा विरोध करण्यासाठी मनाचा निर्धार असण फार गरजेच असत... म्हणूनच तर, बाबासाहेबांनी म्हटल आहे "गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या"
यातला "जाणीव" हा शब्द फार महत्त्वाचा वाटतो मला... कारण जाणिवे शिवाया सर्व अशक्यच, जाणिवच नसेल तर प्रत्यक्ष कृती तरी कशी होईल... आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, सगळे "इझम" सगळे "विचार" हे जाणीवा जागृत करण्यासाठी च तर आहेत...
मानवी मनामध्ये गुलामी (सर्वच) प्रती विरोधाच्या जाणीवा ह्या कोणताच मनुष्य बाहेरून "Install" नाही करू शकत... ती "जाणीव" स्वतःच्या मनामध्ये स्वतःच "Create" करावी लागते...त्यासाठीच तर जगामध्ये पुस्तक लिहली गेली... पुस्तकांमधील "Code" वाचुन मनामध्ये गुलामगिरी विरोधातील "Software" स्वतःच "Create" कराव लागत... ते बाहेरून मिळत नाही...!!
-BS
Comments
Post a Comment